या राशीचे लोक असतात खूप भावनिक. बघा तुमची रास आहे की नाही यात.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की बारा राशी आहेत. आणि या १२ राशींचे स्वभावही वेगळे आहेत. आणि या राशींशी वर्गवारी ही पृथ्वी तत्व अग्नी तत्व वायू तत्व त्याचबरोबर जलतत्त्व याद्वारे सुद्धा करण्यात आली आहे. त्याचा सुद्धा त्या व्यक्तीच्या स्वभावावर बराच परिणाम होतो.

एखादी व्यक्ती खूप तापट असते. एखादी व्यक्ती खूप प्रेमळ असते. आपण म्हणतो की एकाच घरातले दोन भाऊ पण स्वभाव अगदी भिन्न याला त्यांची रास कारणीभूत असू शकते. एखादा अगदीच तापट एखादा अगदीच शांत मग विचारला जात रास कोणती बर यांची कारण काही राशी अशा आहेत. ज्या तापट स्वभावाचे म्हणून ओळखल्या जातात.

तर काही राशी अशा आहेत अतिशय प्रेमळ आणि भावनिक अशा ओळखल्या जातात. आज आपण बघणार आहोत कोणत्या राशी आहेत. भावनिक १२ राशींपैकी सर्वात जास्त भावनिक असणारी रास म्हणजे कर्क रास खरतर भाऊक आणि कर्क रास हे समानार्थी शब्द आहेत.

असे म्हटले तरी अतिशय चुकीचे ठरणार नाही. इतकी ही रास भावनिक असते. प्रचंड कुतूहल व्यावसायिक कार्यक्षमता यांच्यामध्ये असते. आपल्या कर्तव्याशी सुद्धा एकनिष्ठ असतात. आणि त्यामुळेच ते मोठ्या पदापर्यंत पोहोचतात.
थोडासा स्वभाव लाजाळू असतो. मनापासून जोडीदारावर प्रेमही आहे.

हे सगळ जरी असल तरी भाऊकता अस यांच वैशिष्ट्य असत. यांच्या ठाई भूतदया सुद्धा असते. दुसऱ्याचं दुःख पाहून यांच्या डोळ्यात सहज पानी येत. अतिशय प्रामाणिक जिज्ञासू आणि कर्तव्यदक्ष अशी यांची ओळख आहे.

कर्क रास- कर्क राशीच्या लोकांच्या याच गुणांमुळे समाजात त्यांना मानसन्मान मिळतो. कर्क राशीच्या मुलींबद्दल बोलायचं झालं तर एकत्र कुटुंबात छान सामावून जातात. मातृ प्रेमाचा सुंदर अविष्कारच असतात. कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र आणि चंद्रामुळे यांनाही भाऊकता मिळते. आणि चंद्रामुळे यांना मनाची चंचलता मिळते.

मीन रास- मीन रास सुद्धा प्रचंड भावनिक आहे. बुद्धी आणि मनाच्या द्वांद्वा मध्ये नेहमीच मनाच ऐकतात. आपल्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक नात्याला जिवापाड जपण्याचा यांचा प्रयत्न असतो. दुसऱ्यांच्या भावनांचा अतिविचार करणं मात्र यांच्यासाठी घातक ठरू शकत.

दुसऱ्यांना वाईट वाटेल किंवा दुसरे दुखावले जातील अस वर्तन यांच्याकडून कधीच होत नाही. एखाद्याला कठोर शब्दात बोलन सुद्धा यांना जमत नाही. स्वभावाने साधे सरळ असे मीन राशीचे व्यक्तिमत्त्व असते. कपट कारस्थान करण्याला यांच्या आयुष्यात स्थानच नसते.

त्यांच्या जे मनात आहे ते चेहऱ्यावर आणि तेच ओठावर असतात. मीन राशीच्या व्यक्ती खूपच सामाजिक अर्थात सोशल असतात. स्वतःपेक्षा इतरांची काळजी घेण्याचा त्यांचा स्वभाव असतो. अतिशय हसऱ्या आणि सगळ्यांना आपल्याशा करणाऱ्या यांच्या स्वभावामुळे ते सगळ्यांचे मन जिंकून घेतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *