नमस्कार मित्रांनो.
मंडळी महाशिवरात्री हा भगवान शिव भक्तांसाठी वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण आहे. महाशिवरात्री शिव आणि शक्तीच्या मिलनाचा महान सण आहे. शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पर्वतीचा विवाह झाला होता. शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवसापासून सृष्टीची सुरुवात झाली आहे असे मानले जाते.
शिवरात्रीचे वर्णन गरुड पुराण, स्कंद पुराण, पद्मपुराण आणि अग्निपुराण इत्यादींमध्ये आढळते. असे म्हटले जाते की शिवरात्रीच्या दिवशी जो व्यक्ती भगवान शंकराचा बेलाच्या पानाने पूजा करतो आणि रात्री जागृत होऊन देवांच्या मंत्राचा जप करतो.
त्याला भगवान शिव आनंद आणि मोक्ष प्रधान करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची आराधना केल्याने शिवभक्तीच्या शक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. जर तुमची आर्थिक स्थिती कुमकुवत असेल तर या महाशिवरात्रीला काही ज्योतिषी उपाय करून मी आडथळ्यांपासून मुक्त होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात. मित्रांनो आर्थिक संकटे दूर करण्यासाठी महाशिवरात्रीला हे प्रभावी उपाय करूनच बघा.
१) नोकरी किंवा व्यवसायात अडचण असल्यास महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून शिवलिंगावर मध मिसळून अभिषेक करावा. २)तसेच डाळिंबाची फुल अर्पण करावे. ३)ओम नमः शिवाय आणि ओम पार्वतीपतये नमः या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
४)महाशिवरात्रीला चांदीच्या भांड्यातून जलधारेने भगवान शिवाला अभिषेक केल्यास आर्थिक प्रगती होते. ५)महाशिवरात्रीला गरजूंना मदत केल्याने जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. ६) महाशिवरात्रीच्या दिवशी दह्याने भगवान भोलेनाथाचा रुद्राभिषेक केल्याने धनाची वृद्धी होते.
७) भगवान भोलेनाथांना उसाच्या रसाने अभिषेक केल्यास लक्ष्मीची प्राप्ती होते. ८)धनप्राप्तीसाठी महाशिवरात्रीला शिवलिंगावर मत आणि तुपाचा अभिषेक करणे ही शुभ मानले जाते. ९) जर तुम्हाला तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या आवडत्या वस्तू भगवान शंकराला अर्पण करावे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.