रक्षाबंधनला या अशुभ मुहुर्तावर चुकूनही भावाला राखी बांधू नका. नाहीतर

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यावेळी रक्षाबंधन रविवारी २२ ऑगस्ट रोजी येत आहे रक्षाबंधन हा हिंदूंचा विशेष सणापैकी एक मानला जातो. हा सण भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे, या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षा स्त्रोत बांधतात आणि त्याला दीर्घायुष्य आणि उज्वल भविष्याची शुभेच्छा देतात.

त्याच बरोबर भाऊ बहिणीला प्रत्येक सुख दुःखात साथ देण्याचे आणि संरक्षण करण्याचे वचन देतो या दिवशी भाऊ बहिणीला भेटवस्तू ही देतो. मित्रांनो राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त पाहणे हे अत्यावश्यक असते. जेणेकरून कालांतराने भाऊ-बहिणीचे नाते आणखी दृढ होईल. अशा स्थितीत जास्तीत जास्त लक्ष भद्रा काळ आणि राहू काळ या कडे दिले जाते अशुभ काळ मानले जातात. राखी बांधण्याचा शुभ आणि अशुभ मुहूर्त आणि राखी बांधण्याच्या नियमां बद्दल आपण आज जाणून घेऊ या.

मित्रांनो पंचांगानुसार भद्राची उपस्थिती सकाळी ०६:१६ पर्यंत राहील कोणत्याही परिस्थितीत भद्रकाळात राखी बांधू नका. भद्र काळ हा विनाशकारी काळ मानला जातो, म्हणूनच त्याला अशुभ म्हटले जाते. मित्रांनो अख्यायिका नुसार त्रेतायुगात रावणाने आपल्या बहिणी कडून भद्र काळात राखी बांधून घेतली होती. त्यानंतर त्याच्या विनाशाला सुरुवात झाली होती आणि अखेर प्रभू श्रीरामांनी त्याचा वध करून त्याला संपवला होता. त्यामुळे भद्र काळात कोणतीही बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधत नाही तर मित्रांनो हा राहू काळ कधी आहे?

तर मित्रांनो राहुकाळ संध्याकाळी ५ वाजून ०५ मिनिट पासून ते संध्याकाळी ६ वाजून ३९ मिनिटां पर्यंत असेल. राहू काळात कोणतेही काम यशस्वी होत नाही. अशी धार्मिक श्रद्धा आहे म्हणून राखी बांधण्याचे कामही राहू काळाच्या वेळी करू नये भद्र आणि राहू काळ दोन्ही अशुभ मुहूर्त मानले जातात. मित्रांनो रक्षाबंधनचा मुहूर्त आपण जाणून घेऊया पौर्णिमा तिथी ही २१ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजेपासून सुरू होईल. तर २२ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजून ३१ मिनिटां पर्यंत असणार आहे.

आता पूजेचा शुभ मुहूर्त- तर पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ६ वाजून १५ मिनिटांपासून सुरू होईल. ते संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपर्यंत राहणार आहे. २२ ऑगस्ट रोजी आता आपण राखी केव्हा बांधू शकतो तर राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आपण बघूया. राखी तुम्ही २२ ऑगस्ट २०२१ रविवारच्या दिवशी दुपारी १ वाजून ४२ मिनिटांपासून ते सायंकाळी ४ वाजून १८ मिनिटां पर्यंत बांधू शकता. हा अत्यंत शुभमुहूर्त आहे.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *