२०२२ मध्ये या ३ राशींना आहे साडेसाती. बघा तुमची रास आहे का यात.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मंडळी येणारे वर्ष २०२२ हे आपल्याला कसं जाईल हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. आणि त्यातही सगळ्यात मोठी चिंता असते ती साडेसातीची. ज्योतिष शास्त्रानुसार सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात संत गतीचा ग्रह मानला जातो. शनिदेव आपले राशीचक्र पूर्ण करण्यासाठी सुमारे तीस वर्ष लावतात.

अशा स्थितीत २०२२ मध्ये शनीचे राशी परिवर्तन होणार आहे. शनी कुंभ राशीत प्रवेश करेल. शनीच्या राशी बदलांमुळे काही राशींवर त्याचा प्रभाव दिसून येईल. यादरम्यान काही राशीच्या लोकांना शनि दशा आणि साडेसातीलाही सामोरे जावे लागेल. अशा परिस्थितीत चला जाणून घेऊया कोणत्या राशींना साडेसातीला सामोरे जावे लागेल. आणि कोणत्या राशींची त्यामधून सुटका होईल.

वर्ष २०२२ मध्ये १ जानेवारी ते २९ एप्रिल या कालावधीत मिथुन आणि तूळ राशींच्या लोकांवर शनीची दशा असेल. त्यानंतर १२ जुलै पर्यंत कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनि दशा राहील. मकर राशीत शनीने गोचर केल्यानंतर मिथुन आणि तुळ राशीच्या लोकांना दशा असेल त्यांना १७ जानेवारी २०२३ पर्यंत शनि दशेला सामोरे जावे लागेल.

आता बघूया साडेसाती कोणाला असेल एक जानेवारी २०२२ ते २९ एप्रिल कालावधीत धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांवर साडेसातीचा प्रभाव राहील. २९ एप्रिल रोजी शनीचा कुंभ राशीत प्रवेश होताच मीना राशीच्या लोकांवर साडेसाती सुरू होईल. तर धनु राशीच्या लोकांना काही काळासाठी का होईना पण साडेसाती पासून मुक्ती मिळेल.

१२ जुलै पर्यंत कुंभ राशीत राहिल्यानंतर शनि पुन्हा मकर राशि प्रवेश करतील. त्यामुळे धनु राशीच्या लोकांना पुन्हा शनीची पकड असेल. आणि मीन राशीच्या लोकांना १७ जानेवारी २०२३ पर्यंत साडेसाती पासून मुक्ती मिळेल. अस असल तरी सुद्धा ज्या राशीच्या लोकांवर साडेसाती आहे त्यांनी अगदीच घाबरून जाण्याचं कारण नाही.

कारण साडेसाती ही नेहमीच वाईट असते असं नाही. साडेसाती मध्ये आपल्या कर्माचे फळ आपल्याला मिळतं असं म्हटलं जातं. चांगली कर्म असेल तर चांगल्या कर्मांची फळ सुद्धा याच काळात मिळू शकतात. म्हणूनच तर आपल्या संस्कृतीत आपल्याला नेहमीच सांगितलं गेलेल आहे की आपली कर्म आपण नेहमी सावधगिरीनेच करायला हवी.

कारण त्याची फळ आपल्याला कधी ना कधीतरी मिळतातच. साडेसाती मध्ये धैर्य ठेवून चांगली कर्म करत जावीत. हनुमानाची उपासना सुद्धा साडेसाती मध्ये नक्की करावी. त्याबरोबर दानधर्म इत्यादी पुण्य कर्मा सुद्धा करावी. म्हणजे आपली साडेसाती नक्कीच सुखद होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *