लग्नाला ३ वर्ष झाली होती, तरीही मूल होत नव्हते. रडून जाणारी हृदयस्पर्शी कथा- सोबत

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

काय झाल ग केलीस का टेस्ट सकाळी सकाळी पूजा स्वयंपाक घरात आल्यानंतर मालती बाईंनी प्रश्न केला. नाही हो आई निगेटिव आहे रिझल्ट, हम ते काय दरवेळी ठरलेलच आहे उगाच कशाला आशा लावते. त्यापेक्षा जाणा निघून इथून म्हणजे आमच्या मागची पीडा जाईल कायमची.

कशावर बाळला आमचा प्रसाद ददेव जाणे. किती सुंदर शिकलेल्या श्रीमंताच्या मुली सांगून येत होत्या. पण नाही दिल गया गधीपे तो परी क्या चीज हे. मालती बाईचा एकेक शब्द पूजाचा काळीज चिरून टाकत होता. तरीही हे सगळे तिला नवीन नव्हतच.

गेले दोन वर्षे ती दर महिन्याला हेच ऐकत होती. वैताकून गेली होती दवाखाने, डॉक्टर, वैद्य एवढेच काय तर बाबा महाराजांचे सुद्धा पाय धरून झाले होते. पण काहीच फरक पडत नव्हता, येता-जाता मालतीबाई टोमणे मारत.

सुरुवातीला नातेवाईक आडून आडून आणि आता उघडपणे विचारू लागले होते. ३ वर्ष झालीच होतीना पुजा आणि प्रसादच्या लग्नाला. पूजा आणि प्रसादच लव मॅरेज पण अगदी संगीत मुहूर्त वगैरे पाहून करून दिलेल.

कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून दोघे एकत्र, एकाच ब्रांच मध्ये नोकरी करणारे. दोघांनी अगदी रीतसर घरातल्यांची परवानगी काढून लग्न करून घेतल. तस म्हटलं तर पूजा मालतीबाईना कुठे मनापासून आवडली होती. पण मधुरारावांनी समजावल आणि प्रसादच्या हट्टापुढे त्यांच काही चालल नाही.

त्या पूजाचा राग राग करायच्या हे येत नाहीत ते येत नाहीत सतत चुका काढायच्या. पूजाला त्यांचा राग माहिती होता की त्यांच्याकडे दुर्लक्ष करत. माधवराव खूप सांभाळून घेत. प्रसाद तर कायम तिला आधार देत पण तू सुद्धा वैतागला होता.

आईची चिडचिड, पुजाचा हळवेपण त्याला समतोल साधता येत नव्हता. त्याच्या शब्दाखातर पुजा नोकरी न करता घराला संपूर्ण वेळ देत होती. आईकडून एखादा शब्द प्रेमाने मिळावा यासाठी जीवाचा आटापिटा करत होती हे तर प्रसादला हे दिसत होत. पण आई पुढे तो काही जास्त बोलू सुद्धा शकत नव्हता.

मात्र अलीकडे मालती बाईंच्या चिडचिडीचे रागाचे प्रमाण वाढले होते. लग्नाला तीन वर्ष होऊन गेली तरी पूजाला मुल होत नाहीत घराण्याचा वंश वाढणार कसा? पूजा आणि प्रसाद चे सर्व दवाखाने करून झाले. दोष कुणातच नव्हता.

आज मालतीबाईंनी ठरवल होत काय तो सोक्षमोक्ष लावायचा. संध्याकाळी सगळे जेवायला एकत्र जमले. प्रसाद माझा आता वय झाल, तू लग्न तुझ्या इच्छेने केलय आम्ही तुला विरोध केला नाही. मात्र डोळे मिटण्याआधी एकदा तरी नातवंड खेळवावे असे मला वाटत असेल तर चूक आहे का?

आपण काही दवाखाने कमी केले का ल? कोणता पर्याय ठेवला का? म्हणून मला अस वाटत तू पूजाला घटस्पोट द्यावा. कमीत कमी नातवंडाचा सुख तरी मला मिळू दे. प्रसाद माधवराव अगदी स्तब्ध झाले कोणालाच काय बोलावे हे कळेना.

पूजा मुसमुसत आत निघून गेली कसाबसा जेवण उरकून प्रसाद रूम मध्ये गेला. पूजा शांतपणे बसली होती प्रसाद आज जाताच पूजा म्हणाली, प्रसाद मी खूप विचार केला आणि मला आईचा निर्णय योग्य वाटतो. त्यांना नातवंड बघा वाटणे हे सहाजिकच आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे.
तो हिरावून घेणारे आपण कोण मी तुला घटस्फोट द्यायला तयार आहे.

आपण लगेचच सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण करायला सुरुवात करु आणि वय वाढल तर परत कॉम्प्लिकेशन वाढत जातील. वेड लागलय का तुला काय बोलतेस हे तुझ तुला कळतय का? हेच करायच होत तर कशाला घरातल्यांची परवानगी मिळवली लग्नाला, का माझ्या एका शब्दावर स्वतःच्या करिअरची वाट लावलीस. का एवढ्या दिवस आईचा राग सहन करत राहिलीस.

सोडूनच जायच होत तर आधीच जायच ना प्रसाद मी हौसेने घेतलाय का निर्णय? नाही मला होत मुल मी काय करू, माझ्या हट्टासाठी त्यांचा आनंद का हिरावून घेऊ मी यात आनंद हिरावून घेण्याचा प्रश्नच नाही येत. आणि दोष आपल्या दोघात सुद्धा नाही तू स्वतःला का दोषी समजतेस.

तस असेल तर तुझ्या एवढा दोष माझ्या सुद्धा आहेत की, पूजा नको असला विचार करूस मी आईला समजावतो. यावर काहीतरी मार्ग निघेल. असेल आपल्या नशिबात तर नक्की आपल्या घरात बाळ येईल. मात्र त्यावेळी माझ्यासोबत तू असली पाहिजेत.

चारच दिवसात प्रसाद बालिका आश्रमातून फॉर्म घेऊन आला. सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्या आणि अवघ्या तीन वर्षाची सिद्धि पूजा आणि प्रसाद च्या आयुष्यात आली. माधवरावांचा या निर्णयात सिंहाचा वाटा होता.

मालतीबाई थोड्या नाराज आहे, पण सिद्दीच्या बालपणात रमुन जातात. पूजा मात्र खुश आहे तिच्या आयुष्यात सिद्धीच्या येण्याने आणि प्रसादने खंबीर साथ दिल्याने.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *