श्री स्वामी समर्थ यांच्या जवळ संकल्प केल्यानंतर एका स्वामी भक्ताला आलेला साक्षात्कार.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

माझ नाव सुवर्णा आहे मी प्रॉपर कोल्हापूरची आहे. मी पुण्यात गेली चार वर्ष झाले जॉब करत होते. आणि गेल्या पाच वर्षापासून माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर लग्नाच बघत होते माझ्या घरचे. तर काही तरी कारणाने माझं लग्न ठरत नव्हत. म्हणजे माझ्या इच्छा अपेक्षा व मुलगा मला कधीकधी आवडत नव्हता. खूप प्रयत्न केले पण लग्न काही जमत नव्हत.

मी तर अपेक्षा सोडली होती की माझं लग्न होईल. मला कोणता मुलगा आवडेल पण माझ्या अपेक्षेत बसेल असा कोणीच भेटत नव्हता व माझ लग्न राहून गेल माझ्या दोन मोठ्या बहिणी आहेत ते आधीपासून स्वामी समर्थांना मानत होत्या. ते नियमित स्वामींचा पाठ करत होत्या त्यांनी मला सांगितले की तू स्वामींचा मार्ग धर स्वामी समर्थ तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतील.

मग मी जानेवारी महिन्यापासून स्वामी समर्थांचा पाठ वगैरे करायला लागली. मी आता पुण्या मध्ये राहायला होती तेव्हा तिथे एक मोठा मठ होता, त्या मठात मी गुरुवारी जायची. म्हणजे माझ्या बहिणीने सांगितल होत मला की गुरुवार चा उपवास कर मग मी गुरुवारचा उपास करायला सुरुवात केली आधी मी फक्त गुरुवारी मठात जायची पण थोड्या दिवसांनी रोज मठात जायला लागली.

तिथे मठात जे हवन चालू होत तेव्हा ते हवनही मी अटेंड करायची तरीही माझ्या जीवनात काहीच फरक पडत नव्हता. त्यामध्ये मला एकदोन स्थळ आले तरीही काहीच ठरले नाही लग्नाच. मग मला एकाने सुचवले की मठात तुला काही समस्या असेल तर येथे प्रश्नोउत्तरांचा कार्यक्रम होतो. त्यात तुझा प्रश्न विचार याने तुझी समस्या सुटू शकते.

मग तेथे एक काकू मला भेटल्या त्यांनी मला सांगितल. जोपर्यंत तुम्ही तुमचा संकल्प स्वामींना सांगत नाही तोपर्यंत तुमची समस्या सुटत नाही. तुमचा जो काही संकल्प असेल तो स्वामींना सांगा. मग मी एक नारळ घेतला व तो नारळ स्वामींसमोर ठेवला. मी स्वामींना सांगितल माझ लग्न होऊद्या स्वामी मी तुमच्या दर्शनाला अक्कलकोट ला जाइल अस म्हणून संकल्प मनात धरून स्वामींना हात जोडले. आणि हे मी मागच्या शेवटच्या आठवड्यात केल होत.

२८ मार्च ला आणि मला एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात स्थळ आल १३ तारखेला मला त्यांच्याकडून होकार आला आणि मला जसा हवा होता तसा तो मुलगा होता. आणि जून च्या ४ तारखेला माझ लग्न झाल. मी स्वामींची खूप खूप आभारी आहे. स्वामींमुळे मला माझ्या मनासारखा मुलगा भेटला त्याची नोकरी तो दिसायला व स्वभावाला सुंदर असा होता.

असा मला स्वामींनी १५ दिवसात त्यांचा साक्षात्कार दिला. मी स्वामींची सदैव ऋणी राहील. स्वामींनी खूप केल माझ्यासाठी. तुम्हीही हे सर्व करा अगदी मानोभावाने स्वामींची पूजा व त्यांचे भक्त व्हा. स्वामी सगळ्यांना पावतात त्यांना जर तुम्ही मनापासून मानले तर.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *