रात्री निवांतपणे शांत मुक्त होऊन झोप लागण्यासाठी हा मंत्र म्हणा..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

जेव्हा आपल्याला रात्री शांत झोपायचे असते तेव्हाच आपल्या मनात चिंता व टेन्शन वाढत असते. त्या विचारांना आपण टेन्शन घेत असतो बरेच विचार आपल्या मनात येत असतात मुलांचे उद्याचे काय होईल. नोकरीच्या काय होईल, जीवनाचे काय होईल, परिवाराचे काय होईल. असे बरेचसे विचार असतात ते आपल्याला त्रास देत असतात. खासकरून मुख्यतः घरातला कमावणारा माणूस किंवा स्त्री असते त्यांना या त्रासाला खास करून खूप सहन करावे लागते.

खर तर घरातील सर्वांना हा त्रास असतो पण मुख्य स्त्री आणि पुरुषाला हा त्रास जास्त असतो. त्यामुळे त्यांना रात्रभर झोप येत नाही किंवा रात्री बेरात्री डोळे उघडते आणि पहाटे थोडीशी झोप लागते. तर कामानिमित्ताने लवकर उठावे लागते म्हणून संपूर्ण दिवस त्यांचा खराब जातो. आणि याच कारणामुळे त्यांना आजार लागतात व त्यांचे स्वास्थ खराब होते. म्हणून रात्री चिंतामुक्त होऊन झोपण्यासाठी एक मंत्र आहे.

जो तुम्हाला चिंतामुक्त झोपण्यास मदत करेल. हा मंत्र तुम्हाला पलंगावर किंवा खाटेवर तुम्ही जेथे झोपत असणार तेव्हा झोपताना म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्ही पाठ करून घ्या किंवा एका कागदावर लिहून घ्या आणि रात्री झोपताना या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. तर मंत्र पुढील प्रमाणे आहे. या देवी सर्व भूतेषु निद्रा रूपेंण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः

तर मित्रांनो अशा प्रकारे खूप छोटा आणि सोपा मंत्र आहे. या मंत्राचा जप तुम्हाला झोपतांना करायचा आहे आणि हा मंत्र म्हणताना तुम्ही मोजू नका. तुम्ही दोन वेळा करायचा असेल दोन वेळेस करा एक वेळा करायचा असेल एक वेळेस करा पण या मंत्राला करतांना मोजू नका. मग चमत्कार बघा तुम्हाला झोप कधी लागली ते समजणार नाही.

तुम्ही फक्त हा मंत्र बोलत राहा तुम्हाला झोप कधी लागली हे कळणार सुद्धा नाही. या मंत्राने आपण देवाच्या शरणात जातो आणि चिंतामुक्त होऊन झोप कधी लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून न मोजता करत राहा फक्त तीन वेळा म्हटल्यान तुम्हाला बरे वाटेल. तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला झोप शांत नक्की लागेल.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *