लग्नाला झाला होता फक्त एकच आठवडा, माहेरी गेली ती परतलीच नाही, घ्यायला गेल्यावर घडले असे काही की…

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

हॉलमध्येच सगळेजण बसले होते आणि राहुल रागानेच बोलत होता. त्याचे हे बोलणे सगळेच गप बसून ऐकत होते. फक्त नेहाच खाली मान घालून बसली होती आणि हुंदके देत रडत होती. तेव्हा नेहाचे वडील हात राहुल समोर हात जोडत म्हणाले, “जावईबापू मला क्षमा करा, मी तुमचा गुन्हेगार आहे.

माझे संस्कारच कोठे तर कमी पडले असणार…” त्यांच्या डोळ्यातूनच अपराधाचे भाव दिसत होते. त्यामुळे त्यांना पाहून राहुलला सुद्धा वाईट वाटले. नेहाच्या वडिलांची यात काही चूक नव्हतीच, तरी सुद्धा त्यांच्या मुलीच्या चुकीची शिक्षा त्यांना भोगावी लागत होती.

राहुल त्यांना म्हणाला, बाबा यात चूक फक्त तुमच्या एकट्याची नाहीये. कारण मुलांचे आई आणि वडील हे दोघेही आपल्या मुलांना संस्कार देत असतात. आणखी एक विशेष अशी गोष्ट म्हणजे आई ही आपल्या मुलीची मैत्रीण असायला हवी. एक मैत्रीण बनून मुलीच्या भावना समजून घ्यायला हव्या.

तसेच तिच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी तिला मदत करायची असते. नेहाचे वय अल्लड होते. ज्या वयामध्ये मुली मुलांकडे आकर्षित होत असतात. पण अशावेळी मुलींना योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ही पूर्णपणे आईची असते.

राहुल पुढे म्हणाला माझ्या मते या गोष्टींमध्ये नेहाची जितकी चूक आहे त्यापेक्षा अधिक चूक तुमची आहे सासूबाई. तुम्हाला या गोष्टी विषयी सर्व माहिती असून सुद्धा तुम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल. यावेळी नेहाला तुम्ही योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे होते तसेच ही गोष्ट बाबांच्या कानावर सुद्धा घालायला हवी होती आणि ही तुमची जबाबदारी देखील होती. मात्र सध्या असो…

तुम्हाला जो काही योग्य निर्णय घ्यायचा आहे तो घ्या आणि मला कळवा मी येतो. राहुल जाण्यासाठी निघत होता तेवढ्यात नेहाचे वडील हात जोडून त्याला थांबवू लागले. ते म्हणाले, जावईबापू आम्हाला एक चूक सुधरण्याची संधी द्या. तुमच्या सारखा जावई मिळायला भाग्य लागतं. मात्र आमच्याच मुलीला तुमची किंमत नाहीये, याचीच खंत वाटत आहे.

नेहाचे वडील तिच्याकडे बघत म्हणाले, नेहा तू आता काय करायचे ठरवले आहेस? नेहा रडतच होती, परंतु तिच्या डोळ्यात अपराधाचे भाव दिसत आहेत. नेहा म्हणाली, बाबा मला क्षमा करा माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. आता तुमचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल.

परंतु तिचे बाबा म्हणाले, नाही नेहा… आता जो काही निर्णय आहे तो तुलाच घ्यायचा आहे. जर कोणावर आपले निर्णय लादले तर त्याचे काय परिणाम होतील याची कल्पना मला आली आहे. यावर नेहा म्हणाली, बाबा माझी चूक झाली मला माफ करा. माझी ही अखेरची चूक समजून मला माफ करा. अशी ही चूक परत होणार नाही आणि तुम्ही बरोबर बोलला राहुल सारखा समजूतदार नवरा मिळायला भाग्यचराहुलचं.

राहुलच्या समोर येऊन नेहा हात जोडून म्हणाली, मला माफ करा. मी माझ्या सुखासाठी सर्वांचा विश्वासघात केला आणि माझ्या चुकीला क्षमा नाही. मात्र ती चूक सुधरण्याची एक संधी मला द्या. शेवटची चूक समजून मला माफ करा… प्लीज! प्लीज! राहुल मला माफ करा. राहुल म्हणाला, नाही नेहा.. पुन्हा तू चूक करत आहेस.

मला हे सगळ मान्य नाहीये. राहुलच्या या बोलण्याने सर्वांना धक्काच बसला. नेहचे बाबा पटकन खालीच बसले. आपल्या मुलीच्या आयुष्यात आता काही विपरीत घडणार याचा अंदाज त्यांना आला होता. नेहा राहुल कडे पाहत उभारली होती. तेव्हाच कानाखाली मारल्याचा आभास तिला झाला. ती पटकन खाली सोफ्यावर बसली. तिचे डोके गरगरत होते. काही वेळ सगळे शांतच होते.

