२९ जून २०२३ आषाढी एकादशीला करू नका “या” गोष्टी. नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

२९ जूनला आहे आषाढी एकादशी आणि या एकादशीच्या दिवशी काय कराव आणि काय करू नये. हे तर माहीत असायलाच हव. माहित नसेल तर काळजी करू नका. चला जाणून घेऊया. आषाढाच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. त्याचबरोबर या एकादशीला महा एकादशी हरी एकादशी अशा अनेक नावांनी ओळखल जात. या एकादशीच्या व्रत भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे.

आषाढी एकादशी पासूनच चातुर्मास सुरू होतो. त्यामुळे या दिवसापासून पुढचे चार महिने कोणतेही शुभ कार्य केल जात नाही.कारण भगवान श्रीहरी विष्णू चार महिने योगनिद्रेमध्ये असतात अशी मान्यता आहे. त्यादिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा मात्र नक्की केली जाते. त्यामुळे इच्छित फलांची प्राप्ती होते. या दिवशी दानधर्म करणे देखील वेगळेच महत्त्व आहे.

आषाढी एकादशीच्या दिवशी काही नियम आहेत त्यांचे पालन करणे आवश्यक आहे जस की भगवान विष्णूंना पिवळा रंग प्रिया आहे. म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र विधान करावे. खास करून भगवान श्रीहरी विष्णू ची पूजा करताना आणि याच पूजेमध्ये पिवळ्या रंगाची फळ आणि फुल भगवान श्रीहरी विष्णूंना नक्की अर्पण करा. त्याचबरोबर तामसिक आहार सोडून द्यावा.

धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीच्या एक दिवस आधीपासूनच तामसिक आहार घेऊ नये. मांसाहार लसून कांदा यासारखे तामसिक पदार्थ खाऊ नयेत. विशेषतः उपवासाच्या दिवशी या पदार्थांचे सेवन चुकूनही करू नये. कोणत्याही प्रकारची व्यसन सुद्धा आषाढी एकादशीच्या दिवशी करू नये.

आषाढी एकादशीला नखे,केस दाढी कापू नये. त्या दिवशी साबण तेल या वस्तूंचा देखील वापर निश्चित मानला जातो. या दिवशी यत्ता शक्ति दान कराव. दान केल्याने भगवान श्रीहरी विष्णूची कृपा आपल्यावर होते. आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूची पूजा आपल मन शुद्ध होत.

आषाढी एकादशीचे व्रत हे सिद्धी देणार व्रत आहे. हे व्रत केल्याने माणसाला मोक्ष ही प्राप्त होता. हे व्रत केल्याने भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न तर होतातच पण मनोकामनापूर्ती सुद्धा करतात. आषाढी एकादशीची व्रत कथा जरी ऐकली. तरीसुद्धा आपली संकट आणि पाप दूर होतात. आता ज्यांना धनप्राप्तीची इच्छा असेल. त्यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीची पूजा देखील करावी.

आषाढी एकादशीच्या दिवशी पाळायचे काही नियम म्हणजे चुकूनही खोटे बोलू नका. एका आख्यायिका नुसार एका राज्याच्या राज्यात पावसाळा अभावी दुष्काळ पडला होता. तेथील लोक त्रस्त झाले होते. जेवणाची समस्या होती. त्यानंतर राजाने प्रजेसह देवशयनीय एकादशीचे अर्थात आषाढी एकादशीची व्रत केल आणि भगवान श्रीहरी विष्णूची पूजा केली. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूच्या कृपेने पाऊस पडला. पावसाची समस्या दूर झाली.

मित्रांनो तुम्ही यावर्षी आषाढी एकादशीचे उपवास करणारा असाल तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर सर्वात आधी तुमच देवघर स्वच्छ करा. एक असन बनवा त्यासनावर भगवान विष्णूची मूर्ती अथवा फोटो ठेवा. भगवान श्रीहरी विष्णूंची मनोभावे पूजा करा. पिवळे चंदन पिवळे वस्त्र पिवळी फुल सुपारीची पानहे सर्व त्यांना अर्पण करा.दीपप्रज्वलित करून प्रभूंची मनोभावे प्रार्थना करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *