२२ ऑगस्ट रक्षाबंधन ३ अद्भुत महासंयोग पूजेच्या ताटात नक्की ठेवा ही एक वस्तू भाउ बहीण दोघे ही होणार श्रीमंत.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

रक्षाबंधन म्हणजे नारळी पौर्णिमा या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधनाचा दिवस म्हणजे भाऊ आणि बहिण यांच्या प्रेमाचा दिवस असतो, सासरी गेलेल्या मुली या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात. कारण हा दिवस म्हणजे त्यांच्या हक्काचा आणि सुट्टीचा दिवस असतो.

या दिवशी बहिण जेव्हा आपल्या भावाला राखी बांधायला येते तेव्हा ती घरामध्ये मिठाई तांदूळ दिवा कुंकू व पाण्याने भरलेला कलश अशी सर्व सामग्री घेते. भावाचे राखी पूजन करताना या सात वस्तू ताटात असणे अनिवार्य आहे. पूजेच्या ताटामध्ये ह्या सात वस्तू ठेवण्यामागे काय कारण आहे हे आपण आता जाणून घेऊया.

कुंकू- बहीण आपल्या भावाला सर्वात आधी कुंकू लावते. कुंकू हे सूर्य ग्रहाशी संबंधित आहे. कुंकवाचा टिळा लावल्याने सूर्याची शुभदृष्टी भावावर पडते. व बहीण सूर्याकडे भावासाठी प्रार्थना करते की येणाऱ्या वर्षात आपल्या भावाला सर्व प्रकारचे यश व प्रसिद्धी मिळावी.

तांदूळ किंवा अक्षता- कोणत्याही पूजेत तांदळाला अत्यन्त शुभ मानले जाते आणि तांदलाशिवाय कोणतेही पूजन पूर्ण होत नाही. बहीण आपल्या भावाला कपाळावर कुंकू लावून त्यावर तांदूळ लावते ते शुक्र ग्रहाशी संबंधित आहे.व अशी पार्थना करते की माझ्या भावाला नेहमी यशाकडे ने आणि माझे आणि माझ्या भावाचे संबंध नेहमी स्नेहपूर्ण व प्रेमळ राहावे.

नारळ- नारळाला पूजेत श्रीफळ म्हटले जाते. नारळ राहू ग्रहाशी संबंधित आहे बहीण पूजन झाल्यानंतर भावाला नारळ देते तर त्याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या वर्षामध्ये माझ्या भावाला सर्व प्रकारच्या सुख सुविधा मिळत राहो व त्याचे जीवन आरामदायी व सुखी असो.

राखी- राखी नेहमी उजव्या हातात मनगटावर बांधली जाते. राखी ही मंगल ग्रहाशी संबंधित आहे. याचा अर्थ असा होतो की भावाने आपल्या बहिणीचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रुपात नेहमी रक्षण करावे.

मिठाई — राखी बांधून झाली की बहीण भावाला मिठाई खायला देते व त्याचे तोंड गोड करते मिठाई गुरु ग्रहाशी संबंधित आहे व त्यामुळे अशी प्रार्थना केली जाते की माझ्या भावाचे व्यवहारीक जीवन मुले-मुली नेहमी सुखी रहावे व माझ्या भावावर देवी लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहावे. आणि आपल्या भावाच्या घरातील सर्व कार्य कोणतेही विघ्न न येता पूर्ण पडावे.

दिवा- त्यानंतर बहीण आपल्या भावाला दिव्याने ओवाळते दिवा शनि आणि केतु ग्रहाशी संबंधित आहे. बहीण आपल्या भावाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करते की माझ्या भावाच्या जीवनातील सर्व रोग व बाधा दूर व्हाव्या.

पाण्याने भरलेला कलश- नंतर बहीण पाण्याने भरलेल्या कलशाने भाऊची पूजा करते पाण्याने भरलेला कलश चंद्राशी संबंधित आहे ही पूजा करताना बहीण अशी प्रार्थना करते की माझ्या भावाच्या जीवनामध्ये मानसिक शांतता राहावी त्याला कोणतेही टेन्शन असू नये तू टेन्शन फ्री आणि शांततेत असावा.

मित्रांनो बहिणीच्या पार्थना मुळे आणि सात वस्तूमुळे तुमचे साती ग्रह शुभ होऊन जातात. आता राहिला आठवा ग्रह बुध तर राखी बांधून झाल्यावर तुम्ही जेव्हा बहिणीला काहीतरी भेटवस्तू म्हणून देतात. त्यामुळे आपला भूत ग्रह शुभ होऊन जातो आणि तुम्हाला त्याचे शुभ फळ प्राप्त होते. असे म्हटले जाते की बुध ग्रह आपल्या व्यापारामध्ये फायदेशीर ठरतो. परंतु आपल्याला जर आपल्या बहिणीचे आशीर्वाद मिळाले तर तुमच्या व्यापारामध्ये वृद्धी येईल.

यासाठी आपल्या बहिणीला कधीही नाराज न करता तिला काही न काही भेटवस्तू देऊन तिचे आशीर्वाद मिळवत राहावे. आणि आपल्या व्यापार व्यवसायामध्ये प्रगती करत राहावी. तर ही होती रक्षाबंधन विषयी काही लॉजिक त्यामुळे आपल्या भावाच्या आरोग्यात आणि ऐश्वर्यात वाढ होणारा हा सण असतो. म्हणून या सणाला नेहमी आनंदात व उत्साहात साजरा करावा.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *