फक्त ३ शुक्रवारी करा हा उपाय आणि मग पहा. देवी महालक्ष्मी नक्कीच घरी येईल..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो आपल्या सर्वांचीच देवावर विशेष भक्ती असते, आपल्यावर आलेल्या संकटांचे निरसन व्हावे यास्तव आपण देवाला नेहमी प्रार्थना करत असतो. देवाची मनोभावे पूजा करत असतो, या सर्व देवी देवतांच्या मध्ये आपण देवी महालक्ष्मीला देखील मनापासून पूजतो.

तिचे महत्व आपल्या सर्वांच्या आयुष्यात अनन्यसाधारण आहे. ती आहे तरच घरात संपत्ती टिकून आहे आणि त्यामुळेच सुख सुविधा, समाधान राहते. तिचा वास घरात असेल तर घरातील वातावरण प्रसन्न राहते.

त्यामुळे घरातील सदस्य देखील नेहमी सदृढ, निरोगी, आनंदी राहतात. मित्रहो देवी महालक्ष्मीला जर प्रसन्न करावयाचे असेल तर सर्वप्रथम आपणाला श्रीहरी विष्णू देवांना प्रसन्न करावे लागेल. कारण जिथे देव विष्णू वास करतात तिथेच देवी लक्ष्मी वास करत असते.

त्यामुळे आज आम्ही या लेखातून तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहोत, जो देवी महालक्ष्मीला आणि विष्णू देवांना प्रसन्न करण्यास आपणाला मदत करतो. हा उपाय खुप साधा आहे पण तो भावपूर्ण श्रद्धेने करावा.

ही पूजा करताना किंवा कोणतीही पूजा करताना मनात विश्वास, भक्ती असणे आवश्यक असते. तरच त्याचा आपल्याला लाभ होतो आणि देव देखील प्रसन्न होतात. तर मित्रहो हा उपाय तुम्ही तीन आठवडे करायचा आहे.

कोणत्याही महिन्याच्या शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता. यासाठी तुम्हाला ब्रम्हमुहूर्तावर जागे व्हावे लागेल, हा मुहूर्त म्हणजे पहाटे चार ते सहा मधील कालावधी होय. म्हणजेच सूर्योदय होण्याच्या पूर्वीची वेळ.

त्यानंतर पहाटे उठल्यावर तुम्ही घराजवळ असलेल्या नदीमध्ये, विहिरी मध्ये किंवा कुंडात जाऊन स्नान करून करू शकता पण जर असे करणे अशक्य असेल तर तुम्ही घरी देखील स्नान करू शकता.

नंतर देवीच्या मूर्तीची पूजा करून तिच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावून जप माळ घेऊन देवी लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणावा “ओम श्री श्रीये नमः”. या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा. व नंतर देवीच्या चरणी मस्तक टेकून तिचा आशीर्वाद घ्यावा.

वरील सांगीतलेला मंत्र आवर्जून म्हणावाच, कारण यातून देवीपर्यंत आपली प्रार्थना लगेच पोहचते. ही पूजा झाल्यावर आपण आपल्या बाकी कामाकडे वळू शकतो. पण लक्षात ठेवा की ही पूजा बरोबर सहा वाजायच्या आतमध्ये पूर्ण व्हायला हवी.

ही पूजा तुम्हाला तीन आठवडे करायची आहे. मित्रहो शुक्रवारी सकाळी पहाटे उठून स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करावे, हे पिवळे वस्त्र देव विष्णू यांना खूप प्रिय आहे. त्यानंतर तुपाचा दिवा लावून “ओम श्री श्रीये नमः” हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणून जप करावा.

ही पूजा करत असताना आपल्या उजव्या हाताच्या बोटात चांदीची अंगठी घालावी. नंतर देवीला खीर भाताचा नैवेद्य दाखवावा, तसेच एखाद्या ब्राम्हण किंवा गरजू व्यक्तीला थोडेसे गहू आणि तांदूळ द्यावे. हे धान्य तुम्ही पहाटेच बाजूला काढून ठेवू शकता व त्या दिवसभरात कधीही ते दान करू शकता.

तसेच त्याच दिवशी एका सात किंवा त्या खालील वय असणाऱ्या मुलीस भोजन देऊन कन्या भोजन करायचे आहे. हा उपाय तुम्हाला तीन शुक्रवारी करायचा आहे. पहिल्याच शुक्रवारी तुम्हाला याचा काहीसा प्रभाव जाणवेल.

मित्रहो हा उपाय नक्की करून पहा, तुम्हाला धनप्राप्ती नक्की होईल. तसेच आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *