एक ग्लास त्याच्या बदल्यात या मुलाने मोठ्या पणी मुली सोबत जे केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

ही सत्य घटनेवर आधारित गोष्ट आहे. ही गोष्ट आहे गरीब घरातील एका छोट्या मुलाची त्यांच्या कुटुंबाकडे जास्त पैसे नव्हते. छोटा मुलगा लहान सहान खेळणी विकून पैसे कमवत होता. आणि त्याच पैशांनी आपल्या शाळेची फी भरत होता.

एके दिवशी तो असाच दुपारी विक्रीसाठी निघाला होता आणि सकाळ पासून त्याने काहीही खाल्ले नव्हते. त्याला जोराची भूक लागली होती. त्याने मनात विचार केला की आपण ज्या घरासमोर सामान विक्रीसाठी जाऊ त्यावेळेस सामान विक्री केल्यानंतर पैशाच्या बदल्यात जेवायला मागू.

तो एका घरी गेला, बेल वाजवली आणि घरातून एक मुलगी समोर आली. आता तो हैराण झाला आणि गडबडीत त्या मुलीला पाहून त्याने एक ग्लास पाणी मागितले. ती मुलगी किचन मध्ये गेली आणि विचार करू लागली.

हा मुलगा खूप हैराण झाला आहे. प्रत्येक घरी जाऊन सामान विकतोय बहुतेक त्याला भूक लागली असेल. म्हणून त्या मुलीने एक ग्लास पाणी ऐवजी एक ग्लास दूध घेतले आणि तो दुधाचा ग्लास मुलाला दिला.

मुलगा ते दूध हळू हळू पिऊ लागला आणि मनामध्ये विचार करू लागला की खरच या जगात चांगली माणसे अजून आहेत. माणुसकी जून जिवंत आहे. दूध पिऊन झाल्यावर त्याने तो ग्लास त्या मुलीला माघारी दिला व तो मुलगा त्या मुलीला म्हणाला या एका दुधाची किती पैसे मी तुम्हाला देऊ.

ती मुलगी म्हणाली नाही नाही. माझ्या आईने मला शिकवले आहे की कोणाचीही मदत केली तर त्यांच्याकडून पैसे घेऊ नको. मी तुझ्या कडून पैसे नाही घेऊ शकत. तर तो मुलगा म्हणाला ठीक आहे तुमचे मनापासून आभार मानतो आणि मुलगा तिथुन निघुन गेला.

मुलगा ज्यावेळेस घरी चालला होता. तर त्याच्या मनात विचार येत होता. या दुनियेत माणुसकी अजूनही जिवंत आहे. त्यानंतर अनेक वर्षे त्याने मेहनत केली सामान विकत राहिला शाळेत शिकत राहीला.

अनेक वर्ष त्याने मेहनत केली, सामान विकत राहिला. शाळेची फी ते तो शिकत राहिला त्यानंतर कॉलेज ही असेच पूर्ण केले. तो शिकून डॉक्टर झाला आणि थोड्याच वर्षात तो एक चांगला डॉक्टर बनला.

आता तो मोठ्या शहरात एक नामांकित डॉक्‍टर बनला होता. त्या मुलाचं म्हणजे त्या डॉक्टरचे नाव होरबट केलीन. एके दिवशी ते हॉस्पिटल मध्ये बसले असताना त्यांना कळले की, एक मुलगी त्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले आहेत. तिची कंडीशन खूप सिरीअस होती.

तिचे नाव व पत्ता पाहिल्यानंतर त्यांना कळून चुकले की, ती मुलगी त्या गावचे आहे. जिथे मी राहत होतो, त्या गावच्या गल्ली बोळातून सामान विकत होतो. त्याला सगळे एकाच झटक्यात आठवले.

मग त्याला कळले की, त्या मुलीच्या आयुष्यात काही चांगले झाले नाही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती बिघडली होती. तिची तब्येत ही खराब झाली होती. त्या मुलीला तिथल्या डॉक्टरांनी या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी पाठवले होते.

हरवत केली डॉक्टरने पूर्ण ताकतीनिशी मोठ्या एक्सपर्ट डॉक्टरांशी चर्चा केली आणि त्या मुलीची ट्रीटमेंट केली. ती मुलगी ठीक ही झाली. ती एकदम ठणठणीत बरी झाली होती. आता त्या मुली जवळ ट्रीटमेंट चे बिल जाणार होते.

ते बिल ज्यावेळी देणार होते. त्यावेळेस डॉक्टरांनी या बिलाच्या वर लिहिलेला एक कागद लावला आणि तो कागद आणि बिल एका लिफाफ्यात घालून पाठवून दिले. तो लिफाफा नर्सने त्या मुलीच्या हातात दिला व म्हणाली हे ट्रीटमेंटचे बिल आहे.

आता ती मुलगी विचार करत होती. आता पूर्णपणे बरी झाली आहे. पण आता हे बिल मी कसे भरू. हा मोठा यक्ष प्रश्न त्या मुली समोर उभा होता. तो लिफाफा ती मुलगी हळूहळू उघडून पाहू लागली. त्यातील एकेक कागद पाहू लागली. त्यामध्ये काही रिपोर्ट ट्रीटमेंट संदर्भातील कागदपत्रे होते.

त्या रिपोर्टवर एक लहान कागद चिकटवला होतात. त्या कागदावर काहीतरी लिहिले होते. ते तिने काळजीपूर्वक वाचले त्यावर लिहिले होते की घाबरण्याचे काही कारण नाही. तुमच्या ट्रीटमेंटचे बिल खूप वर्षापूर्वी एक ग्लास दूधाने भरले गेले आहेत. त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आले होते.

डॉक्टर केलीन तिच्या समोर येऊन उभे राहिले आणि तिला म्हणाले खूप वर्षांपूर्वी मी तुमच्या गल्लीत सामान विकण्यासाठी आलो होतो. त्यावेळेस मला खरच खूप भूक लागली होती आणि तुम्ही मला एक ग्लास दूध दिले होते. आणि माझी भूक भागवली होती.

ही छोटीशी घडलेली सत्य घटना आपल्याला खूप काही शिकवून जाते. आयुष्यात जर तुम्ही चांगले काम कराल तर तुमच्यासोबत चांगले होईल. जर वाईट केले तर तुमच्यासोबत नक्कीच वाईट होणार. कर्म सगळ्यात मोठी गोष्ट आहे.

मित्रांनो ही माहिती आवडलली असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *