मंगळवारी या ठिकाणी लाल मिरची ठेवल्यास रातोरात चमकेल तुमचे नशीब उजळेल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी आपल्या जीवनात स्वाद वाढवण्याचे काम करणारी लाल मिरची माहिती आहे ना. हीच लाल मिरची तुमचे नशीब बदलू शकते. ज्योतिष शास्त्रात लाल मिरचीचे अधिक महत्त्व आहे. लाल मिरचीचा उपयोग तांत्रिक कार्यामध्ये देखील केला जातो. जर घरात एखाद्या व्यक्तीला नजर लागली असेल तर लाल मिरची ने सुद्धा त्या व्यक्तीची कडक नजर काढता येते.

मंगळवारी फक्त एका ठिकाणी अखंड लाल मिरची ठेवा. मग बघा तुमची गरीबी कशी घरातून पळून जाते आणि घरात महालक्ष्मीच्या कृपेने धनलाभ कसा होतो. आणि लवकरच तुम्ही पैशांमध्ये खेळू शकता. घरातील नकारात्मक ऊर्जा देखील घराबाहेर निघून जाईल. चला तर मग जाणून घेऊया.

मित्रांनो तुमच्या घरात तुम्हाला सतत चिंता जाणवत असेल, नको त्या संकटांना सामोरे जावे लागत असेल, व्यवसायात यश नसेल मिळत ,तर तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर हा उपाय एकदा करून बघा. तुम्ही मंगळवारच्या दिवशी पाच अखंड लाल मिरच्या आणि एक लिंबू घ्यायचा आहे.

तुमच्या मनातली इच्छा बोलताना एका लाल धाग्यामध्ये त्या मिरच्या आणि लिंबू एकत्र बांधायचे आहे. नंतर ते तुमच्या मुख्य दरवाजाच्या वरती लटकवून द्यायचे आहे. विश्वास ठेवा तुमच्या घरातील पैशांच्या वाटा जिथे अडल्या होत्या त्या वाटा लगेच मोकळ्या होतील आणि घरात पैशांचा पाऊस पडेल. तुम्ही ज्या आर्थिक संकटांना सामोरे जात होते तर ते संकटे कायम चे दूर होतील.

तुमच्या व्यवसायाला जर कुणाची नजर लागली असेल तर ते दोष दूर निघून जाईल. तुम्हाला नजर दोष पासून मुक्ती मिळेल. आपण सहसा प्रत्येक ठिकाणी हिरवी मिरची आणि लिंबू लटकवलेले बघतो. पण तुम्ही हिरवी मिरची ऐवजी लाल मिरची आणि लिंबू बांधावे यामुळे तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास कायम राहील आणि तुमच घर नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होईल.

तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा हे बांधू शकता. किंवा लाल मिरची आणि लिंबू एकत्र बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. यामुळे तुम्हाला पैसा प्राप्त होईल. आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील. तुमच्या प्रगतीवर तुमचे नातेवाईक किंवा मित्रपरिवार जळावृत्ती ठेवत असेल तुमच्या प्रत्येक यशप्राप्तीमध्ये काही ना काही अडचणी येत असतील, कष्ट करूनही पैसे येत नसेल तर तुम्ही हा उपाय सुद्धा करू शकता.

मित्रांनो तुम्ही काही वाळलेली लाल मिरची घ्या. आणि हो लक्षात ठेवा हा उपाय सुद्धा तुम्हाला मंगळवारच्या रात्रीच करायचा आहे. त्या रात्री झोपायच्या आधी एका भांड्यात पाणी घ्या. आणि त्या पाण्यात मिरचीचे २१ लाल दाणे टाका आणि नंतर ते भांडे तुमच्या बेडच्या किंवा तुम्ही ज्या ठिकाणी झोपता त्याच्या आसपास ठेवा.

सकाळी झोपेतून उठल्यावर त्या भांड्याला तुमच्या स्वतःवरून सात वेळा उलटे उतरून घ्या. आणि नंतर ते पाणी घराच्या बाहेर फेकून द्या. लक्षात ठेवा घरातील येताना मागे वळून पाहू नका. असे केल्याने तुमच्यावरती जी काही नकारात्मक ऊर्जेची सावली आहे व वाईट बादा तुमच्या पाठी आहे ती निघून जाईल. आणि आर्थिक समस्या लगेच निघून जातील. आणि हळूहळू घरातील बाधा देखील दूर होते. यामुळे तुम्ही लवकर श्रीमंत होऊ शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *