शनिवारी गुपचूप येथे बांधा काळा धागा.. घर आणि कुटुंबाचे रक्षण होईल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात जर सुख-समृद्धी हवी असेल, जीवनात सकारात्मक ऊर्जा पाहिजे असेल, घरात देव देवतांचा आशीर्वाद हवा असेल तर हा उपाय नक्की करा. तुमच्या आयुष्यात जी नकारात्मक ऊर्जा आहे. तुमच्या प्रत्येक कामात काही ना काही बाधा येतच असेल. घरातील वास्तुदोषामुळे आनंदी वातावरण टिकत नसेल.

तर हा चमत्कारी आणि बलवान उपाय एकदा करा. आणि मग बघा तुमचा आयुष्य कस चमकते. तुमच्या सगळ्या बाधा लगेच दूर होतील. चला तर मग जाणून घेऊया तो सोपा उपाय. मित्रांनो व्यक्ती त्याच्या आयुष्यात खूप चांगले काम करण्याचा प्रयत्न करतो पण कधीतरी तो त्यात अपयशी ठरतो. कारण त्या व्यक्तीला नकारात्मक ऊर्जेने घेरलेले असते.

एखादं चांगल काम करायला गेला की लगेच ती बाधा नकारात्मक शक्ती नकारात्मक ऊर्जा त्याच्या आडवी येते. आणि तिथेच तो व्यक्ती हारतो. ती नकारात्मक ऊर्जा व्यक्तीला दुःख आणि निराशा देते. आणि यामुळे तो व्यक्ती मानसिक तणावातून जातो. तुमच्याही आयुष्यात या गोष्टी घडत असतील तर हा प्रभावशाली उपाय तुम्हाला कोणतीच हानी पोहोचवणार नाही.

तुम्ही एक रेशमी व सुती काळा धागा घ्यायचा आहे. काळा धागा बांधण्याची प्रथा ही प्राचीन काळापासून सुरू आहे. काळ्या धाग्याला कोणी हातात तर कोणी पायात तर कोणी गळ्यात बांधते. नजरेपासून मुक्ती मिळावी म्हणून हा काळा धागा बांधला जातो. काळा धागा अनेक बऱ्याच गोष्टींसाठी कामी सुद्धा येतो. व्यक्तीला हाच काळा धागा श्रीमंत बनवू शकतो. हो आपले शरीर पंचतत्त्वांनी बनलेले आहे.

हे पंचतत्व म्हणजे पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या सगळ्यांची मिळणारी ऊर्जा आपल्या शरीराला संचलित करते. या ऊर्जेमुळेच आपण सगळ्या सुविधांना प्राप्त करतो. काळा रंग हा नजर लावणाऱ्यांची एकाग्रता अभंग करतो. यामुळे तुम्हाला नकारात्मक ऊर्जा प्रभावित करत नाही. शनिवारी जरा तुम्ही मोठा रेशमी धागा घ्यायचा आहे. आणि तुमच्या जवळच्या शनी मंदिरात जायचं आहे.

तुम्ही हनुमानजींच्या मंदिरात सुद्धा जाऊ शकता. शनी मंदिरात गेल्यावर जे तेल आपण शनी मंदिरात अर्पण करतो. त्या तेलामध्ये हा काळा धागा भिजवायचा आहे. जर तुम्ही हनुमानजींचे मंदिरात जात असाल तर हनुमानजींच्या चरणी असलेल्या सिंदूर मध्ये तो धागा बुडवायचा आहे. आणि सोबत त्या धाग्याला सात गाठी मारायच्या आहेत. आणि प्रत्येक गाठ मारताना एका समस्येचे निवारण करायचे आहे.

शनी मंदिरात तुम्ही दिवा लावून हा मंत्र म्हणायचा आहे. ओम शं शनेश्वराय नमः या मंत्राचा २१ वेळा जप करायचा आहे. जर तुम्ही हनुमान मंदिरात जात असाल तर तिथे तुम्ही हनुमान चालीसा म्हणायचे आहे. आणि त्यानंतर जागा धाग्याला तुम्ही गाठी बांधल्या आहेत. तो धागा दिव्या वरून सात वेळा फिरवून मनात प्रार्थना करायची आहे. ही क्रिया झाल्यानंतर तुम्हाला कोणासोबतही न बोलता घरी निघून जायचे आहे.

त्या रात्री तो धागा तुमच्या घराच्या मंदिरात ठेवायचा आहे. लक्षात ठेवा त्या धाग्याला कैची किंवा ब्लेड लागू देऊ नका. आणि या सोबत तुमच्या शरीरावर दुसरा कोणत्याच रंगाचा धागा नसला पाहिजे. तुम्हाला जर तो धागा शरीरावर बांधायचा नसेल तर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर तो धागा बांधू शकता. म्हणजे तुमच्या घरात कधीच नकारात्मक ऊर्जा येणार नाही. आणि घरात नेहमी आनंदी वातावरण टिकून राहील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *