नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो पितृपक्ष हे २१ सप्टेंबर मंगळवार पासून सुरू होणार आहे ते पुढील १५ दिवस हे पितृपक्ष राहणार आहे. पितृपक्षात आपण तिथीनुसार श्राद्ध करत असतो. प्रत्येक तिथीला श्राद्ध करण्याची प्रथा फार पूर्वीपासून सुरू आहे. परंतु मित्रांनो तुम्हाला श्राद्ध करणे शक्य नसेल तर तुम्ही हे एक काम करू शकतात.
तर मित्रांनो जे लोक विदेशात आहेत किंवा ज्या लोकांना श्राद्ध करण्यात काही अडचण असेल त्यांनी आम्ही सांगितलेले हे एक काम करावे परंतु ज्यांना श्राद्ध करण्यास जमणार आहे त्यांनी श्राद्ध अवश्य करावे. अस नाही की आम्ही सांगतोय ते एक काम करायचे.
फक्त जेव्हा तुम्हाला माहिती नसेल की श्राद्ध कसे करावे,किंवा तुम्ही गावापासून लांब राहत असाल अश्याच परिस्थितीत तुम्ही हे एक काम अवश्य करावे. मित्रांनो तुम्ही जर विधिवत श्राद्ध करण्यासाठी सक्षम नसाल तर तुम्ही हा एक उपाय करून पित्रांना तृप्त करू शकतात. यामुळे तुमचे पितृ नाराज होणार नाही व तुम्हाला कोणतेही दोष लागणार नाही.
मित्रांनो पितृपक्षात रोज तुम्ही २१ सप्टेंबर मंगळवार पासून ते ६ ऑक्टोबर बुधवार पर्यंत कावळ्याला व गाईला घास टाकायचा आहे. गाय नसेल तर काही हरकत नाही तुम्ही फक्य कावळ्याला घास टाकू शकतात. आता घास म्हणजे आपण जेव्हा सकाळी जेवण बनवतो तर त्या जेवणातून एक पोळी आणि त्यावर भाजी घ्यावी.
आपल्या घरातील कोणताही सदस्य जेवायच्या आधी ते आपल्या गच्चीवर किंवा इतर त्या जागेवर ठेवावे जेथे ते फक्त कावळा खाऊ शकेल. म्हणून तुम्ही नक्की हे एक काम करा. कारण श्राद्ध जेव्हा आपण करतो ते कावळ्याशी निगडित आहे.
म्हणून जर तुम्ही श्राद्ध नाही केले आणि फक्त कावळ्यांना घास टाकला तरी आपले पितृ प्रसन्न होतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही रोज कावळ्याला घास खायला देणार तेव्हा आपल्या पित्राचे नाव घायला विसरू नका.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद