दृष्टीकोण- बघायला येणारा प्रत्येक मुलगा तिला नाकारत होता. कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

प्रत्येक वेळी होणाऱ्या कांदे पोह्याच्या कार्यक्रमाला सीमा कंटाळली होती. आज तिला पाहायला पाचवा मुलगा येणार होता.आधीच्या चार मुलांनी काहीतरी वेगवेगळे कारण सांगून नाकारले होते. त्यामुळे आता तिला हे नको वाटत होते पण घरच्यांचा मान राखण्यासाठी ती तयार झाली.

मुलाची वाट बघता बघताच निरोप आला की मुलगा आताच लग्न करण्यासाठी तयार नाही आहे. त्यामुळे आज आम्ही येऊ शकत नाही . सीमा आणि तिच्या आईवडिलांना कळतच नव्हते की असे का होत आहे. कारण सिमामध्ये कमी असे काहीच नव्हते, गोरीपान, उंच ,मध्यम बाधा अगदी एखादया नायिका सारखी होती.

सीमाने कायद्याचे शिक्षण घेतले होत व नुकतीच एका वकीलाखाली शिकत होती. घरकामातही तिला कोणी मदत करत नव्हत ती स्वतः सर्व सांभाळून घेत होती. सीमाची आई प्रतीक्षा खूप परेशान झाली होती. सगळीकडून येणारा नकार तिला याबद्दल काहिच समजत नव्हत.

एकेदिवशी प्रतीक्षाची नणंद घरी आली आणि म्हणू लागली वहिनी भोगा आपल्या कर्माची फळ, कजात बाईच्या मुलीसोबत कोण लग्न करणार. नणंद म्हणाली तुम्ही आधी जे माझ्या भावासोबत वागलात ते लोक विसरले नाही अजून हे ऐकताच प्रतीक्षा एकदम भूतकाळात गेली.

जेव्हा तीच अमोलशी लग्न झाल होत अगदी महिन्याभरात सासरच्यांनी रंग दाखवायला सुरू केले होते. अमोल तिला दारू पिऊन खूप मारहाण करत असे, सासूही खूप काम करायला लावत असे, जेवणही व्यवस्थित करू देत नसे. सासरा शांत होता पण तोही यासर्व गोष्टींना अडवत नव्हता.

प्रतीक्षाने पदवी पूर्ण केली होती. लग्नानंतर ती नोकरी करणार नाही असे ठरले होते त्यातच सीमाचा जन्म झाला. सीमाला शाळेत घालायची जेव्हा वेळ आली तिच्या फी साठी सुद्धा घरी पैसे नव्हते. घर कर्जात होत. अमोलच्या वागण्याने परिस्थिती काही सुधारत नव्हती.

त्यामुळे प्रतीक्षा ला समजले की आपण परावलंबी आहोत म्हणून घरात हे वातावरण आहे. सीमा शिकली पाहिजे म्हणून तिने स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा निर्णय घेतला, आणि तिच्या टायपिंग कौशल्याने तिला क्लार्क ची नोकरी मिळाली देखील. प्रतीक्षा च्या या नोकरीमुळे घरातील आर्थिक स्थिती लवकरच सुधरली.

आता प्रतीक्षा चे पती व सासू तिला चांगली वागणूक देऊ लागले. हे सर्व आठवून प्रतीक्षाच्या डोळ्यात पाणी आले व ती नणंद ला म्हणाली तुम्हाला मी केलेले कष्ट व मला माझ्या घरच्यांनी दिलेली वागणूक तर माहीतच आहे तरीही तुम्हाला वाटत की मी अजात आहे भांडखोर आहे?

तेव्हढ्यात सीमा म्हणाली लोकांचा दृष्टिकोन कसाही असो मला माझ्या आईवर गर्व आहे. आणि जो मुलगा व त्याच्या घरातील सदस्य माझ्या आईचा मान ठेवील त्याच्याशीच मी लग्न करीन. तितक्यात घराची बेल वाजली प्रतीक्षा ने दार उघडले.

प्रतीक्षा च्या माहेरकडे राहणारे जोडपे आले होते ते त्यांचा मुलगा दीपक याच्यासाठी सीमाचा हात मागायला आले होते. दिपकनेही सीमाला तिच्या मामाकडे आल्यावर बघितले होते त्यामुळे सीमा त्याला आधीपासूनच आवडायची. त्यानंतर सीमा आणि दिपकचे लग्न अगदी थाटामाटात पार पडले.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *