१७ जून २०२२ संकष्टी चतुर्थीला करू नका या चुका उपवासाच फळ नाही मिळणार.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो १७ जून शुक्रवारी संकष्टी चतुर्थी आली आहे. हिंदू धर्मामध्ये लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वंच लोक गणपती बाप्पाची सेवा करत असतात. मात्र ही सेवा करताना काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला टाळल्या पाहिजेत. या अशा काही गोष्टी आहेत ज्या गणपती बाप्पाला आवडत नाहीत.

जर या गोष्टी आपल्या हातून चुकून घडत असतील तर त्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर नाराज होऊ शकतात. मित्रांनो तसं तर आपल्याला माहीतच आहे गणपती बाप्पांना मोदक खूप आवडतात. सिंदूर लाल कलर हा त्यांचा आवडता कलर आहे. आणि दूर्वा तर त्यांच्यासाठी अमृतच आहे. दूर्वा तर बापाला खूपच आवडतात.

उंदीर हे गणपती बाप्पाचं वाहन आहे. आणि गणपती बाप्पाला पूर्व दिशा आवडते. त्याचप्रमाणे तुम्ही गणपती बाप्पाला स्वच्छ ठिकाणी अभिषेक करत असाल. तर ते पण त्यांना खूप आवडतं. त्यामुळे गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात. त्याचबरोबर मित्रांनो कोणतेही कामाची सुरुवात करताना किंवा कोणत्याही कामाचा प्रारंभ करताना आपण नेहमी गणपती बाप्पा चे पूजन करतो.

त्यामुळे गणपती बाप्पा हे सुख समृद्धी देणारे आणि सुखकर्ता दुखहर्ता मांडले गेले आहेत. त्यामुळे कोरेल कोणत्याही कार्याची सुरुवात करताना गणपती बाप्पा पासून केली जाते. तर तुम्ही गणपती बाप्पाची पूजा करत असाल तर त्यामध्ये या काही चुका होऊ नयेत याची आपण काळजी घेतली पाहिजे. याविषयीच्या सविस्तर गोष्टी सांगणार आहोत.

मित्रांनो तुम्ही खूप पूजा करूनही एखादी छोटीशी चूक जर तुमच्याकडून घडली तर बाप्पा तुमच्यावर नाराज होऊ शकतात. आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी अडचणी येऊ शकतात. यामध्ये सर्वात आधी आपल्याला लक्षात ठेवायच आहे की तुमच्या घरात गणपती बाप्पाचे तोंड दक्षिण दिशेकडे असू नये. त्याचे वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. बाप्पाला दक्षिण दिशा ही आवडत नाही त्यामुळे तसं होऊ देऊ नका. अस केल्याने तुमच्या घरावर गरिबी येण्याची शक्यता आहे.

त्यानंतर दुसरी गोष्ट तुळशीपत्र- गणपती बाप्पाला तुळशीपत्र वाहू नका. कारण पौराणिक कथांमध्ये गणपतीबाप्पाला तुळशीने श्राप दिला होता. त्यामुळे गणपती बाप्पाला तुम्ही चुकूनही तुळशीपत्र वाहू नका.

तिसरी गोष्ट म्हणजे गणपती बाप्पाला सुकलेले फुल व्हायचे नाही- कारण सुकलेले फुल वाहिल्यास पप्पा नाराज होऊ शकतात. तसंही सुकलेली फुलं तुम्ही कोणत्याही देवाला वाहात असाल तर ते अशुभ मानलं जातं. त्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्य येतं. आणि आरोग्य ही निरोगी रहात नाही. त्यामुळे तुम्ही सुकलेली फुले गणपतीबाप्पांना वाहू नका.

चौथी गोष्ट म्हणजे केतकी चे फुल- केतकी चे फुल बाप्पाला अर्पण कधीच करू नका. कारण अनेक कथांमध्ये असं म्हटलं जातं की शिवशंकर आन्ना केतकी चे फुल आवडत नव्हतं. त्यामुळे गणपती बाप्पा ला सुद्धा केतकी चे फुल आवडत नाही. त्यामुळे गणपतीबाप्पाला कधीही केतकीचे फुल अर्पण करायचे नाही.

या अशा काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या जर तुम्ही बाप्पाची पूजा करत असताना किंवा प्रार्थना करत असताना केल्या तर बाप्पा नाराज होतील. म्हणून तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्यायचे असतील तर बाप्पाला तुम्ही बुधवारी लाडूचा किंवा मोदकाचा नैवेद्य देऊ शकता.

त्यामुळे तुमची ईच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल. त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीला ही बाप्पाला मोदकाचा नैवेद्य नक्कीच दाखवा. मित्रांनो तुम्ही जर गणपती बाप्पा चे भक्त असाल तर गणपती बाप्पा मोरया असे लिहायला विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *