२४ जून गुरुवार वटपौर्णिमा- वडाची पुजा करतांना बांधा ही एक वस्तू इच्छा पूर्ण होतील.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

जेष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. ही पौर्णिमा सुवासिनी स्त्रीयांसाठी खूप महत्त्वाची असते, ही पौर्णिमा यावर्षी २४ जून गुरुवार रोजी असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी काही विशेष नियमांचे पालन केल्यास आपल्याला सुख व समाधानाची प्राप्ती होते. चला तर जाणून घेऊया वटसावित्रीच्या दिवशी काय करू नये व काय करावे ते.

पौर्णिमा तिथीचा प्रारंभ उत्तर रात्री ३ वाजून ३२ मिनिटांनी होणार असून मराठी तिची समाप्ती गुरुवारी ब१२ वाजून २९ मिनिटांनी होणार आहे. म्हणून २४ जून रोजी गुरुवारी दिवसभर आपण कधीही पूजन करू शकतो. चला तर आपण जाणून घेऊया की वट सावित्री पूजा कशी करावी ते.

वटसावित्रीच्या दिवशी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ वस्त्रे धारण करावी. व्रताचा संकल्प करून पूजेची तयारी करावी या दिवशी विशेषता वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. यासाठी एका ताटात, हळद-कुंकू, तूप, फळे, कापसाची व कापडाची वस्त्रे, गणपती बाप्पा, घंटी, कापूर कच्चा दोरा, अगरबत्ती, शुद्ध पाणी थोडेसे गहू, फुले, सौभाग्य अलंकार व पहिली वटसावित्री असेल तर २१ नारळ, गहू ₹, नाणी असे ओटी चे सर्व सामान घेऊन पूर्ण ताट तयार करावे.

त्यानंतर वडाच्या झाडाखाली जाऊन वडाच्या झाडाचे पूजन करावे व वडाच्या झाडाच्या सात फेऱ्या माराव्या. व कच्चा दोरा गुंडाळावा त्यानंतर वटसावित्रीची पूजा ऐकावी. त्यानंतर आरती करून पाच किंवा सात स्त्रियांना हळद कुंकू लावून ओटी भरावी. वट सावित्री चे सुवासिनी स्त्रियांच्या जीवनात फार महत्व असते.

या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी काही विशेष नियमांचे पालन केले तर त्यांना सुख आणि समृद्धीचे प्राप्ती होते. या दिवशी घरातले वातावरण शांत शुद्ध आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही प्रकारे घरातील शांतता भंग होणार नाही व वादविवाद होणार नाही असे वर्तन करावे.

घरात स्वच्छता ठेवावी वटसावित्रीच्या दिवशी मनात कोणतेही वाईट विचार आणू नका. वटसावित्रीच्या दिवशी स्त्रियांचा तर उपवास असतो पण घरातल्या इतरांनीही या दिवशी सात्विकच भोजन करावे. अधिक भोजनाचा त्याग करावा तसेच आपले वर्तनही सात्विकच असावे. या दिवशी आपल्यापेक्षा मोठे किंवा लहान कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *