कामिका एकादशी पासून बनला आहे शुभयोग, आता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वैद्यपक्षात एकादशी येते. प्रत्येक एकादशीचे वेगळेपण त्याच्या नावामुळे कळतच. आषाढ वैद्य पक्षात म्हणजेच कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला कामिका एकादशी या नावाने ओळखले जाते. या एकादशी तिथीचा मुहूर्त शुभ योग आहे याचे महत्त्व जाणून घेऊया.

संपूर्ण मराठी महिन्यांमध्ये २४ एकादशी येतात. एखाद्या वर्षी अधिक मास आल्यास दोन एकादशी जास्त येतात. आणि त्यावर्षी २६ एकादशी येतात. चातुर्मासातील पहिली संकष्टी चतुर्थी झाल्यानंतर येथे पहिली एकादशी. यावर्षी कामिका एकादशी रविवारी २४ जुलैला आलेली आहे. आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी या नावाने ओळखले जाते.

तर वैद्य पक्षात येणाऱ्या एकादशीला कामिका एकादशी या नावाने ओळखले जाते. पंचांगानुसार कामिका एकादशी मगाशी म्हटल तस २४ तारखेला आहे आणि २४ तारखेला व्रतही करायच आहे. उत्तर आणि पूर्व भारतातील पंचांगानुसार कृष्ण पक्षापासून महिना सुरू करण्याची परंपरा आहे.

तर पश्चिम भारतासह अन्य भागात शुद्ध पक्षापासून महिना सुरू करण्यात येतो. त्यामुळे सण उत्सव परंपरा साजरी करण्याची स्थिती मात्र वेगवेगळी असते. त्यामुळे उत्तर भारतीयांचा श्रावण १४ जुलै रोजीच सुरू झालेला आहे. पण महाराष्ट्रात मात्र श्रावण २९ जुलैला सुरू होणार आहे. त्यामुळे उत्तर भारतीयांची ही श्रावणातील ही पहिली एकादशी असेल. तर महाराष्ट्रात ही आषाढातली एकादशी असेल.

भारतीय पंचांगानुसार कामिका एकादशीचे व्रत रविवारी २४ जुलैला केल जाईल. एकादशी स्थिती शनिवारी २३ जुलैला सकाळी ११:२७ मिनिटांनी सुरू होईल आणि रविवारी २४ जुलैला दुपारी ०१:४५ मिनिटांनी संपेल. कामिका एकादशीच्या दिवशी २४ जुलैला वृद्धी योगाची सुरुवात होईल. दुपारी दोन वाजून दोन मिनिटांपर्यंत हा योग असेल.

नंतर ध्रुवयोग लागेल. याच दिवशी द्वि पुष्कर योग सुद्धा लागत आहे. द्वीपुष्कर योग २४ जुलैला रात्री दहा वाजल्यापासून ते २५ जुलैला सकाळी ०५:३८ मिनिटांपर्यंत असेल. याशिवाय कामिका एकादशीला रोहिणी नक्षत्र रात्री दहा वाजेपर्यंत आहे. आणि त्यानंतर मृगशिरा नक्षत्र सुरू होईल.

कामिका एकादशीच्या व्रताचे महत्त्व काय आहे ते बघूया. उपवास सोडल्यानंतर ब्राह्मणांना दानधर्म करावा. या दिवशी केलेल्या दानधर्माला अधिक महत्त्व आहे. कामिका एकादशीची कथा धर्मराज युधिष्ठराला सांगितली होती. याआधी वशिष्ठ मुनींनी वशिष्ठ राजाला सांगितली होती. ही कथा ऐकून त्यांना पापांपासून मुक्ती मिळाली आणि मग मोक्ष प्राप्ती झाली.

कामिका एकादशीचे व्रत मनोभावे केल्याने ब्रह्महत्येच्या पापातूनही मुक्तता होते. अस मानल जात. आषाढ महिन्याच्या वैद्य पक्षात येणाऱ्या कामिका एकादशीनंतर व्रतवैकल्यांचा सणउत्सवांचा श्रावण मास सुरू होतो. त्यामुळे या कामी का एका दिशेला अधिक महत्त्व प्राप्त झालेला आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *