८ ऑगस्ट आषाढी अमावस्या, दीप अमावस्या स्वामींना दाखवा हा नैवेद्द घरात सुख समृद्धी नांदेल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

तुमच्यावर स्वामींची कृपा होईल व स्वामी प्रसन्न होतील. मित्रांनो दीप अमावस्या जिला आषाढी अमावस्या सुद्धा म्हणतात. या अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याची सुरुवात होत असते. या दीप अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या घरातील सर्व दिवे स्वच्छ धुऊन त्यांची पूजा व आरती करत असतो. त्यांना नैवेद्य दाखवत असतो आपण त्यांची व्यवस्थित पाठावर मांडणी करून त्यांचे पूजन करत असतो.

या सोबतच या दिवशी त्यांच्यासाठी काहीतरी खास नैवेद्य करण्याची ही पध्दत आहे. यासाठी तुम्हाला विशेष नैवेद्द करायचा आहे. तुम्ही स्वामी साठी आणि जे दिवे तुम्ही पाटावर मांडणार आहेत त्यांच्यासाठी एकच नेवैद्य केला तरी चालेल. तर मित्रांनो हा नैवेद्य कोणता असेल तर या आणि नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणपोळी आणि खीर करावी किंवा पुरी, खीर किंवा चपाती खीर तुम्ही काहीही करू शकतात.

फक्त लक्षात ठेवायच की, तुम्ही जो काही स्वयंपाक नैवेद्य बनवणार त्यामध्ये तुम्हाला गोड पदार्थ बनवायचा आहे. मग तो शिरा असेल किंवा पुरणपोळी असेल काहीही चालेल फक्त तुम्ही तो पदार्थ बाहेरून आणू नका. म्हणजे अन्य दिवशी आपण कस बाहेरून काहीतरी मिठाई वगैरे किंवा काही तरी गोड पदार्थ आणतो आणि ते देवासमोर नैवेद्य म्हणून ठेवतो.

पण दीप अमावस्याच्या दिवशी अस करू नका त्या दिवशी आपल्या घरातच आपण काही तरी गोड पदार्थ किंवा पुरी भाजी अस बनवायचा आहे आणि देवाला आणि दिव्यांना नैवेद्य म्हणून ठेवायच आहे. तुमची इच्छा असेल आणि परिस्थिती असेल तर तुम्ही व्यवस्थित पणे खीर पुरणपोळी पोळीभाजी असं सर्व करू शकतात.

पण तुम्ही करू शकत नसाल तर फक्त शिरा किंवा पुरणपोळी करा. त्यानंतर तुम्ही जो नैवेद्य स्वामीं साठी आणि त्या दिव्यांसाठी केलेला आहे तो त्यांना दाखवा. जर तुम्ही दीप पूजन घरातच देवघरामध्ये केलेले आहे तर तुम्ही एकच नैवेद्य दाखवला तरी चालेल. पण दीप पूजन आणि स्वामींच्या फोटोमध्ये अंतर असेल तर तुम्हाला दोन नैवैद्य दाखवायचे आहेत. तर तुम्हीसुद्धा असा नैवेद्य दीप अमावस्याच्या दिवशी करायला विसरू नका.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *