पैशाला चुकूनही वाईट बोलू नये. नाहीतर आयुष्यात होऊ शकतात या घटना, ज्या आपल्याला नको असतात.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

चांगल्या प्रतीचे जीवन जगण्यासाठी पैसा नाती आणि भावना या सोबतच माणुसकीची आवश्यकता असते. सोबतच तुम्हाला जीवनात नक्की कशाला प्राधान्य द्यायचा आहे हे ठरवण सुद्धा आवश्यक असत. तुम्ही पैसे कमवा नाती आणि मित्र आपोआप तयार होतात. मात्र पैशाला कधीही नाव ठेवू नका. का चला सविस्तर माहिती जाणुन घेऊया.

माणसान पैसा जरूर कमवावा कारण पैसा एक विचित्र गोष्ट आहे. ज्याच्या जवळ नसतो त्याला कोणी किंमत देत नाही आणि ज्याच्या जवळ असतो तो कुणाला किंमत देत नाही. अशी पैशाची परिस्थिती असते. पैशाला नाव कधी ठेवू नये. कारण जेव्हा गरज पडते तेव्हा माणूस पैशासाठी रडतो.

ज्या व्यक्तीने घाम गाळून पैसा कमावला आहे तो पैशांची बरबादी कधीच करत नाही. जे लोक पैशाचा जास्त मोह करतात ते जीवनात कधीही सुखी राहत नाही अस म्हणतात. प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त पैसाच पाहणाऱ्यांना आधी पैसे कमवण्याची चिंता असते आणि नंतर त्याला सांभाळण्याची चिंता असते.

पैसा जास्त झाला तर तो चोरीला जाईल त्याचीही नेहमी भीती वाटत राहते. याचबरोबर दुसऱ्यांच्या पैशावर मजा करणारे स्वतः स्वतंत्र अस्तित्व कधीच निर्माण करू शकत नाही. जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांचे जीवनात चांगली माणसं सुद्धा कधीच टिकत नाहीत. आयुष्यातील सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पैसा असतो.

तुम्ही कधीही नाही बोलतात तरी हेच खरच जेव्हा खिशात एक रुपया सुद्धा नसतो तेव्हाच त्याची किंमत कळते. जर तुम्ही कधी कोणाला उस्ने पैसे देत असाल तर तेव्हाही देताना दहा वेळा विचार करावा. कारण आपलेच पैसे आपल्याला चोरासारखे मागावे लागतात. आणि सामोरची व्यक्ती तारखेवर तारीख आपल्याला देत असतात.

पैसा वाचवला तर अडचणीच्या वेळी पैसा तुम्हाला वाचवेल हेही तितकच खरं. एखादी व्यक्ती कशी आहे हे जाणून घ्यायचं असेल तर पैसे गेल्यावर त्यानं कसं वर्तन केलं ते काळजीपूर्वक पाहव. असे म्हणतात पैशावर विश्वास ठेवू नये. पण पैसा विश्वासाच्या ठिकाणीच लावावा. एकदा कोणीतरी पैशाला म्हटलं की तू ही तसा कागदाचा तुकडाच आहेस.

पैसा हसून म्हणाला आहे खरा मी कागदाचा तुकडा पण आजपर्यंत मी केराची टोपली पाहिली नाही. पैशाशिवाय तुम्ही तरुण होऊ शकतात. परंतु त्याशिवाय तुम्ही वृध्द होऊ शकत नाही. वेळही पैसा पेक्षा अधिक मौल्यवान आहे. आपण अधिक पैसे मिळूवू शकता परंतु आपल्याला अधिक वेळ कधीच मिळू शकत नाही.

भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील मानस दाखवतो. पैसा ही अशी गोष्ट आहे ज्याच्या जवळ असेल तोच हवेत दिसेल. श्रीमंत होण्यासाठी कष्टा सोबतच बुद्धी आणि नियोजनाची जोड लागते. नुसत्या काबाडकष्टांना श्रीमंत होता येत नाही. आपल्याला समजत नाही अशात कधीही पैशाची गुंतवणूक करू नये.

अस म्हणतात तुमचा पगार तुम्हाला श्रीमंत बनवत नाही तर तुमच्या पैसा खर्च करण्याच्या सवयी तुम्हाला श्रीमंत बनवतात. फुकटचा पैसा कामचुकार आणि लाचार बनवतो. कष्टाचा पैसा स्वाभिमान शिकवतो. पैशाने सगळ्याने नाही परंतु बऱ्याचशा गोष्टी खरेदी केल्या जाऊ शकतात.

पैसा हा एक वाईट मालक असला तरी तो एक उत्तम लॉकर सुद्धा माणला जातो. माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याच शरिर आणि त्याची मनस्थिती चांगली असावी. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसाना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही असं म्हणतात.

अनेक जण म्हणतात पैसा आला की मी काहीतरी करेल. पैसा म्हणतो तू काहीतरी कर मगच मी येईल. बरेच लोक कमवलेले पैसे त्यांना नको असलेल्या गोष्टी विकत घेण्यासाठी आणि त्यांना आवडत असलेल्या लोकांना प्रभावित करण्यासाठी खर्च करतात. जेव्हा तुम्ही स्वतःला गरीब म्हणवता तेव्हा तुम्ही आयुष्याची लढाई हरलेली असता. म्हणुन कधीही स्वतःला गरीब म्हणू नये.

आपण किती पैसा मिळवला यापेक्षा तो खर्च करून आपण किती समाधान मिळवलं जो जानतो तोच खरा आनंदी व्यक्ती असतो. जेव्हा स्वतः पैसे कमवायला लागतात तेव्हा कळतं की शोक तर आई-बाबांच्या पैशात पुर्ण व्हायचे. आपल्या पैशात फक्त गर्जा पूर्ण होतात.

त्यामुळे परिस्थिती कशीही असो पैशाची किंमत नेहमी केलीच पाहिजे. कारण पैशात देवी लक्ष्मीचा वास असतो. आणि तिचा जराही अपमान झाला तर तिला काढता पाय घ्यायला जराही वेळ लागत नाही. त्यामुळे कधीही पैशाला नाव ठेवू नये असे सांगितले जाते.

पैशा संबंधी तुमचे विचार काय आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *