६ मार्च २०२३ होळीच्या दिवशी १० पैकी एक तरी उपाय करा, होईल धनलाभ..!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

येत्या ६ मार्चला आहे होलिका दहन. होळीची रात्र खूप विशेष असते. या रात्री जर तुम्ही काही खास उपाय केलेत तर तुमच्या जीवनातील सगळ्या समस्यांच निराकरण होऊ शकत. चला तर मग बघूया की होळीच्या रात्री केले जाणारे दहा उपाय या दहा उपायांपैकी तुम्ही कुठलाही एक उपाय केला तरी सुद्धा तुम्हाला त्याचा लाभ होतो. चला तर मग सुरुवात करूया.

१) होळीच्या दहनादिवशी होलीकेत स्वतः वरून काढलेले उठणे जाळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. २) घर दुकान आणि कामाच्या ठिकाणची दृष्ट काढून होलिकेत जाळण फायदेशीर ठरत. म्हणजे होळीच्या रात्री तुम्ही तुमच्या घरातली दुकानाची किंवा कामाच्या ठिकाणाची दृष्ट काढून होलीकेमध्ये जाळा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

३) भय आणि ऋणातून मुक्त होण्यासाठी नरसिंह स्तोत्राचे पठण करण लाभदायक ठरत. ४) होलिका दहनानंतर जळत्या अग्नीत नारळ टाकल्याने कामातील अडथळे दूर होतात. म्हणजे तुमचे एखादा काम अडला असेल हे होतच नसेल तर होळीमध्ये एखादा नारळ नक्की टाका.

५) जर कोणी सतत आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनानंतर उरलेली रुग्णाच्या झोपेच्या जागेवर थोडीशी टाकावी. त्यामुळे रुग्णाच्या आरोग्याला फायदा होतो.
६) यशासाठी होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ विडा आणि सुपारी अर्पण करा. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.

७) घरगुती त्रासापासून मुक्ती आणि सुख शांतीसाठी होलीके अग्नित जवाचे पीठ अर्पण करावे. ८) होळी झाल्यानंतर होळीची जी राख असते ती राख घ्या एक लाल रुमाला मध्ये बांधा आणि ही पुरचुंंडी तुमच्या तिजोरी मध्ये किंवा जिथे कुठे तुम्ही पैसा ठेवतात त्या ठिकाणी ठेवा की तुम्हाला जाणवेल तुमचा अनावश्यक खर्च कमी होत आहे.

९) होळीच्या रात्री एका मंत्राचा जप केल्यामुळे संपत्ती वाढते. तो मंत्र याप्रमाणे आहे.”ओम नमो धनदाय स्वाहा”या मंत्राचा जप केल्याने धनसंपत्तीमध्ये वृद्धी होते. १०) होलिका दहनाच्या रात्री २१ गोमती चक्र घेऊन शिवलिंगावर अर्पण केल्यास व्यवसायात लाभ होतो.

मित्रांनो हे होते ते दहा उपाय यापैकी तुमची जशी समस्या असेल त्या समस्येनुसार तुम्ही या दहा पैकी कोणताही एक उपाय करून बघा. श्रद्धा भक्ती ने उपाय करा म्हणजे त्याचा परिणाम दिसेल आणि होळीच्या दिवशी होळीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य नक्कीच दाखवा. आणि होळीमध्ये तुमच्या मनातली नकारात्मकता वाईट विचार सुद्धा जळून जाऊ देत..

आणि सगळ काही निर्मळ स्वच्छ सुंदर होऊ देत. आपल्या प्रत्येक सणाला व्रताला एक विशिष्ट अर्थ असतो. तो अर्थ समजून घेऊन जर आपण साजरा केला तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये अमुलाग्रह बदल आपल्याला दिसून येईल. होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *