नमस्कार मित्रांनो.
महाशिवरात्रीच्या दिवशी जी व्यक्ती व्रत पालन करते आणि महादेवा सोबत माता पार्वतीची पूजा करते या व्यक्तीच्या सर्व मनोकामना महादेव पूर्ण करतात अस म्हणतात. यंदा एक खास योगायोग तयार झालाय. त्यामुळेही महाशिवरात्री खास असणार आहे. मात्र महाशिवरात्री नेमकी कधी साजरी करावी.१८ की १९ फेब्रुवारीला? हा मोठा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.
महाशिवरात्री दर वर्षी माघ महिन्यातील कृष्णपक्ष चतुर्दशीला साजरी केली जाते.२०२३ रोजी १८ फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाईल.२०२३ सालच्या महाशिवरात्रीच्या दिवशी शनी प्रदोष व्रत देखील येतेय. त्यामुळे यंदाची महाशिवरात्र अत्यंत खास असणार आहे.पण महाशिवरात्री कधी साजरी करावी.म्हणजे १८ की १९ फेब्रुवारीला याबाबत काही शंका आहेत.चला या शंकेचे निरसन करूया.
शास्त्रानुसार महाशिवरात्रीची चतुर्दशी तिथि १८ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री ८:०३ मिनिटांनी सुरू होईल आणि १९ फेब्रुवारीला २०२३ रोजी दुपारी ४:१९ मिनिटांनी समाप्त होईल. यामुळे नेमकी महाशिवरात्र कधी साजरी करावी अशी शंका आहे.तर त्याच काय समाधान आहे आणि शास्त्र काय सांगते ते बघूया.
निशीथकालात शिव पूजन केले जाते.निशीथकाल १८ फेब्रुवारी रोजी ११:५१ मिनिटांना ते दुसऱ्या दिवशी रात्री १:१७ मिनिटांन पर्यंत असणार आहे. महाशिवरात्रीची शुभ मुहूर्त कोणते ते बघूयात.
पहिल प्रहर -१८ फेब्रुवारीला संध्याकाळी ६:४१मि.पासुन ते रात्री ९:४७मि.पर्यंत. दुसरा प्रहर -रात्री ९:४७मि.पासुन ते१२:५३मि.पर्यंत. तिसरा प्रहर -१९ फेब्रुवारीला दुपारी १२:५३ मि.पासुन ते ३:५८मि.पर्यंत. चौथा प्रहर – १९ फेब्रुवारीला २०२३ रोजी पहाटे ३:५८ मि. पासुन ते ७:०७ मि.पर्यंत
शनि प्रदोषाबदल बघायच झाल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शनिप्रदोष व्रत हा योगायोग ठरतोय.त्यामुळे या दिवसाच महत्व अधिकच वाढलंय.म्हणुन शनिदोषा पासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरेल.
म्हणुनच या दिवसापासून मुक्ती मिळवण्यासाठी महादेवाला काळ्या तिळाचा अभिषेक करावा अस ज्योतिष सांगतात. मंडळी या माहितीमुळे महाशिवरात्र नेहमकी कधी साजरी करावी. या शंकेचे निरसन झाले असेल अशी खात्री आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.