राहुल म्हणाला नेहा, तुझ तर विपीन वर प्रेम आहे आणि माझ्यासोबत संसार तू करू शकतेस का? तसेच आपला हा संसार सुखाचा तरी होईल का? विपिनची जागा तू मला देऊ शकतेस का? तू शरीराने जरी माझ्याकडे राहिलीस तरी तू मनाने विपीनजवळ असशील. या गोष्टीला काय अर्थ असेल तूच मला सांग. म्हणून माझ म्हणणं आहे की तुझ ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यासोबतच तू संसार कर.

मी तुझ्यासोबत आहे. सर्वात आधी तू विपीनला फोन करून सांग की, मला तुझ्यासोबत उद्या लग्न करायचं आहे. सगळेजण राहुल कडे पाहतच राहिले. नेहाला तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता. तिच्या डोळ्यात पाणी होते आणि राहुल विषयी नितांत आदर होता.

राहुलने नेहाला फोन करण्यास सांगितले आणि फोन स्पीकर वर ठेवायला लावला. सर्वांचे लक्ष त्या फोन कडे होते आणि समोरून आवाज आला हा बोल नेहा. नेहा म्हणाली मला उद्या तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. आपल्या लग्नाला सर्वजण तयार झाले आहेत. समोरून आवाज आला, काय… नेहा तू मूर्ख आहेस का..?

तुझ लग्न झालं आहे आणि तू १२ दिवस तू तिथे राहून आली आहेस. मी कसे लग्न करणार मग तुझ्याशी. लग्न करणे आता शक्य नाहीये. मला माफ कर. विपिनच्या या बोलण्यावर नेहाचा विश्र्वासच बसला नाही. तू म्हणाली विपीन तू हे काय बोलत आहेस. मी तुझ्यावर प्रेम करते आणि म्हणूनच मी माझा संसार सोडून आले आहे.

माझ्यावर विश्वास नाही का तुला…आणि आपण चार दिवस झाले भेटत आहोत त्याचे काय झालं. त्यावर विपीन म्हणाला, नेहा भेटायला मी येत नाही तू बोलवतीस म्हणून.. तुझा टाइमपास व्हावा म्हणून.. याचा अर्थ असा नाही की मी तुझ्याशी लग्न करेन. तू तुझ्या नवऱ्यासोबत राहून आली आहेस. सॉरी मला माफ कर. आणि फोन कट झाला.

सर्वांनाच धक्का बसला. नेहाला विश्वास बसत नव्हता. ती शॉकच झाली होती. ज्याच्यासोबत इतकं प्रेम केलं, ज्याच्यासाठी आपण सगळं सोडण्यास तयार झाले, त्याने एका क्षणात आपल्याला सोडलं. प्रेमभंगाचे अश्रू तिच्या डोळ्यात भरले होते. सर्व काही नष्ट झाल्याची स्थिती नेहाची झाली होती.

नेहाचे बाबा हे सर्व काही पाहत होते आणि नेहाची विपीन पासून सुटका झाल्याचा आनंद सुद्धा त्यांना होता मात्र भीती सुद्धा होती. ते उठले आणि राहुल ला म्हणाले जवाईबापू तुम्ही नेहासाठी उत्तम जोडीदार आहात. त्यांनी हात हातात धरले. तेवढ्यात नेहाने राहुलचे पाय धरले आणि म्हणाली मला माफ करा माझी चूक झाली.

मी प्रेमात आंधळे आणि स्वार्थी झाले होते. प्रेमासाठी सर्वांना सोडायला तयार झाले होते. मात्र ते प्रेम नसून एक आकर्षण होते. माझ्यासारख्या अनेक मुली या मोहजाळ्यात अडकतात आणि आपले जीवन खराब करून घेतात. माझ्या हातून भविष्यात पुन्हा अशी चूक होणार नाही.

मला माफ करा. नेहाच्या अश्रूने पाय भिजून गेले होते. राहुलने नेहाला उठवले आणि मिठीत घेतल. ती मनोसक्त रडली. थोड्या वेळाने राहुल म्हणाला निघायचं का मग आपल्या गावाला.. नेहाने मान डोलवली, मी बॅग भरते म्हणाली. तिने सर्वांची माफी मागितली. तसेच नेहाच्या आईला सुद्धा त्यांची चूक कळाली, त्यांनी देखील सर्वांची माफी मागितली.

त्या डोळे पुसत आत गेल्या आणि नेहा आपली बॅग घेऊन बाहेर आली. राहुल आणि नेहा या दोघांनी बाबांचा आशिर्वाद घेतला. बाबांनी त्यांना जवळ घेऊन सुखी रहा म्हणाले आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. नेहा आता खऱ्या अर्थाने आपल्या सासरी चालली होती.

त्या दोघांनी निरोप घेतला आणि निघाले. घरी तिने सून म्हणून आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडली. तिने आपले जेवण आटोपले आणि आपल्या बेडरूम मध्ये गेली. तिथे राहुल तिची वाट पहात होता. नेहा एका नव्या नवरी प्रमाणे लाजत राहुलच्या मिठीत गेली.

आजचा हा हृदयस्पर्शी लेख तुम्हा सर्वांना कसा वाटला, हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच हा लेख तुम्हाला आवडल्यास लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमडळींला सुद्धा शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *