मुख्य दरवाजा जवळ ठेवा या वस्तू महालक्ष्मी स्वतः धावत येईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

घराच्या तुलनेत आपले प्रवेशद्वार सुसज्ज व सुंदर कसे दिसेल याची आपण जास्त काळजी घेतो कारण असे म्हणतात की अंगणावरून घराची परीक्षा होते. म्हणजे बाहेरचा परिसर अंगण व प्रवेशद्वार व्यवस्थित नीटनेटके व सुंदर असेल तर घरही त्याप्रमाणे नीटनेटके व्यवस्थित असल्याचे लक्षात येते. आपण घराचे मुख्य द्वार नेहमी प्रसन्न ठेवतो कारण येथूनच आपल्या घरात सुख संपन्नता व आनंदाचे आगमन होते.

या लेखात आपण बघूयात घराचे मुख्य द्वार शुभ व उत्तम दिसण्यासाठी काय केले पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर लगेचच मुख्य द्वार उघडावे त्याबरोबर जेव्हा आपण भगवंताचे पूजन किंवा प्रार्थना करतो. त्यावेळी हे मुख्य द्वार उघडे असावे, सर्वात आधी दार उघडल्यावर उंबरठ्यावर त्यावर एक तांब्या पाणी शिंपडावे यामुळे रात्रभर जे दूषित ऊर्जा त्यावर जमलेली असते ती घरात प्रवेश करू शकत नाही.

यासाठी तुम्ही रात्री घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक तांब्या पाण्याने भरून ठेवू शकता. या पाण्यात तुम्ही हळद गुलाब पाणी व अत्तरही टाकू शकता. मुख्य दाराच्या आतील बाजूस महालक्ष्मी मातेचा फोटो जरूर लावावा व घराबाहेर पडताना देवीचे दर्शन घेऊन मग बाहेर पडावे. घराचे डोअरबेल घराच्या डाव्या बाजूस असावे म्हणजे तुम्ही ती उजव्या हाताने वाजवू शकता.

दाराच्या दोन्ही बाजूला हळद-कुंकू, चंदन किंवा केशराने ओम आणि स्वस्तिक जरूर बनवावे. आजकाल असे प्लास्टिकचे स्टिकर ही मिळतात पण त्यातून कोणतीही पॉझिटिव्ह ऊर्जा मिळत नाही. घराच्या अंगणात वेळेनुसार रांगोळी जरूर काढावी. कारण यामुळे देवी लक्ष्मी आकर्षित होते व नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करीत आहे.

विशेष देवी लक्ष्मीची पावले आपण रांगोळी काढत असलो, तर ती पावले घराकडे प्रवेश करीत असलेली असावेत ही पावले अष्टप्रधान कमळाच्या आत असले तर खूपच चांगले असते. यासाठी रांगोळीचे स्टिकर्स ही मिळतात पण ते फक्त घराची शोभा वाढवितात म्हणून यांचा वापर टाळावा. त्याप्रमाणे प्लास्टिकचे तोरणही लावू नये कोणत्याही मंगल कार्याच्या वेळी किंवा उत्सवामध्ये दाराला तोरण लावले जाते.

यासाठी वेगवेगळ्या प्रकारची तोरणे वापरली जातात. पण आंब्याच्या पानांचे तोरण जास्त शुभ समजले जाते. आंब्याच्या पानाच्या तोराणामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते. आंब्याची पाने न मिळाल्यास तुम्ही अशोक वृक्षाशी किंवा वडाची पाने तोरण करण्यास वापरू शकता. हे तोरण तुम्ही कधीही लावू शकता मंगळवारी तोरण लावणे सर्वात चांगले असते आंब्याच्या तोरणात सुखाला आकर्षित करण्याची क्षमता असते.

आंब्याच्या पाना मुळे चिंता व काळजी हे दूर होते. म्हणून आंब्याच्या पानाचे तोरण जास्त शुभ समजले जाते. घराचा मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना एक-एक तुळशीचे रोप लावावे तुळशीमध्ये वातावरणातील नकारात्मक ऊर्जा ओढून घेण्याची शक्ती असते. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतो घराला दृष्ट लागू नये व वाईट नजरेपासून घराची सुटका व्हावी म्हणून घराच्या मुख्य द्वारावर नजर गणेश किंवा पंचमुखी हनुमानाचा फोटो जरूर लावावा.

तुरटी लाल रंगाच्या कपड्यात बांधून मुख्य द्वारावर लावा तसेच लिंबू व मिरची लावू शकतात. मुख्य द्वारावर तांब्याचा सूर्य लावा. रात्री मुख्य दरवाजाच्या बाहेर झाडू खाली टाकून ठेवावा यामुळे घरात नेगेटिव एनर्जी प्रवेश करू शकत नाही. काही दरवाजांवर घोड्यांची नाल आपण लावलेली असते हे आपण बघतो. पण जी घोड्याची नाल घोड्याच्या पायात राहून घासली गेलेली आहे. अशीच घोड्याची नाल दरवाज्यात लावावी.

एकदम नवीन न वापरलेली घोड्याची नाल दारावर लावल्यास त्याचा काहीही फायदा होत नाही. शुक्रवारी काळे घोड्याच्या पायातली नाल विकत आणावे व रात्रभर रुईच्या तेलात भिजत ठेवावे व शनिवारी सकाळी ती नाल दारावर लावावी याचा यु शेप आकाशाकडे असावा अशा पद्धतीने लावावी. संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना दोन दिवे लावावे किंवा दारासमोर बल्प लावावा. असा प्रयत्न करावा की घराच्या उंबरठ्यावर कधीही अंधार पडू नये.

घराच्या समोरच एक तळे, गटार, विहीर चौफुली चार रस्ते जिना किंवा दुसऱ्यांच्या घराचा कोपरा असू नये. त्याबरोबरच मोठे झाड किंवा खांबही अशुभ असते. दारासमोर गाय बकरी किंवा दुसरे कोणतेही प्राणी बांधलेले हे असू नये. एखाद्या मोठ्या झाडाची सावली सकाळच्या ९:०० वाजेपासून तर दुपारच्या तीन वाजेपर्यंत जर घरावर पडत असेल तर तेही खूप अशुभ असते.

मंदिराची किंवा मंदिराच्या झेंड्याची सावलीही घरावर पडत असेल तर तेही अशुभ असते. घराचे मुख्य द्वार इतर द्वाराच्या तुलनेत मोठे व प्रशस्त असावे. त्याची उंची त्याच्या लांबीच्या दुप्पट असावी असे वास्तुशास्त्र सांगते. शक्यतो आतल्या बाजूने ते उघडणारे असावे बाहेरच्या बाजूने उघडणारे असेल तर प्रत्येक कार्यात बाधा निर्माण होते. दार उघडताना व बंद करताना करकर असा आवाज येत असेल तर हे आपल्या दारिद्र्यतेचे कारण बनू शकते. मुख्य दाराच्या बाहेरच्या बाजूस आणखी दुसरे दार लावल्यास ते अधिकच शुभ फलदायक असते.

म्हणून जाडीचे दार बसून घ्यावे. वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजांना रंग दयावा. काही कारणामुळे तुम्ही हा रंग तुमच्या मुख्य द्वारावर देऊ शकत नसल्यास त्या रंगाचे पेंटिंग किंवा चित्र तुम्ही दारावर लावू शकतात. घराचे मुख्य द्वार उत्तर दिशेला असेल तर रंग निळा किंवा आकाशी निळा असावा. मुख्य द्वार पूर्व दिशेला असेल तर त्याचा रंग पिवळा असावा. मुख्यद्वार जर दक्षिणेकडे असेल तर त्याला जांभळा रंग असावा. आणि जर घराचे मुख्य द्वार पश्चिमेकडे असेल तर त्याला पांढरा किंवा पिवळा रंग दयावा.

पश्चिम दिशेला दार असल्याने वास्तुदोष जर उत्पन्न होत असेल तर रविवारी सूर्योदय होण्यापूर्वी नारळ लाल रंगाच्या कापडामध्ये दारासमोर गाळावे. किंवा लाल रंगाच्या कापडात नारळ टांगून ठेवावे सूर्य मंत्राने हवन करून द्वार दोष कमी होतो. दक्षिण दिशेला घराचे मुख्य द्वार शुभ नसते यामुळे घरात नेहमीच संकट येतात. म्हणून बुधवारी किंवा गुरुवारी एक लिंबू किंवा सात कवड्या घेऊन एका दोर्‍यात मुख्य दाराला बांधावे.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *