२१ जून सोमवार मोठी निर्जला एकादशी कसा करावा उपवास? उपवास कधी सोडावा? नक्की बघा.

Daily News

नमस्कार मित्रांनो.

सोमवारी सगळ्यात मोठी एकादशी आहे आणि या एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात. भागवत एकादशी, प्रभोधनी एकादशी अशा बऱ्याच एकादशी असतात. ज्या मोठ्या एकादशी मानल्या जातात. त्याच प्रकारे निर्जला एकादशी सुद्धा खूप मोठी मानली जाते. याच दिवसाची मान्यता अशी आहेत की, जोही व्यक्ती निर्जला एकादशीच्या दिवशी व्रत करतो पूजापाठ करतो.

त्याचे सगळे पाप नष्ट होतात. त्याच्या सगळ्या चुका माफ होतात आणि त्याला सुख-समृद्धी शांती समाधान लाभते. तर २१ जून या सगळ्यात मोठया एकादशीच्या दिवशी उपवास कसा करावा. तो उपवास कधी सोडावा, कोणती कामे करू नयेत. याबद्दलची संपुर्ण माहिती आम्ही तुम्हाला आजच्या या लेखामध्ये देणार आहे. तर हा लेख संपूर्ण वाचा.

२१ जून या निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. सकाळी लवकर उठून अंघोळ करावी, त्यानंतर देवघरात दिवा लावावा. पूजा करावी, प्रार्थना करावी विष्णू देवाचे अभिषेक करावे. विष्णू देवाचे स्‍मरण करावे. विष्णू देवाला फुले आणि तुळशी अर्पण करावी. आपल्या घरात विष्णू देवाची मूर्ती किंवा फोटो नसेल तर आपण कृष्णाच्या फोटोला कृष्णाच्या फोटोला किंवा मुर्ती ला सुद्धा फुले किंवा तुळशीचे पान अर्पण करू शकतो.

या दिवशी शक्य असेल तर उपवास करावा. शक्य असेल तरच उपवास करावा. शक्य नसेल तर उपवास अजिबात करू नये. तर एखाद्या दिवशी उपवास करण्याची खूप मोठी मान्यता आहे. बरेचशे लोक या दिवशी उपवास करतात आणि खास करून निर्जला एकादशी या दिवशी उपवास असतो हा पाणी न पिता केला जातो. म्हणून या एकादशीला निर्जला एकादशी असे म्हणतात की जल सुद्धा पिले जात नाही.

परंतु असा उपवास तुम्हाला शक्य नसेल तर अजिबात करू नये. तुम्ही साधा सरळ उपवास या दिवशी करू शकतात. सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे करून देवपूजा झाल्यानंतर तुम्ही उपवास सुरू करू शकता. काहीच खायचे नाही. तुम्ही फळ खाऊ शकता किंवा तुम्ही एक वेळेस फराळ सुद्धा करू शकता.

एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो. २१ जूनला तुम्ही उपवास धरला तर तो २२ जूनच्या दिवशी सोडावा. तुम्ही सकाळी रात्री फराळ करू शकता. मग तुम्ही फराळामध्ये तुम्ही उपवासाचे जेही पदार्थ असतात ते खाऊ शकता. दुसऱ्या दिवशी जेवण करून स्वयंपाक करून तुम्ही उपास सोडू शकतात.

आता या दिवशी कोणते काम करू नये. तर या दिवशी व्यसनी माणसांनी व्यसन सुद्धा करू नये. नॉनव्हेज अजिबात खाऊ नये घरात करू सुद्धा नाही. कटकटी करू नये, महिलेचा अपमान करू नये, कोणाबद्दल वाईट विचार करू नये, वाईट बोलू नये.

असे काम तुम्ही करू नका. तर एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने बरेचशे लाभ आपल्या घराला होतात म्हणून निर्जला एकादशीच्या दिवशी उपवास जमत असेल तर नक्की करावा. उपवास जमत नसेल तर पूजा पाठ अवश्य करावी.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *