महिलांनी घरात चुकूनही करू नये ही ३ कामे घरात येते गरिबी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आज आपण महिलांकडून होणाऱ्या काही अशा चुकांबद्दल बोलणार आहोत, ज्या केल्याने घरात गरिबी येते. माता लक्ष्मी अशा काही चुकांमुळे आपल्या घरातून निघून जाऊ शकतात. हिंदुशास्त्राने स्त्रियांना लक्ष्मीचा दर्जा दिलेला आहे. आपल्या घरातील स्त्री ही लक्ष्मी असते. तर अशावेळी जेव्हा आपल्या घरातील लक्ष्मी कडूनच अशा चूका घडतात. तेव्हा आपल्या घरात गरीब येणे, दारिद्र्य येणे साहजिकच असते. चला तर जाणून घेऊया त्या चुका कोणत्या आहेत.

१) जर तुमच्या घरात पैसे येत नसतील किंवा ते टिकत नसतील तर घरातील महिलांसोबत च घरातील सर्व सदस्यांनी सूर्योदयाच्या अगोदर म्हणजे सूर्य उगवण्याच्या आधी उठावे. आणि घराची व अंगणात साफसफाई करावी. ज्या महिला सूर्योदयाच्या नंतर उठतात त्यांच्या घरात लक्ष्मी कधीच वास करत नाही.

२) सूर्य मावळल्यानंतर घरात कधीच झाडू मारू नये तसे केल्याने सुद्धा लक्ष्मी घरातून निघून जाऊ शकते. हिंदू धर्मशास्त्रात असे सांगितले आहे की सूर्यास्तानंतर महिलांनी चुकूनही केस विंचरू नये. अशी चूक करणाऱ्या महिलांच्या घरात मोठ्या प्रमाणात वस्तू दोष तयार होतात आणि यामुळेच घराची प्रगती थांबते.

३) सकाळी उठल्यावर किचनमध्ये प्रवेश करतात आणि मग चहा आणि नाष्टा बनविला जातो. तर एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा देवी वास करते आणि अशा ठिकाणी अंघोळ न करता प्रवेश करणे हे चुकीचे आहे. म्हणून कोणत्याही प्रकारच अन्न तयार करण्यापूर्वी आपण आधी आंघोळ करावी मग त्यांना बनवा व त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा करावी.

महिलांनी एक नियम बनवावा की जोपर्यंत आपण माता लक्ष्मीची पूजा करत नाही. तोपर्यंत त्यांना नैवद्य देत नाही तोपर्यंत अन्नाचा एक कणही आपल्या पोटात जाऊ देऊ नये. जर आपण या सर्व नियमांचे पालन केले तर खूप कमी वेळामध्ये आपल्या घरामध्ये धन राशन पैसा हे सर्व नांदतील. जर एखाद्या घरात स्त्रीचा स्वभाव कट करणारा असेल.

अशाही घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा होत नाही. तर महिलांनी वरील या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे व त्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. कारण या सर्व गोष्टी आपल्या परिवारासाठी आणि कुटुंबासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. यामुळे आपल्या परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *