मूल होत नाही म्हणून या व्यक्तीने आपल्या पत्नी साठी काय केले हे पाहून डोळ्यात पाणी येईल.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

कंडक्टर ने बसचे दार उघडले आणि सामंत काका दाराजवळ आहे. हातात एक गणपतीची नाजूक मूर्ती होती. कंडक्टर ने ते पाहिलं आणि हात देऊन काकांना आत घेतलं. मागून दोन पॅसेंजर चढले. बस चालू झाली कंडक्टर ने ड्रायव्हर ला ओरडून सांगितले थांबा जरा गणपती मूर्ती आहे. ड्रायव्हर ने गाडी थांबवली लोकांनी मागे पाहून मूर्तीकडे बघितले. ते गोंडस गणपतीची मूर्ती पाहून काही लोकांचे हात नकळत जोडले गेले.

कंडक्टर ने सामंत काकांना आपल्या शेजारीच बसायला सांगितले. कंडक्टर ने डबल बेल दिली बस सुरू झाली. कंडक्टर ने सर्वांची तिकिटे काढून येऊन तो काकापाशी आला. काकांच्या खिशात पैसे होते पण मांडीवर मूर्ती असल्याने काकांना तिकिटासाठी पैसे काढता येत नव्हते. काकांची धडपड पाहून कंडक्टर म्हणाला राहुद्या काका उतरताना द्या किंवा बस जेव्हा थांबेल तेव्हा माझ्या सीटवर मूर्ती ठेवून पैसे द्या.

थोड्यावेळाने कंडक्टर ने विचारले की काका तुमच्या गावात गणपतीची मूर्ती मिळत असेलच न मग दुसऱ्या गावातून आणि ते पण बसची दगदग सहन करून का आणत आहे तुम्ही. कंडक्टर च्या या प्रश्नावर काकांनी एक स्मिथहास्य दिल आणि म्हणाले आमच्या गावात मिळतात मुर्त्या पण अशी मूर्ती मिळत नाही ही मूर्ती बघ किती गोंडस आहे आणि जिवंत वाटते अगदी लहान बाळासारखी.

कंडक्टर ने होकारार्थी मान हलवली पुन्हा हात जोडले अगदी स्पर्श सुद्धा केला. मला मुलं बाळ नाही सर्व उपाय करून थकलो आम्ही मग प्रयत्न सोडून दिला. माझी पत्नी या गावात १५ वर्षे आधी आली होती तिने ही मूर्ती तिथे पहिली आणि तिचे वात्सल्य जाग झाल जणू काही. तिचे डोळे नकळत वाहू लागले व तोंडातून शब्द फुटले माझे बाळ. हे अस घडल्यापासून मूर्ती आणण्याचा हा प्रवास सुरु झाला. तिला सांधेदुखीने बसचा प्रवास झेपत नाही म्हणून मी आणतो.

कंडक्टर हे सर्व ऐकून स्तिर झाला आणि म्हणाला काका तुम्ही त्याच कलाकार कडून मूर्ती तुमच्या गावात सुद्धा बनवून घेऊ शकतात ना? काका म्हणाले त्यांना जास्त मुर्त्या असल्या तरच इंटरेस्ट आहे. वरून हमी भावाची शास्वती नाही. हे सर्व संभाषण बाजूचे लोक ऐकत होते. त्यातिल एका स्त्रीने म्हटले काका मग विसर्जित च नाही करायची मूर्ती. सामंत काका फिकट हसले व म्हणाले प्रेमामुळे विरह पाझरत तीच.

माझी बायको आताही दारासमोर रांगोळी काढून बसलेली असेल सोबतच हातात पूजेच ताट काय नैवेद्य काय सर्व ती तयारी करून बसली असेल. आणि हे सर्व करण्यातून तिला खूप सुखाची प्राप्ती होते मला तीच हे सुख हिरावून घायच नाही आहे. यावर कोणाचे डोळे पाझरले, कोणी स्मिथ केलं तर कोणी मौन राहिले. त्यानंतर काकांच गाव आलं एक व्यक्ती उठला त्याने काकांची मूर्ती हातात धरली व म्हणाला काका तुम्ही तिकीट काढा तोपर्यंत धरतो मी मूर्ती. काही लोक मूर्तीकडे जवळून पाहत राहिले.

लोकांची नजर आता बदलली होती. सामंत काकांनी कंडक्टर ला पैस दिले म्हणाले दीड तिकीट द्या एक हाफ आणि एक फुल. कंडक्टर म्हणाला दीड का तुम्ही तर एकच आलेले आहात त्यावर काका म्हणाले दोघे नाही का आलो एक मी आणि एक माझा हा बाल गणेश. हे ऐकून सर्व लोक एकमेकांकडे पाहू लागले.

काका म्हणाले सर्व असे विचारात का पडले आहे आपण गणपतीला देव मानतो त्याला प्राण प्रतिष्ठा देतो पण ते फक्त माती आहे का? मग त्यात जीव नाही का. आपणच त्याला मातीची मूर्ती या भावनेने पूजतो व बघतो पण त्याला एकाचीच गरज आपल्या प्रेमाची व आलिंगणाची.

हे सर्व बोलून झाल्यावर सामंत काका म्हणाले द्या दीड तिकीट. कंडक्टर ने दीड तिकीट दिले व सामंत काका बसच्या खाली उतरायला निघाले. तेव्हा प्रत्येक प्रवासाचे डोळे पाणावले होते व हात जोडलेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *