लक्ष्मी नारायण योग या ३ राशींना अचानक आर्थिक लाभ. उघडेल नशिबाचे दार.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ऐश्वर्या आणि वैभव देणारा शुक्र ग्रह १३ जुलैला सकाळी १० वाजून ४१ मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करेल. यानंतर सात ऑगस्टपर्यंत शुक्र या राशीत राहणार आहे. या राशीत बुध अधीच बसला आहे. त्यामुळे शुक्राचे राशी परिवर्तन होताच मिथुन राशीतील बुध शुक्र युतीमुळे लक्ष्मीनारायण योग तयार होतो.

ज्योतिषांचा म्हणणं आहे की १३ जुलै ते १६ जुलै पर्यंत ३ राशींसाठी हा लक्ष्मीनारायण योग अतिशय शुभ परिणाम देणारा ठरेल. ज्योतिष शास्त्रात लक्ष्मीनारायण योग अत्यंत शुभ आणि लाभदायक मानला जातो. या योगाने व्यक्तींवर माता लक्ष्मीची कृपा होते.

सौभाग्य वाढते. त्यामुळेच व्यक्तीला घर वाहन वैवाहिक सुख अशा सगळ्या प्रकारच्या भोगांची प्राप्ती होते. मग कोणत्या आहेत. त्या राशी चला जाणून घेऊया.

सिंह रास- या राशीच्या लोकांना या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा नक्कीच चांगला फायदा होईल. पैशांची बचत होईल. परदेश प्रवासाच्या संधी मिळू शकतात. नोकरीच्या ठिकाणी सुद्धा फायदा होईल. तसेच नोकरदारांना नवीन संधी सुद्धा मिळतील. तुमची संभाषण शैली तुमच्या जीवनात अनेक अनुकूल बदल घेऊन येईल.

तुळ रास- शुक्राच्या या राशी परिवर्तनामुळे तूळ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळताना दिसून येईल. या काळात या राशीची यशाकडे वाटचाल होईल. करियर मध्ये नवीन संधी मिळू शकते. त्याचबरोबर तुम्ही कुटुंब आणि मुलांसोबतही आनंदाचे क्षण घालू शकता. मुलांकडून चांगली माहिती मिळू शकते. लक्ष्मीनारायण योगामध्ये तुम्हाला अचानक धनप्राप्ती होऊ शकते कर्जात बुडालेल्या पैशांची वसुली सुद्धा होऊ शकते.

कुंभ रास- या राशीच्या लोकांची स्थिती चांगली राही ल. तुमच्या राशीमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या राशीची लोक जी व्यवसायाची संबंधित आहेत त्यांना अनेक शुभ परिणाम मिळतील. तुम्हाला चांगला नफा सुद्धा मिळेल. प्रॉपर्टी मध्ये सुद्धा गुंतवणुकीसाठी हा काळ खूप चांगला आहे. जर तुम्हाला काही नवीन काम सुरू करायचं असेल तर त्यासाठी हा काळ उत्तम आहे.

शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी काय करावं ते सुद्धा आता आपण पाहूया. शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी व्यक्तीने महिलांचा आदर करावा. तांदूळ साखर पांढरी फुलं यासारख्या पांढऱ्या वस्तूंचे दान करावे. पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचा वापर करावा. याशिवाय तुळशीची पूजा करावी आणि गोशाळेची सुद्धा सेवा करावी.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *