१९२१ नंतर पहिल्यांदा उद्या गुढीपाडव्याला बनत आहेत ४ राजयोग या ३ राशींची लागणार लॉटरी. ४ राशींच्या जीवनात राजयोग..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला अतिशय महत्त्व प्राप्त आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून गुढीपाडव्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. गुढीपाडव्याचा उत्सव मोठ्या थाटामध्ये साजरा केला जातो. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी चैत्र नवरात्रीची सुरुवात होत असते. मोठ्या थाटामध्ये या दिवशीची सुरुवात केली जाते. महाराष्ट्रात या दिवशी घर पूर्णपणे स्वच्छ करून सजवले जाते आणि त्यानंतर पहाटे अंगणात सुंदर गुढी उभारली जाते. गुढीची पूजा केली जाते.

नववर्षाचे स्वागत मोठ्या थाटामध्ये आणि आनंदात केली जाते. मान्यता आहे की या दिवशी राम वनवा संपून अयोध्या मध्ये परतले होते. त्यामुळे लोकांनी गुढी उभारून त्यांचे स्वागत केले होते. त्यामुळे या दिवशी गुढी उभारण्याची प्रथा आहे. मित्रांनो महाराष्ट्रामध्ये हिंदू नववर्षाचे स्वागत गुढी उभारून मोठ्या थाटामध्ये केली जाते. या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य गुढीला दिला शेतकरी बांधवांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो.

या दिवसापासून शेतीच्या नवीन कामाची सुरुवात केली जाते. यावेळी २२ मार्चपासून चैत्र नवरात्र सुरुवात होणारा असून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हिंदू नववर्ष सवंत् २०८० सुरू होणार आहे. यावेळी गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रहांचा अतिशय सकारात्मक आणि शुभ संयोग बनणार आहे. त्यामुळे हा संयुक्त राष्ट्रांच्या जीवनामध्ये अतिशय सुखाचा ठरणार असून चार राशींच्या जीवनामध्ये राजयोगाचे संकेत आहेत.

तीन राशींच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीचे भरभराट होईल यांच्या जीवनातील सर्व समस्या आता समाप्त होणार आहे. चार राशींच्या जीवनामध्ये आनंद आणि सुखाची बहार येणार आहे. तुमच्या जीवनामध्ये राजयोगासमान काळाची सुरुवात होणार असून येणारे अनेक वर्ष यांच्या जीवनामध्ये अतिशय सुखाचे जाणार आहे.

मित्रांनो गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मीन राशि मध्ये पाच ग्रहांचा संगम तयार होत आहे. म्हणजे पाच ग्रहांची युती बनत आहे. नववर्षात दोन राजयोग तयार होत आहेत. बुध आदित्य योग आणि गजकेसरी योग या दोन्ही योगाच्या शुभ संयोगाने नववर्षाची सुरुवात होणार आहे. यावेळी मीन राशि मध्ये सूर्य बुध चंद्र नेपच्यून बरोबर गुरु चार ग्रह एकत्र असून सह युती करत आहेत.

गुरु सह युती बनत आहे आणि याचा अतिशय शुभ आणि सकारात्मक अनुभव एकूण सात राशींच्या जीवनावर दिसून येणार आहे. मित्रांनो यंदाचा गुढीपाडवा या राशींच्या घटकांसाठी अतिशय लाभकारी ठरणार असून त्यांच्या जीवनातील नकारात्मक काळ पूर्णपणे समाप्त होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशी वर गुढीपाडव्याच्या अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. यंदाचे हिंदू नववर्ष आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार असून इथून पुढे जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहे. आपल्या अनेक दिवसांची वाढलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. येणारे वर्ष आपल्या जीवनामध्ये धनप्राप्तीच्या दुसरे लाभकारी ठरणार आहे. अनेक दिवसापासून आढलेला आपला पैसा आता आपल्याला प्राप्त होणार आहे. वडिलोपार्जित धनसंपत्तीची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे.

मानसन्मान यश कीर्ती पदप्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. आपण ठरवलेल्या योजना साकार बनतील. आपली ध्येय आता या काळामध्ये पूर्ण होणार आहेत. येणाऱ्या काळात प्रगतीचा काळ ठरणारा असून या काळामध्ये आपण जर उत्तम प्रयत्न केले तर निश्चित यश आपल्याला प्राप्त होणार आहे. याबरोबरच वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन यांसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. संततीच्या जीवनामध्ये सुखद घडामोडी घडवून येतील. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाची योग जमून येणार आहेत. आरोग्य विषयक काळ अनुकूल ठरणार आहे. करियर आणि कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीचे नवे संकेत मिळत आहेत.

२) मिथुन रास- मिथुन राशींच्या जीवनामध्ये अतिशय लाभकारी परिणाम दिसून येईल. मिथुन राशींच्या लोकांची जानेवारी महिन्यातच चणीच्या साडेसाती पासून सुटका झाली आहे. हिंदू नववर्षी सुरुवात आपल्यासाठी लाभदायी ठरू शकते. या वर्षात गुरु ग्रह आपल्या राशीमध्ये लाभ देणार आहेत. गुरु आपल्याला लाभ स्थानी असल्यामुळे गुरुचे पाठबळ आता आपल्याला मिळणार आहे. वर्षाच्या उत्तरार्धात सूर्य आपल्या भाग्य स्थानी येत आहे. त्यामुळे इथून पुढे खऱ्या अर्थाने प्रगतीला सुरुवात होणार आहे.

बुधादित्य योग गजकेसरी योगाच्या शुभ प्रभावाने आपल्या जीवनामध्ये सुंदर घडामोडी घडून येतील. नोकरीच्या संधी आपल्यासाठी चालून येऊ शकतात. गुढीपाडव्यानंतर येणारे दिवस धनलाभाचे दिवस ठरणार आहेत. आर्थिक प्राप्ती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तरीपण खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रहांची बनत असलेली स्थिती आपल्या राशीमध्ये अतिशय सकारात्मक ठरणार आहे. पारिवारिक जीवन आणि प्रेम जीवनासाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेमाचे नाते मधुर आणि मजबूत बनेल.

३) सिंह रास- सिंह राशीसाठी नववर्षी आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. सिंह राशींच्या जातकांसाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो. बुधादित्य आणि गजकेसरी योगाचे शुभ संयोगाने अतिशय सुंदर परिवर्तन घडून येणार आहे. हा संयोग आपल्या राशीच्या अष्टमस्थानी बनत आहे. त्यामुळे या ठिकाणी दोन राजयोग बनत आहेत. हा काळ सिंह राशीला आर्थिक घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होणार आहे.

तसेच कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. या ठिकाणी प्रवासाची योग देखील बनू शकतात. धार्मिक कार्यात सहभाग वाढू शकतो. तसेच या राशीच्या नोकरी अथवा व्यापार करणाऱ्या लोकांना चांगला लाभ प्राप्त होणार आहे. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. सरकारी कामांमध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. सरकार दरबारी अनेक दिवसापासून पडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. स्वतःमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण होईल. प्राप्त करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात.

४) तुळ रास- तूळ राशीच्या जीवनामध्ये हिंदू नववर्ष आनंदाची बहार घेऊन येणार आहे. इथून पुढे प्रगतीच्या अनेक दिशा आपल्याला मिळणार आहेत. आपल्या प्रत्येक योजना साकार बनतील. आपल्या जीवनामध्ये आता सुखाची सोनेरी पहाट होणार आहे. हा काय प्रचंड प्रगतीचा काळ ठरणार असून इथून पुढे प्रगतीच्या अनेक संधी आपल्याला प्राप्त होणार आहे. तूळ राशीला अनेक मार्गाने धन प्राप्त करण्यामध्ये लाभ प्राप्त होणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. मान सन्मान पद प्रतिष्ठा यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.

सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. तूळ राशीच्या कुटुंबातील दिवस सुख-समृद्धीचे येणार आहेत. गजकेसरी योग व बुधादित्य योगाच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले नशीब. आपल्या कुंडलीमध्ये ग्रहांचा अतिशय शुभ संयोग बनत असून इथून पुढे मोठ्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. प्रेम जीवन वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीसाठी येणार काळा अतिशय सुखाचा आणि लाभकारी जाणार आहे. येणारे नववर्षी आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. मीन राशी मध्ये बनत असलेला ग्रहांचा अद्भुत योग आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. त्यामुळे इथून पुढे प्रगतीच्या दिशेने सुंदर पावले पडणार आहेत. यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.

उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश प्राप्त होणार आहे. वाणीचा अतिशय चांगला उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात. मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. वृश्चिक राशीसाठी हा काळ धनप्राप्तीचा काळ ठरणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. मनाला शांती लाभणार आहे.

६) धनु रास- धनु राशीच्या जीवनातील साडेसातीचा काळ संपला असून शनीची साडेसाती संपलेली आहे. यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे. अनेक योजना या काळामध्ये राबवणार आहात. धनलाभ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. धनु राशीच्या जीवनामध्ये आर्थिक प्राप्ती मजबूत बनणार आहे. नवीन आर्थिक धोरण आपण ठरवणार आहात. उद्योग व्यापार करणारे जातकांचे जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे.

आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये मोठी वाढ दिसून येईल. धनु राशीच्या पारिवारिक जीवनामध्ये आनंदाचे दिवस येणार आहेत. आरोग्याच्या दृष्टीने देखील काळ सुखाचा जाणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचा अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. या काळामध्ये जर आपण आपले प्रयत्न चांगले ठेवले तर निश्चित मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते.हा काळ प्रगतीचा जाणार आहे. घर जमीन वाहन खरेदीचे योग्या काळामध्ये जमून येणार आहे.

७) कुंभ रास- कुंभ राशीसाठी आता सुखाची बहार येणार आहे. ग्रहांची स्थिती अतिशय लाभकारी ठरणार आहे. ग्रहण क्षेत्राचा मेळ आपल्या जीवनामध्ये सुंदर योग निर्माण करत आहे. त्यामुळे इथून पुढे प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होतील. ज्या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. त्यामुळे या काळाचा आपल्याला चांगला लाभ प्राप्त करून घ्यावा लागेल. गुढीपाडव्यापासून पुढे जीवनामध्ये सकारात्मक घडामोडी घडवून येतील.

अनेक दिवसांच्या अपूर्ण मनोकामना या काळामध्ये पूर्ण होतील.आढलेली कामे पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होतील. आता इथून पुढे उद्योग व्यापारात नफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी किंवा नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे. सुंदर प्रगतीचे संकेत बनत आहेत. ग्रहांची स्थिती अनुकूल असल्यामुळे प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनामध्ये आपले मन रमणार आहे. नातेसंबंध मधुर बनतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *