हट्टी, तापट, व्यसनी मुलांसाठी आईने ४० दिवस इथे दिवा लावावा. आणि चमत्कार बघा.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मुल लहान असू द्यात किंवा मोठी पण त्यांच्या संदर्भात त्या सगळ्या समस्या आई-वडिलांना व्यतीत करतातच. आणि म्हणूनच एक उपाय आहे जो प्रत्येक आईने करायचा आहे. हा उपाय केल्याने मुलांसंदर्भातल्या किंवा तुमच्या मुलीं संदर्भातल्या ज्या काही समस्या असतील त्या सुटायला नक्कीच मदत होईल.

तुम्हाला सकाळी देवपूजा झाल्यानंतर दिवा लावायचा तो दिवा मोहरीच्या तेलाचा असेल. त्याचबरोबर त्यामध्ये दोन काळया मिरीचे दाणे सुद्धा टाकायचे आहेत. आणि भीमसेनी कापूर टाकायचा आहे. कापसाच्या वातीचा हा दिवा हवा. दिवा तुम्ही कोणत्याही प्रकारचा वापरू शकता. मातीचा असेल किंवा पितळेचा असेल किंवा इतर कोणत्याही धातूचा असेल दिवा चालू शकतो. पण तो दिवा मोहरीच्या तेलाचा असावा.

हा दिवा लावल्यानंतर आईने काय करायचं आहे? हा दिवा लावल्यानंतर आईने आणखी एक काम करायचा आहे. ते म्हणजे देवा जवळ बसून (श्री स्वामी समर्थ) या मंत्राचा किंवा तुमच्या कुलदेवतेच्या मंत्राचा 108 वेळा जप मनोभावे करायचा आहे. आणि प्रार्थना करायचे आहे की आपल्या मुलांसंदर्भातील ज्या काही समस्या आहेत त्या सुटू दे म्हणून.

हा उपाय अत्यंत प्रभावी आहे असं सांगितलं जातं. या उपायामुळे जर तुमची मुलं अत्यंत लहान असतील चिडचिड करत असतील हट्टी पणा करत असतील काय झालं समजत नाही पण मुलं ऐकत नाहीत. अशी समस्या असेल तरी तुम्हाला मदत होईल त्याचबरोबर तुमची मुलं मोठी असतील आणि ती व्यसनी असतील किंवा तापट असतील किंवा सतत घराबाहेर राहत आहेत ऐकत नाहीत .कर्तव्य करत नाहीयेत . आपलीच मनमर्जी करत आहेत.

यासारख्या समस्या जरी असल्या तरीसुद्धा त्या समस्या सोडवण्यासाठी हा उपाय तुम्हाला मदत करेल मुलांच्या संदर्भातील समस्या आई-वडिलांचा जीव अगदी पोखरून टाकतात. आणि मग आई-वडिलांना असं होतं की आपल्या मुलाला चांगलं वळण लागावं किंवा मुलाचं सगळं चांगलं व्हावं यासाठी काय उपाय करावा. ते त्यांना समजत नाही आणि म्हणूनच हा उपाय तुम्ही करू शकता.

लक्षात घ्या हा दिवा तुम्हाला सतत ४० दिवस लावायचा आहे. मध्ये खंड पडता कामा नये. आता आणखी एक समस्या येईल मध्ये मासिक धर्म आला तर काय करता येईल. तर तेवढे तीन दिवस सोडून द्यायचे. आणि पुढे ती सेवा कंटिन्यू करायची. या पद्धतीने असा सलग ४०दिवस मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यानंतर श्री स्वामी समर्थांचा किंवा तुमच्या कुलदेवतेचा जप केल्यानंतर नक्कीच तुम्हाला अनुभव येईल की तुमच्या मुलांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सुटल्यात किंवा सुटत आहेत. पण या सगळ्यांमध्ये भक्ती भाव महत्त्वाचा आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *