घरची परिस्थिती खूप गरिबीचे असतांना बघा या मुलीने काय केले.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

एकदा डिसेंम्बर मध्ये नववीच्या आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी एका शाळेन कार्यशाळा आयोजित केली होती. मी माझ्या शाळेमार्फत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होतो. आम्ही शाळेत पोहचण्या आधीच मुले शिस्तीत बसली होती.

शाळेबाहेर नावासकट आमच्या स्वागताचा बोर्ड होता. या शाळेतील मूल अत्यंत गरीब घराण्यातील होती. मुलांचे पालक मुलांना शाळेत पाठवून उपकार करतात अशी भावना पालकांची होती. बहुतेक मुलांचे वडील हें दारू पिणारे होते. घराकडे काहीही लक्ष न देणारे.

आई बहुतेक रोजंदारीवर काम चालवणारी. त्यामुळे मुलांना शिक्षणासाठी आधार असा नाहीच. तरीही शाळेचे शिक्षक संस्थापक मुलांना प्रामाणिकपणे सर्व काही देण्याचा प्रयत्न करत होते. ते पाहून खूप बर वाटल अभ्यास कसा करावा वाचलेल कस लक्षात ठेवाव.

या विषयावर मुलांना कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आल. अतिथी म्हणून माझ काम मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करणे व त्यांच्यामध्ये विश्वास जागवणे हेच होते. ते मी छान गोष्टी रूपातून केल. शिक्षक आणि कार्य संचालक माझ्यापासून खूप खूष झाले.

कार्यशाळा संपल्यानंतर विद्यार्थ्यांचा झुळका माझ्या आजूबाजूला जमा झाला हा माझा नेहमीचा अनुभव होता. कारण मूल त्या वेळेला खूप अज्ञान झालेली असतात त्यांच्या मनात खूप प्रश्न निर्माण झालेले असतात. सुमारे अर्धा तास या प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम सुरू होता.

शेवटी मॅडम ने आम्हाला कार्यालयामध्ये चहापाण्यासाठी आमंत्रित केल मी मुलांच्या झुळक्यातून वाट काढत कार्यालयाकडे गेलो. तेवढ्यात एक नववीची मुलगी माझ्याकडे आली आणि म्हणाली सर मला तुमचा मोबाईल नंबर देता का?

मी तिला माझ कार्ड दिल आणि म्हणालो बेटा नंतर या वरती फोन कर मी तिला तिच नाव विचारल ती बोलली माझ नाव अस्मिता आहे. ती खूप गोरीपान होती छान वेणी घातलेली होती ती नववीतच होती. पण मला ती तिच्या वयापेक्षा जास्त मॅच्युअर वाटली. माझं कार्ड घेत ती तिच्या मैत्रिणींच्या झुळक्यात मिसळली.

शिक्षण कार्यालयांमध्ये पालकांचे अनुभव व मुलांचे शिक्षण या विषयावर दहा ते वीस मिनिटे चर्चा झाली मग मी तिकडून निरोप घेतला. मी थोड्या दिवसात अस्मिता ला विसरूनही गेलो. मग एके दिवशी अचानक अनोळखी नंबर वरून मला फोन आला. समोरून आवाज आला हॅलो सर मी अस्मिता बोलत आहे.

त्यादिवशी तुम्ही आमच्या शाळेमध्ये आले होतात ना सर मी तुमचं कार्ड घेतल होत. हा बोल अस्मिता काय म्हणतेय? सर मला तुमची थोडी मदत हवी होती हा बोल ना काय मदत हवी सर माझे वडील हात गाड्यावर केळी विकतात. दिवसाला २०० रुपये मिळतात आणि हातगाडी बाहेरून आहे. म्हणून तिचे शंभर रुपये द्यावे लागतात.

त्यातूनही वडील दा-रू पितात माझी आई जवळच्या कारखान्यात कापूस वेचायचे काम करते. तिला रोज १५० रुपये पगार मिळतो पण कापसाचे यंत्र पाशी बसून तिला दम्याचा त्रास व्हायला लागलाय. घरात मीच मोठी आहे दोन लहान भाऊ व एक लहान बहीण आहे आईला मदत म्हणून मला काहीतरी काम हवे आहे.

मी विचारल तुला काय काम करायला आवडेल तेव्हा ती म्हणाली मला चित्रकला आवडते सर तुम्ही जेव्हा आमच्या शाळेत आला होतात ना तेव्हा शाळेच्या दारात मीच रांगोळी काढली होती. सर मला मेहंदी ही खूप छान काढता येते त्यावर सर म्हणाले अस्मिता हा फोन कोणाचा आहे अस्मिता म्हणाली हा माझ्या क्लास टीचर चा फोन आहे.

मी म्हणालो ठिक आहे अस्मिता मी तुला आठवड्या भरात तुझ्यासाठी काही काम असले तर तुला याच फोनवरती निरोप देतो. मी लगेच तो फोन अस्मिता मॅडम या नावाने सेव्ह केला ती ज्या वस्तीत राहते त्या परिस्थितीत वाढलीय तरी किती विचार करते हे खरच मला अनपेक्षित नव्हतं.

काय काम द्यायच या मुलीला याचा मी विचार करत बसलो होतो तेवढ्यात माझा सोलापूरचा एक मित्र आला लग्नाची पत्रिका द्यायला त्याचा सोलापूर मध्ये खूप मोठा कपड्यांचा व्यवसाय होता. लग्न सोलापूर मध्येच होणार होत मला अचानक अस्मिता ची आठवण झाली मी म्हणालो बाळासाहेब मेहंदी च काय केलय कोणाला सांगितल आहे का? त्यावर बाळासाहेब म्हणाला ते डिपारमेंट माझ्या बायकोकडे आहे.

त्याने लगेच आपल्या बायकोला फोन लावला बायको म्हणाली मी कधीच तुमच्या मित्रांना सांगत आहे की बघा ते बघूया बघूया म्हणत म्हणत आता लग्नाला तीनच दिवस राहिले. तुमच्या ओळखीच कोणी मेहंदी काढायला असेल तर कळवा आम्हाला मी लगेच अस्मिताच्या मॅडमशी बोललो आणि अस्मिता सोबतही बोललो व अस्मिताच बोलण वहिनी सोबत करून दिल.

पुढच्या तीन दिवसात चारशे रुपये एका हातावर प्रमाणे अस्मिताने ५० मुलींच्या हातावरती मेहंदी काढली काही लोकांनी अस्मिता पासून खुश होऊन तिला जास्त पैसेही दिले. या तीन दिवसात अस्मिताने जवळजवळ तीस हजार रुपये कमावले होते या तीन दिवसात अस्मिता मला रोज रिपोर्टिंग करत असे मीही तिला खूप उत्साहाने प्रोत्साहन करत असे.

लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी अस्मिता चा मला फोन आला. सर तुमच्या साठी खूप खूप धन्यवाद पुन्हा तुमच्यामुळे मला मेहंदी काढण्याच काम मिळाल त्यातून मला तीस हजार रुपये मिळाले त्यातून बाबांसाठी पाच हजार रुपयांचा एक हात गाडा तयार करून घेतला. आईला दवाखान्यात घेऊन गेले व तिचे उपचार केले तिला थोड्या पैशांमधून एक शिलाई मशीन घेऊन दिली.

घरावर जुन्या बाजारातून पत्रे विकत घेतली व ती घरावर टाकली आता पावसाळ्यात आमचं घर कधीही गळणार नाही. आणि उरलेल्या पैशातून आणखी दोन हात गाड्या तयार करून घेतल्या ते मी शंभर रुपये प्रमाणे रोज भाड्याने देते. ते पैसे मी स्वतः घेते त्यातून आमच्या शिक्षणाचा खर्च भागेल. मी आता कम्प्युटर क्लासेस लावणार आहे कारण तुम्ही सांगितलेल्या काकांना माझा स्वभाव खूप आवडला.

त्यांच्या सुपरमार्केट मध्ये मी १८ वर्षांची झाल्यावर नोकरी देईल असे म्हणाले. हे सर्व तुमच्या मुळे शक्य झालय सर आता बाबा दारू पीत नाही. आमच्या घरातील वातावरण अगदी प्रसन्न झाले ते सर्वांची काळजी घेतात सर्वांशी प्रेमाने बोलतात. सर माझ्या आई-वडिलांची तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे त्यांनाही देव बघायचा आहे.

हे सर्व ऐकून मी सहजपणे श्रीनिवास कडे मेहंदी चा विषय काढला 1काय आणि या मुलीने तर चमत्कार करून दाखवला. अस्मिता तू तुझ्या आई-वडिलांना घेऊन कधीही ये फक्त फोन करून ये आणि एक म्हणजे मी कोणताही देव नाही मी तुझ्यासारखाच एक माणूस आहे. आणि हे सर्व तुझ्या मुळे शक्य झाले तू माझ्याशी बोलली मी बाळासाहेबांची बोललो आणि हे सर्व शक्य झालं बोलून तर बघा प्रॉब्लेम आपोआप सुटतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *