अंगाला शहारे आणणारा स्वामींचा अक्कल कोटला घडलेला एक अद्भुत अनुभव..!

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपले स्वामी म्हणतात अरे कितने हजार आख फोडे तुमने.
अक्कलकोट नगरीत प्रत्यक्ष परब्रह्म अवतरले होते. स्वामी महाराज असंख्य लीला करत असत. स्वामींच्या लिला इतक्या असंख्य होत्या की, कोणीही असुदे. मग एक भक्त म्हणून बोला किंवा चिकित्सक. त्याला स्वामींच्या दर्शनाची ओढ लागेल

असेच एकदा एक इस्लाम धर्माचा डॉक्टर स्वामींची कीर्ती ऐकून दर्शनासाठी आला. त्या वेळेला स्वामी महाराज स्वरूपानंदात रमलेले होते. स्वामींचे आजानुबाहू रूप बघून दिव्य तेजोमय कांती बघून त्याचे क्षणभर डोळेच दिपले म्हणा.

त्याने स्वामींचे दर्शन घेतले आणि बाजूला हात जोडून उभा राहिला. अचानक स्वामींनी त्याच्याकडे बघितले आणि बोलले अरे कितने हजार आख फोडे तुमने स्वामींचे हे बोलणे ऐकताच तो आश्चर्यचकित झाला. आणि बोला स्वामींना हे कसे समजले की मी डोळ्यांचा डॉक्टर आहे.

डॉक्टरने स्वामींचे चरण पकडले आणि प्रार्थना करत बोलू लागला की, स्वामी महाराज आपण पूर्ण अवतारी आहात. आता मलाही पूर्ण खात्री पटली आहे. त्यानंतर तो आपल्या गावी गेला. अतिशय कौतुकाने स्वामींच्या लीलांचे तो गुणगान गाऊ लागला.

पुढे तो अधून मधून सर्व कुटूंबाला घेऊन स्वामींच्या दर्शनासाठी येत. आणि स्वामी सुद्धा त्याला मोठ्या प्रेमाने दर्शन देत. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी भक्तहो माणूस जेव्हा जन्माला येतो. तेव्हा तो कुठल्याही धर्माचा आहे असा शिक्का मारून जन्माला येत नाही.

धर्म तर मानवाने निर्माण केलेले आहेत. परंतु जेव्हा तो जन्माला येतो. तेव्हा त्याच्या अंतर्मनात मागील जन्मातील कर्माचे ठसे कोरलेले असतात आणि त्या अनुषंगाने या जीवनात एक पात्र तो निभावत असतो.

अर्थात आजच्या लिलेत स्वामींनी लिला करत एका इस्लाम धर्माच्या व्यक्तीला तू डॉक्टरांचे पात्र निभावत आहेस आणि इतकेच नव्हेस तर डोळ्यांचा डॉक्टर आहेस. हे अंतर साक्षित्वाने ओळखून हेच सांगितले की कोणी कोणत्याही धर्माचा असू दे मग त्याचे पूर्वकर्म पूर्व प्रारंभ बोला, पूर्वसंचित बोला हे सर्वकाही स्वामींना माहित आहे.

कारण ह्या विश्वात ईश्वर एकच आहे. प्रत्येकाच्या कर्माची फळ देणारी शक्ती एकच आहे. तिचे अनेक नाव आहेत आणि आजपर्यंत त्या शक्तीला श्री स्वामी समर्थ असे म्हणतो.

थोडक्यात आज आपल्या आजच्या पिढीचा नाही स्वामी हाच संदेश देत आहे ही एक शक्ती आहे. याच शक्तीने अक्कलकोट येथे मानव शरीर हे समस्त मानवाच्या कल्याणासाठी धारण केले आहे.

म्हणून ही स्वामी शक्ती ही कोणा एका धर्माची होत नाही. आणि स्वामींच्या या मानव शरीर अवताराचा उद्देश असा की, मानवाच्या जीवनात त्याच्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने दुःख व संकटे येत असतात आणि मानव हतबल होऊन आपल्या पूर्व प्रारब्ध व संचितावर आपण सोडून देतो आणि निष्क्रिय होऊन मनाचा गुलाम होतो.

कृत्रिम जीवन जगतो. अर्थात तो ईश्वराचा अंश आहे, तो स्वामींचा बाळ आहे. हि दिव्य समज देऊन त्या दिव्य विश्वास जागृत करून त्यांच्या मनात आणन्य भक्तीचा संचार करून त्यांच्या मनात संचार करून तो मायेतून मुक्त होऊन. त्याने
आनंद जीवनाची अभिव्यक्ती करावी.

यासाठी ही शक्ती विविध युगात सगुण रूपात येऊन विविध लिला करत आहे. बघा आजच्या लिलेत इस्लाम धर्माचा डॉकटर सहकुटुंब स्वामींचा भक्त बनतो. स्वामींसाठी सर्व सारखेच आहे. स्वामी सर्व मानवजातीला मायेचा हात देऊन चुकीच्या धोरणातुन मुक्त करून. त्याला आनंद मदतीचा हात देऊन आत्मनिर्भर बनविण्यासाठी आलेले आहेत.

मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पो-स्ट मागचा उद्देश नाही. फ-क्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हे-तू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज क-रून घे-ऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *