या आहेत सर्वात लकी राशी एप्रिल २०२२ ते २०२५ पर्यंत खुप जोरात असेल यांचे नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवनात चढ-उतार हे चालत असतात. कधी सुख तर कधी दुखा असा काळ माणसाच्या वाट्याला येत असतो. मानवी जीवनात परिस्थिती कधीही सारखी नसते.1 वेळोवेळी काही ना काही बदल घडून येत असतात. ज्योतिषानुसार या सर्व बदलत्या ग्रह नक्षत्राचा परिणाम असतो ग्रह नक्षत्र जेव्हा नकारात्मक असतात.

तेव्हा व्यक्तीला जीवनात अनेक संकटं अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनंत अडचणी मनुष्याच्या जीवनात येत असतात कोणतेही काम व्यवस्थित रित्या पूर्ण होत नाही. या काळात व्यक्तीला अनेक प्रकारे संघर्ष करावा लागतो आणि अपयश अपमान भोगावे लागतात. दुःख यातना सहन कराव्या लागतात काय करावे काही सुचत नाही.

पण जेव्हा हेच ग्रह नक्षत्राची स्थिती अनुकूल बनते. तेव्हा मात्र प्रगतीला वेळ लागणार नाही दुःखाचा वाईट काळ संपतो. आणि सुखाच्या सुंदर वाटेने जीवनाचा प्रवास सुरू होतो. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशिंच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

कारण एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अतिशय महत्त्वपूर्ण घडामोडी या राशिच्या जीवनात घडून येणार आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये काही महत्त्वपूर्ण ग्रहांची राशी परिवर्तन होणार असून अनेक महत्त्वपूर्ण घटना घडून येतील. या काळात सूर्यग्रहण आणि अमावस्या देखील येणार आहे.

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे दिनांक चोवीस एप्रिल रोजी बुध ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार असून २७ एप्रिल रोजी शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहेत. पण दिनांक २९ एप्रिल रोजी शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. आणि प्लुटो ग्रह वक्री होणार आहेत.

ग्रहांच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा अतिशय शुभ प्रभाव या काही भाग्यवान राशिच्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. आता आपल्या जीवनात चालू असणारी वाईट परिस्थिती बदलणार असून शुभकाळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे.

येणारे ३ वर्ष आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. उद्योग-व्यापार कार्यक्षेत्र करिअर समाजकारण राजकारण शिक्षण नोकरी अशा अनेक क्षेत्रात आपल्याला भरघोस प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आता जीवनात मोठी प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही.

आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुया मेष राशी पासून.

मेष राशी- एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती मेष राशीसाठी अतिशय अनुकूल बनत आहे. हा काळ आपल्या जीवनाला एक सकारात्मक आकार देणारा काळ ठरणार आहे. आपल्या जीवनाला एक सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारा काळ ठरणार आहे.

भगवान शनीचा आशिर्वाद आपल्या पाठिशी राहणार आहे. त्यामुळे उद्योग व्यापारातून आपल्याला भर्गोस यश प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रात आडलेली कामे पूर्ण होतील. येणारे वर्ष येणारे तीन वर्षे आपल्या राशीसाठी सुखाचे जाणार आहेत.

जीवनात काही अडचणी निर्माण झाल्या किंवा काही समस्या निर्माण झाल्या तरी घाबरू नका. प्रत्येक अडचणीतून मार्ग निर्माण होणार आहे परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल बनत आहे. या काळात आपली आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. प्रगतीच्या वाटा या काळात मोकळ्या होणार आहे.

वृषभ राशी- वृषभ राशीसाठी येणारा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. जीवनात चालू असणारी वाईट परिस्थिती आता बदलणार आहे. आपला राशि स्वामी शुक्र या काळात अतिशय सुबक फळ देणार आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून शुक्राच्या राशीत होणारे गोचर आपल्यासाठी शुभ फलदायी ठरण्याची शक्यता आहेत.

आपल्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहेत. यामध्ये मोठी प्रगती घडून येऊ शकते. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.

कर्क राशी- कर्क राशीच्या वाट्याला सुखाचे सोनेरी दिवस येणार आहेत. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्यात आपल्याला मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल करिअर मध्ये मोठी प्रगती घडून येण्याची शक्यता आहेत.

उद्योग व्यापारात आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. व समाजात मानसन्मान आणि नावलौकिक प्राप्त होणार आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूलता असल्यामुळे काळ अतिशय लाभदायी ठरणार आहे.

या संधीपासून चांगला लाभ आपल्याला प्राप्त करून घ्यावा लागेल. अचानक धनलाभाचे योग सुद्धा जमून येऊ शकतात. आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. संसार सुखात मोठी वाढ दिसून येईल. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात.

कन्या राशी- कन्या राशि साठी एप्रिल महिना अतिशय लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा अतिशय लाभदायी ठरणार आहे. कारण या शेवटच्या आठवड्यापासून ग्रह नक्षत्राची स्थिती अतिशय अनुकूल बनत आहे. आपल्या कार्यक्षेत्रात अतिशय अनुकूल घडामोडी घडून येणार आहेत.

सुखासमाधानात वाढ होईल. नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. व्यापरातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणारा आहे.

राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आनंदाचे दिवस येणार आहेत. राजकारणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत एखादे चांगले पद आपल्याला मिळू शकते. व्यापारात प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे.

तूळ राशी- एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अतिशय अनुकूल घडामोडी तूळ राशिच्या जीवनात येणार आहेत. हा काळ अतिशय चांगले परिणाम देणारा काळ ठरणार आहे. सुंदर प्रगती आपल्या जीवनात घडून येणार आहे. नशिबाची भरपूर साथ आपल्याला प्राप्त होईल.

नशीब या काळात मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे आता इथून पुढे भाग्याची साथ लाभणार असल्यामुळे प्रयत्नाची आपण गती वाढवली तर नक्की आपल्याला मोठे यश या काळात प्राप्त होऊ शकते. दिनांक २७ एप्रिल रोजी होणारे शुक्राच्या राशी परिवर्तन आपल्या जीवनात आनंदाची बातमी घेऊन येणार आहे.

आता प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आपल्या कल्पनेतील योजना आता प्रत्यक्षात उतरतील सांसारिक सुखात वाढ होणार आहे. संसार सुखात मोठी वाढ दिसून येईल. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे. हाती पैसा खेळता राहील.

करिअरमध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत करिअरमध्ये यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. नोकरीत बढतीचे योग येऊ शकतात. या काळात बेरोजगारांना चांगला रोजगार किंवा मनासारखा रोजगार मिळण्याचे योग आहेत. त्यांना रोजगार प्राप्त होईल.

वृश्चिक राशि- कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. मोठे यश आपल्या हाती लागू शकते उत्तम प्रगती आपल्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. मित्रांनो आपण करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. आपण अनेक दिवसांपासून या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले आहे. अनेक दिवसापासून जे सतत प्रयत्न करत आहात.

त्यामध्ये आपल्याला मोठे यश प्राप्त होणार आहे. नवीन कामाची सुरूवात लाभदायक होऊ शकते जीवनात सुखाचे दिवस येणार आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून प्रगतीला सुरुवात होणार आहे.

एका नव्या प्रगतीला आपल्या जीवनात सुरुवात होईल. प्रगतीच्या दिशा मोकळ्या होणार आहेत. नवीन कामांना वेग येणार आहे. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहेत. आतापर्यंत आपल्या स्वप्नात असणारे योजना आता प्रत्यक्षात उतरणार आहे.

मित्रांनो हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरेल चोहीकडून आनंदाचा वर्षाव होण्याचे संकेत आहेत. आनंददायी घटना आपल्या जीवनात घडून येतील. नशिबाची साथ आणि आपली मेहेनत आता फळाला येणार आहे. म्हणून जीवनात मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते.

कुंभ राशी- कुंभ राशिच्या जीवनात प्रगतीच्या काळाची सुरुवात होणार आहे. शनिचा आशीर्वाद आपल्या जीवनात आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. दिनांक २९ एप्रिल रोजी शनिदेव आपल्या राशीत प्रवेश करणार आहेत. शनिचे आपल्या राशीत होणारे आगमन सुखाची दिवस घेऊन येणार आहे.

त्या काळात आपल्याला विशेष लाभ प्राप्त होणार आहेत. उद्योग-व्यापारात आपल्याला मोठा लाभ प्राप्त होईल. व्यवसायात निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील. व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. सरकारी कामात यश प्राप्त होईल आर्थिक क्षमता मजबूत बनेल.

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *