ग्रामीण भागातील आयुर्वेदिक उपाय प्रत्येक व्यक्तीला खायला द्या.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत जर तुमच्या घरात मुल असतील तर पालक म्हणून तुमचे कर्तव्य आहे की, आपल्या मुलाची रोगप्रतिकारक शक्ती कशी मजबूत राहील व आपली मुल इतर व्यक्तींच्या संपर्कात येणार नाही. सध्याचे बदलणारे वातावरण तसेच ऋतुबद्दल पाण्यात होणारे बदल यामुळे बऱ्याच लहान मुलांना या दिवसात डायरिया ,जुलाब, व उलटी होते.

तसेच सर्दी, पडसे या दरम्यान जास्त पाहायला मिळते. त्यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती मजबूत राहण्यासाठी तुम्हाला काही खबरदारी घ्यावी लागणार आहे. वातावरण बदल झाला की पाणी शुद्ध करून मुलांना देण त्याने त्यांची प्रतिकारशक्ती चांगली राहील. तसेच आहारामध्ये जर तुम्ही पुढील काही पदार्थ दिले तरी मुलांची प्रतिकारशक्ती चांगली राहील. आणि ही मुले या आजारापासून स्वतःला दूर ठेऊ शकतील.

सध्याच्या संक्रमणाच्या काळामध्ये सर्व नकारात्मक बातम्या कानावर पडत आहे. या बातम्यांचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होतो म्हणून प्रतिकारशक्ती कमी होते. म्हणून घरामधील जे वातावरण आहे ते वातावरण नेहमी चांगले ठेवा. आणि मुलांना नेहमी सकस आहार द्या. त्यामुळे ही मुले मानसिकदृष्ट्या मजबूत राहतील.

प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी जे अन्न आपल्या मुलाला देणार आहात ते अन्न नेहमी ताजे दिले पाहिजे. शिळे अन्न देऊ नका तुमच्या मुलांनी ८ ते ९ तास झोप घेतली पाहिजे याची काळजी घ्या. तसेच सकाळी उठल्यावर व्यायाम किंवा योग केला तर त्या मुलांचा तणाव कमी होईल व ती मुले मानसिकदृष्ट्या मजबूत बनतील. शरीराची व फुस्फुसाची शक्ती वाढवण्यासाठी या गोष्टी नक्कीच प्रयत्नशील ठरतात.

तसेच आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहार खूप महत्त्वाचा आहे. आपली मुल सकाळी उठल्याबरोबर त्यांना उडदाची डाळ खायला द्या. त्यासाठी रात्रभर अर्धी वाटी डाळ पाण्यात भिजवुन घाला व सकाळी ती खा. आयुर्वेदामध्ये औषध म्हणून उडदाच्या डाळीचा उपयोग केला जातो. आपल्याला फोतर असलेली उडीद डाळ खायची आहे. या डाळिंत भरपूर प्रमाणात प्रोटीन असते कार्बोहायड्रेट भरपूर असत व व्हिटॅमिन्स ब सुद्धा भरपूर प्रमाणात असते.

त्यासोबतच आयरन, कॅल्शियम सुद्धा असते म्हणजेच ज्या गोष्टी शरीराला आवश्यक असतात. त्या सर्व गोष्टी या डाळीत असतात. म्हणून तर लहान मुलांना ही डाळ हेल्थ टॉनिक चे काम करते. या दिवसात वातावरणात बदल होतो बऱ्याच मुलांना डायरिया ,जुलाब लागणे व कावीळ अश्याप्रकारचे आजार होतात त्या आजारावर ही डाळ फायदेमंद ठरते. ज्या व्यक्तीला लिव्हर ची कार्यक्षमता व लिव्हरला साफ करायचे आहे ते लोक ही डाळ खाऊ शकतात.

या डाळीमुळे शरीरातील कोलेस्टेरॉल स्तर नियंत्रित राहते. वाढत्या वाटतील मुलांना हाडे मजबूत राहण्यासाठी उडीद डाळ अत्यंत फायदेशीर आहे. म्हणून फार पूर्वीपासून घरातील वयस्कर मंडळी त्यांच्या मुलांना उडीद डाळ खायला द्यायचे. उडीद डाळ खाल्याने रक्तपेशी बनण्यास मदत होते.

त्यामुळे शरीरातील सर्व अवयवांना सुरळीत रक्तपुरवठा होतो. व फुस्फुसाची कार्यक्षमता वाढते म्हणून तूमच्या मुलाला रात्री भिजू घातलेली उडीद डाळ नक्की खायला द्या. तुमच्या मुलाची प्रतिकारशक्ती वाढेल.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *