अडकलेल काम पूर्ण होण्यासाठी या एका वस्तूवर पाय देऊन बाहेर पडा. आणि चमत्कार बघा.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

एक वस्तू जी आपल्याला आपल्या मसाल्याच्या डब्यात सापडते. त्या वस्तूचा उपयोग आपण आपल काम पूर्ण होण्यासाठी करू शकतो. कोणती आहे ती वस्तू कसा करायचा तिचा वापर चला जाणून घेऊया.

मित्रांनो अस बऱ्याचदा होत की एखाद काम पूर्ण करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. वारंवार ते काम पूर्ण होण्यासाठी आपण त्या कामाच्या ठिकाणी चक्रा सुद्धा मारतो. पण आपल काम काही होत नाही किंवा ते थांबत. आणि अशावेळी आपण ज्योतिषी उपाय वास्तुशास्त्र उपायांकडे वळतो. असाच एक उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा उपाय केल्यामुळे तुमच काम नक्की होईल असे म्हटले जाते.

चला तर मग बघूया हा उपाय कोणता आहे. हा उपाय आहे काळ्या मीरी संदर्भातला. ह्या काळ्यामिरी आपल्याला मसाल्याच्या डब्यात सहज उपलब्ध होतात. हेच काळीमिरी तुमच आर्थिक संकट सुद्धा घालवू शकतात. आर्थिक संकट टाळण्यासाठी पाच ग्रॅम हिंगात कापूर आणि पाच काळ्या मिरी मिसळून पावडर करून घ्या.

ही पावडर रोज सकाळ संध्याकाळ घरात धूप करतो तशी जाळा. आणि अस केल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होतात अस म्हटल जात. कारण काळ्या मिरीचा संबंध हा ग्रहांशी आहे. जर तुम्ही काही विशेष कामासाठी घराबाहेर जात असाल तर घरातून बाहेर पडताना मुख्य द्वारावर काळी मिरी ठेवा. आणि मग त्या काळ्यामिरीवर पाय ठेवून घरातून बाहेर पडा.

अस केल्यामुळे ते काम पूर्ण होत. पण लक्षात घ्या हे काम करत असताना एकदा तुम्ही घरातून बाहेर पडला की पुन्हा काहीतरी राहिल म्हणून घरात येऊ नका. घरातल्यांनाच ती वस्तू मागा आणि बाहेर येऊन द्यायला सांगा. हा उपाय केल्यामुळे अडकलेली काम किंवा खूप प्रयत्न करूनही जी काम होत नाहीये ती काम पूर्ण व्हायला सुरुवात होते असे ज्योतिषशास्त्रात म्हटल जात.

जर घरातील आर्थिक स्थिती चांगली नसेल तर सात किंवा आठ दाणे काळीमिरी घेऊन घरातील कोणत्याही एका कोपऱ्यात एक दिवा लावून यामध्ये टाका. असे केल्याने आर्थिक स्थिती हळूहळू सुधारू लागते. हे सगळ करताना लक्षात घ्यायचंय की प्रामाणिक प्रयत्न आणि कष्ट सोडायचे नाहीयेत. जिथे कुठे य कष्ट करूनही यश मिळत नाहीत तिथेच अशा गोष्टी आपल्याला मदत करतात.

कष्ट न करता कुठलाही उपाय आपल्याला फळ देत नाही.
हे लक्षात ठेवा. श्रीमंत व्हायची इच्छा असेल तर काळ्या मिरची पाच दाणे आपल्या डोक्यावरून सात वेळा उतरून घ्या आणि नंतर एखाद्या चौरस्त रस्त्यावर ते दाणे चारी दिशांना फेकून द्या. नंतर पाचवा दाना वरती आकाशाकडे फेकून द्या. आणि तिथून परत येताना मागे वळून बघू नका. या उपायाने धनप्राप्तीचे योग तयार होतात.

असेही म्हटले जाते. अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी ओम क्लीम या मंत्राचा उच्चार करत हातात काळीमिरी घेऊन घरातील सदस्यांच्या डोक्यावरून फिरवा आणि ती दक्षिण दिशेला फेकून द्या. असे केल्यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते. त्याचबरोबर सर्व समस्या ही दूर होतात.

शनिच्या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी सुद्धा काळे मिरी चा उपयोग केला जातो. त्यासाठी सुद्धा एक उपाय आहे काळीमिरी आणि अकरा रुपये हे एका काळ्या कपड्यात बांधा आणि ते दान करा किंवा शनी मंदिरात नेऊन ठेवा. यामुळे तुमच्या कुंडलीत असलेला शनीदोष शनीची साडेसाती या त्रासातून तुम्हाला मुक्ती मिळते.

शनीच्या प्रभावामुळे होणारे रोग आहेत त्या रोगांपासून सुद्धा आराम मिळण्यासाठी एक उपाय आहे. ते उपाय आहेत याप्रमाणे. जेवणामध्ये काळे मीठ आणि मिरची वापर करा. आणि जेवणात वरून तिकट घेणे टाळा हिरव्या मिरच्यांचे ही अधिक सेवन टाळा. या उपायामुळे हे रोग दूर होतात अस म्हटल जात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *