मराठी कुटुंबातील मुलगी बनली गुजराती कुटुंबाची सून, पहा श्रेया बुगडे आणि तिच्या पतीची लव्हस्टोरी, ऐकून थक्क व्हाल…

Bollywood

नमस्कार मित्रांनो,

मित्रहो प्रेम हे अखेर प्रेमच असते, ते कसेही आणि कुठेही जुळून येऊ शकते. प्रेमाला वय नसते, ठिकाण नसते सर्वात महत्त्वाचे भान नसते. प्रेम कोणत्या जातीत येत नाही तर कोणत्या धर्मात येत नाही. प्रेमाला कशाचेच बंधन नसते. प्रेम एक वाहती नदी असते जी नेहमी वाहतच असते. कलाकार या प्रेमाला अगदी हळुवार पणे जपतात. म्हणून अनेकांचे या क्षेत्रात प्रेमविवाह झालेले आपण पाहतो. कधी कधी हे विवाह लवकर तुटतात.

पण कधी कधी हे विवाह वर्षानुवर्षे वर्षे दोन मनाला जुळवून ठेवतात. त्यामुळे आजवर लोकांनी काही जोडपे अशीही पहिली आहेत ज्यांनी कोणतीच तक्रार न करता आपल्या जोडीदाराला सांभाळून घेतले आहे आणि चाहत्यांचा आदर्श बनले आहेत. पडद्यावर कलाकार जसे दिसतात ते खऱ्या आयुष्यात कसे असतील हा प्रश्न प्रत्येक प्रेक्षकाला पडतोच. काही कलाकार चित्रपटातून प्रत्येक वेळी रसिकांच्या भेटीस येतात.

पण काही कलाकार लाईव्ह शो मधून रोजच रसिकांना भेटतात. त्यामुळे त्यांच्यातील आणि प्रेक्षकांच्यातील नाते अगदी घट्ट आणि जवळचे बनते. रसिक आपोआप त्यांचे चाहते बनून जातात कारण ते रोजच हृदयावर राज्य करू लागतात. अशीच एक कलाकार जी आता महाराष्ट्राच्या चेहऱ्यावरील हसू आहे. जीने प्रत्येक माणसाला खळखळून हसवून त्याचे आयुष्य वाढवले आहे अशी ही श्रेया बुगडे. हिला आज पूर्ण महाराष्ट्र ओळखतो. तीच्या प्रत्येक अदावर महाराष्ट्र फिदा आहे.

ती शो मध्ये असली तर रसिक आपली टिव्ही सोडून अजिबात हलत नाहीत. तीची प्रत्येक विषयावर कॉमेडी करण्याची वेळ, तीची हालचाल सर्वात आकर्षित वाटते तीचे हास्य. जी स्वतः हसल्यावर इतकी गोड दिसते तीने रसिकांना हसवल्यावर अजून लाडकी बनून जाते. श्रेया ने अनेकांचे हृदय जिंकले आहे. ती दिसायला ही खूपच सुंदर आहे. ती अनेक कलाकारांची हुबेहुब नक्कल करते त्यामुळे तिच्या या कलेला पाहून उभा महाराष्ट्र मन भरून हसतो.

श्रेया चा जन्म एका मराठी कुटुंबात झाला आहे, तिला लहानपणापासून अभिनयाची आवड होती आणि ती आपल्याला तीच्या शो मध्ये दिसतेच. श्रेया शो मध्ये जितकी लोकांना हसवते तितकीच तिच्या वैयक्तिक आयुष्यात ही तीची लव्हस्टोरी मजेशीर आणि हटके आहे. श्रेया ही एका गुजराती कुटूंबाची सून आहे. २७ डिसेंबर २०१५ रोजी श्रेया आणि निखिल चा विवाह झाला होता. एका मालिकेच्या शूटिंग दरम्यान त्या दोघांची भेट झाली होती.

मालिकेच्या सेट वर निखिल श्रेयाशी मैत्री करण्याच्या प्रयत्नात असे, तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असे. पण काही तरी असे घडले ज्यामुळे त्यांच्या दोघात सारं काही बिनसलं. पुढे काही वर्षे दोघांचे बोलणे झाले नाही. पण त्यांच्यातील हा दुरावा फार काळ टिकला नाही. एका गाजलेल्या मराठी मालिकेचा कार्यकारी निर्माता अशी निखीलची ओळख वाढली.

त्याची क्रेडिट लाईन झळकत गेली. यावर त्याला शुभेच्छा देण्यासाठी श्रेया ने त्याला फोन केला मग पुन्हा त्यांच्यात संवाद सुरू झाला. इकडे निखिल च्या घरी त्याच्या लग्नाची तयारी सुरू होती यादरम्यान त्याने श्रेयाला विचारले तू सिंगल आहेस यावर श्रेयाचा होकार येताच त्याने वेळ न घालवता तीला प्रपोज केले.

यानंतर कुटुंबाच्या सहमतीने त्या दोघांचा विवाह झाला. आणि आता ते दोघेही त्यांच्या संसारात चांगलेच रुळलेत. त्या दोघांची जोडीही खूप छान दिसते, दोघेही एकमेकाला शोभतात. त्यांची ही जोडी अशीच सुखात राहो अशी सदिच्छा. मित्रहो हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा, आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *