महिला डोक्यावर पदर का घेतात? काय आहे यामागील रहस्य.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपल्या भारतीय संस्कृतीत महिलांनी प्राचीन काळापासून डोक्यावर पदर घेण्याची प्रथा चालत आलेली आहे. आजही आपल्या घरातील ज्येष्ठ स्त्रिया आपल्याला डोक्यावर पदर घेतांना दिसतात. परंतु आधुनिक शैलीमुळे हळूहळू डोक्यावर पदर घेण्याची पद्धत लुप्त होत आहे. आताच्या मुलींना डोक्यावर पदर घेणारी स्त्री काकूबाई वाटते. ते काही अंशी खरेही आहे.

स्त्रिया आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक काम करत आहेत घराची जबाबदारी संभाळत आहे किंवा पुरुषांपेक्षा जास्त स्त्रियांचे घरात योगदान आहे. असे म्हटल्यास ही काही अयोग्य नाही. मग पदर सांभाळत बसणे का पाहिजे, काही मुली पदराला बंधन म्हणतात. पण पदर म्हणजे मर्यादा आहे आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचा मान ठेवणे व त्यांना आदर देणे हे पदराद्वारे दाखवले जाते.

परंतु नुसते डोक्यावर पदर घेऊन आपण समोरच्या व्यक्तीला मान देऊ शकतो का? काही स्त्रिया नाकापर्यंत पदर घेतात पण घरात त्यांची मात्र वागणूक चुकीची असते. आपण घरात चांगले वागून सगळ्यांशी मिळून मिसळून राहून आपला आदर सादर करू शकतो. त्यामुळे डोक्यावर पदर घ्यायची गरज नाही.

पण आपण जेव्हा धार्मिक कार्य किंवा देवपूजा करत असतो तेव्हा डोक्यावर पदर जरूर घ्या. कारण देवी-देवतांना मान दिला पाहिजे आपण कितीही मोठे ज्येष्ठ व श्रेष्ठ असलो तरी देवी-देवतांना मान हा दिलाच पाहिजे. या गोष्टींचे भान ठेवावे पदर म्हणजे मर्यादा आहे, पदर म्हणजे दोन व्यक्तींमधील पडदा असतो. पूर्वी रामायण काळात स्त्रिया डोक्यावर पदर घेत असत परंतु नाकापर्यंत पदर घेत नव्हते.

नंतर आपल्या भारतात मुघलांचे शासन आले. मुगल शासनातील लोक आपल्या मुलींना व सुनांचे सुंदर चेहरे बघत होते व आपल्या मुलींना उचलून नेऊन त्यांच्यावर अ-त्या-चा-र करत होते. म्हणून तेव्हापासून त्यांच्यापासून लपायला महिलांनी नाकापर्यंत पदर घ्यायला सुरुवात केली. म्हणून त्यातून त्यांचे संरक्षण होऊ लागले. पूर्वी च्या प्रथा संपूर्ण चुकीच्या आहे असे नाही पदर घ्यायचा का नाही हा आपला विषय आहे.

परंतु साडी मध्ये स्त्री जितकी सुंदर सुशील आणि जातीवादी दिसते तितकी ती दुसऱ्या कोणत्याही वेशभूषेत दिसत नाही. काही मर्यादा असतात त्या पाळण्यावर लागतात पण किती आणि किती दिवस हे आपले आपल्यालाच ठरवायचे आहे. मुलींना पदराचे डोक्यावर ओझे होऊ नये इतकीच अपेक्षा.

अमेरिका ,स्पेन, किंवा इतर देशात कोणत्याही स्त्रीचे नाव पतिव्रता स्त्री म्हणून घेतले जात नाही. पण आपल्या भारतात स्त्रीचे नाव पतिव्रता म्हणून घेतले जाते. शेवटी काय संस्कार व संस्कृती टिकवून ठेवणे व पुढच्या पिढीकडे ती सुखरूप सुपूर्त करणे हे आपल्या हातात आहे. आपली भारतीय संस्कृती आकाशात जोपर्यंत चंद्र व तारे आहे तोपर्यंत महान असेल.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *