नवीन वर्ष भरभराटीच जाण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात या गोष्टी करा. जे हवे ते मिळेल. वाऱ्याच्या वेगाने धावेल तुमचे भाग्य.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी हिंदू धर्मानुसार मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र मानला जातो. ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे. त्याचप्रमाणे कार्तिक महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. या काळात भगवान विष्णूची मनोभावे पूजा केली जाते या महिन्यात केलेल्या पूजेचे फळ सर्वात लवकर मिळते. एवढेच नसून गीतेत सुद्धा श्रीकृष्णाने मार्गशीर्ष महिन्याचे वर्णन केले आहे.

हिंदू धर्मानुसार मार्गशीर्ष महिन्यात दोन प्रमुख विवाह झाले आहेत. एक शिव आणि माता पार्वती चा विवाह तर दुसरा श्री राम विवाह. पूर्वीच्या काळी वर्षाची सुरुवात या महिन्यापासून होत असे मान्यता आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्या केल्याने पुढील संपूर्ण वर्ष आपल्याला भरभराटीचे जाऊ शकतो.

मित्रांनो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आणि सुख-समृद्धीसाठी विवाहित स्त्रिया मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी उपवास करतात. या दिवशी स्त्रिया मनोभावी देवी लक्ष्मीची पूजा करतात. महालक्ष्मीला संपत्ती आणि ऐश्वर्या ची देवी मानली जाते. जेव्हा देवी लक्ष्मी भक्तांवर प्रसन्न होते. तेव्हा ती त्यांचे जीवन सुख आणि समृद्धीने भरते अशी लोकांची श्रद्धा आहे. भगवान श्रीकृष्णांचा प्रिय महिना म्हणजे मार्गशीर्ष आहे.

स्कंद पुराणातील वैष्णव खंडानुसार मार्गशीर्ष हा भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना म्हणून केले आहे. या काळात पहाटे सकाळी लवकर उठून स्नान करून पूजा केल्याचे अनेक फायदे होतात. या महिन्यात नदीत स्नान करण्याचे विशेष असे महत्त्व आहे. जर तुम्हाला हे शक्य नसेल तर, तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगेचे थेंब सुद्धा टाकू शकता.

त्यामुळे भगवान श्रीकृष्ण तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील. या महिन्यात एक वेळ भोजन करण्यामागचे काय कारण आहे. ते सुद्धा जाणून घेऊयात. महाभारताच्या अनुशासन या पर्वत असे म्हटले आहे की मार्गशीर्ष महिन्यात मनुष्याने एक वेळ भोजन करावे. आणि ब्राह्मणाला त्याच्या क्षमतेनुसार भोजन द्यावे. असे करणाऱ्या व्यक्ती सर्व रोग व पापंपासून मुक्त होतो.

जर एखाद्या व्यक्तीने या महिन्यात उपवास केला. तो निरोगी होतो असा उल्लेख देखील पुराणात मिळतो. या महिन्यात अन्नदान का करावे. कोणत्याही महिन्यात अन्नदान करणे उत्तमच मानले पण या काळात त्याला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. या महिन्यात अन्नदान केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. सामाजिक कार्यात देखील तुम्ही दान करू शकता.

दान करण्याची इच्छा अनेकांना असते परंतु ते सतपात्रि व्हावे असे सर्वांना वाटते. काही लोक सामाजिक संस्थांना दान करून मोकळे होतात. परंतु त्या पैशाचे योग्य प्रकारे नियोजन होत आहे की नाही या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत . त्यामुळे नुसते दान करून उपयोग नाही. तर त्याचा पाठपुरावा देखील करायला पाहिजे. सामाजिक संस्थांना मदत जरूर करावी.

परंतु त्यांचे कार्य तपासून पहावे आणि आपणही शक्य तेव्हा सहभागी व्हावे. या गोष्टी केवळ दुसऱ्यांना सहाय्यक ठरतात असे नाही, तर तुमचे व्यक्तिमत्व ही खुलवतात. आपोआप प्रसिद्धी यशप्राप्ती होते. म्हणून आपले पैसे योग्य ठिकाणी वापरावेत. दुसऱ्यांबरोबर स्वतःचाही उत्कर्ष करून घ्यावा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *