पूजेचे नारळ जर खराब निघाले तर याचा अर्थ काय? रहस्य काय? मनोकामना इच्छा पूर्ण होतील की नाही.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्मात नारळा शिवाय कोणतीही पूजा व कार्य पूर्ण होत नाही नारळाला शुभ फळ मानले जाते आणि प्रत्येक शुभ कार्यात नारळाचा वापर केला जातो. नारळाला लक्ष्मी देवीचे सुद्धा प्रतीक मानले गेले आहे. प्रत्येक पूजेमध्ये नारळ असणे आवश्यक आहे. नारळामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते.

जर आपण कोणत्याही तीर्थस्थानी गेलो तर आपण नारळ घेऊन जातो. त्यानंतर नारळ फोडतो देवाला प्रसाद देतो व आपणही तो प्रसाद घेतो. सरस्वती देवी व गणपती बाप्पाला सुद्धा नारळ वाहिले जाते. पन आपण नारळ फोडले आणि ते आतून खराब निघाले तर आपल्या मनाला खूप वाईट वाटते आणि असे वाटते की, देवी आणि देवता आपल्यावर प्रसन्न नाही आहे.

म्हणून नारळ खराब निघाले व आता आपल्या बरोबर काहीतरी अनुचित घटना घडणार असावी या गोष्टीचा आपण विचार करत असतो. पण असे काहीही नाही त्यासाठी तुम्ही ही माहिती पूर्ण वाचा. तर मित्रांनो आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला नारळ का खराब निघते आणि याचे काय शुभ-अशुभ परिणाम मिळतात हे सांगणार आहोत.

जर तुमचे पूजेचे नारळ खराब निघाले तरी याचा अर्थ असा कधीही नाही की, तुमच्या सोबत काही वाईट किंवा अनुचित घडणार आहे. जर तुमचे पूजेचे नारळ खराब निघाले तरी याचा अर्थ असा आहे की, तुमच्या सोबत काहीतरी चांगले घडणार आहे. पूजेचे नारळ खराब निघणे शुभ असते याद्वारे असे समजले जाते की, देव आपल्याला काहीतरी संकेत देत आहे.

आज मी तुम्हाला या नारळाच्या शुभसंकेत बद्दल माहिती देणार आहे. जेव्हा आपल्याला या गोष्टींबद्दल काहीही ज्ञान नसते. तेव्हा आपण आपल्या मनामध्ये अनेक भ्रम निर्माण करून घेतो आणि मग अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये खूप मोठा प्रभाव पाडतात. जेव्हा आपले पूजेचे नारळ खराब होते तेव्हा आपल्याला खूप राग येतो आणि आपण त्याचा राग विचारण्यासाठी दुकानदाराकडे सुद्धा जातो.

तेव्हा दुकानदार म्हणतो तुम्हाला देव पावला आहे, परंतु आपल्याला तेव्हा ते काहीच समजत नाही. परंतु यापुढे तुमचे जर नारळ खराब निघाले तर तुम्हाला राग येणार नाही उलट तुम्हाला आनंद होईल. तर पूजेचे नारळ खराब निघाले याचा अर्थ असा होतो की, देवाने तुमचा प्रसाद स्वतः खाल्लेला आहे. म्हणूनच नारळ खराब निघते म्हणजे दुसरे कोणीही ते खाऊ शकणार नाही.

म्हणून ते सर्व नारळ भगवंतांना अर्पण करण्यात येते आणि याचा दुसरा अर्थ असाही होतो की, तुमची इच्छा व मनोकामना आता देव लवकरच पूर्ण करणार आहे. देवाची पूजा करताना तुमच्या मनामध्ये जी इच्छा असते ती इच्छा लवकरच पूर्ण होते, असा संकेत आपल्याला याद्वारे मिळतो. म्हणून यापुढे जर तुमचे पूजेचे नारळ खराब निघाले तर तुम्ही दुखी होऊ नका उलट आनंदी व्हा आणि असे समजा की, भगवान तुमच्यावर प्रसन्न झालेले आहेत.

तुमच्या मनात त्या वेळी जी इच्छा असेल ती लवकरच पूर्ण होईल. जर आपण मंदिरांमध्ये नारळ फोडले आणि ते नारळ चांगले निघाले म्हणजे त्याचे खोबरे असेल ते चांगले निघाले तर आपण तो प्रसाद एकट्याने न खाता तो प्रसाद थोडा देवाला ठेवून मंदिरातील लोकांना थोडा थोडा वाटावा.

असे केल्याने आपल्याला आपल्या पूजेचे पूर्ण फळ मिळते. नाही तर काही लोक काय करतात नारळ फोडतात काही प्रसाद भगवंतांना ठेवतात व बाकीचा सर्व प्रसाद आपल्या घरी घेऊन जातात. त्यामुळे आपण जी पूजा करतो ती आपल्या भगवंतापर्यंत पोहोचत नाही.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *