कुंभ, मकर आणि मीन कधी संपणार साडेसाती? जाणून घ्या सविस्तर माहिती येथे.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी मकर, कुंभ आणि मीन या तीन राशींना साडेसाती चालू आहे. आणि आपले जे बघणारे प्रेक्षक आहेत ते आम्हाला नेहमी विचारतात की मकर राशीची साडेसाती कधी संपणार आहे. कुंभ राशीची कधी संपणार आहे. किंवा मीन राशीची साडेसाती कधी संपणार आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांना उत्तर देणार आहे.

या ३ ही राशींची साडेसाती कधी संपणार आहे कोणत्या वर्षी संपणारे ते आम्ही सांगणार आहोत. त्याच बरोबर या साडेसातीच्या काळामध्ये कुठले उपाय करायला हवेत ज्याचा तुम्हाला लाभ होऊ शकतो त्या उपायांबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत. तेव्हा माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. चला आता वळूया साडेसातीकडे मंडळी शनिदेवतेला न्यायदेवता म्हटलं जातं कारण माणूस जे काही भलेभुरे कर्म करतो त्या कर्माचा फळ शनिदेव माणसाला देत असतात. आणि म्हणून तर नेहमी चांगलं कर्म करावं असंही सांगितल जात.

साडेसातीला सर्व घाबरतात. कारण साडेसातीच्या काळामध्ये तुम्ही केलेल्या चांगल्या वाईट कर्मांची फळ मिळतात असं ज्योतिष शास्त्र सांगतात. शनि देवच आहेत जे माणसाला रावाचा रंक आणि रंकाचा राव बनवू शकतात. आणि त्यांना प्रसन्न करायच असेल तर काही उपायही ज्योतिष शास्त्रात दिलेली आहेत. त्या उपायांची चर्चा आपण करणारच आहोत पण त्या आधी बघूया मकर कुंभ मीन या राशींची साडेसाती नक्की कधी कधी संपते आहे ते?

आता ज्योतीशस्त्रानुसार शनि महाराज एका राशीत सुमारे अडीच वर्ष असतात. आणि अडीच वर्षांनी ते राशी परिवर्तन करतात. साडेसातीचा एक टप्पा अडीच वर्षाचा मानला जातो. आता सध्या मकर कुंभ, मीन यावर साडेसातीचा प्रभाव आहे. कारण शनि महाराज कुंभ राशीमध्ये आहेत. शनि महाराज कुंभ राशीमध्ये आहेत म्हणून कुंभ राशीच्या पुढची रास आणि एक मागची रास या राशींना साडेसाती आहे. अर्थात मकर राशीची जी साडेसाती आहे ती २९ मार्च २०२५ रोजी संपणार आहे.

हो बरोबर मकर राशीची लोक नेहमी कमेंट करून विचारतात की आमची साडेसाती कधी संपणार आहे. कारण बऱ्याच मकर राशीच्या लोकांचा असा अनुभव आहे की त्यांना या साडेसातीच्या काळामध्ये असंख्य वेगवेगळ्या प्रकारचा त्रास झालेला आहे. आणि म्हणून साडेसाती कधी संपणार आहे याची वाट ते बघत आहेत. तर २९ मार्च २०२५ म्हणजे पुढच्या वर्षी मार्च महिन्यामध्ये तुमची साडेसाती संपणार आहे. राहिलं फक्त एकच वर्ष.

आता मकर राशीच्या लोकांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. तुम्ही मकर राशीचे आहात आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळून तुमचा समाधान झाल असेल.

आता वळूया कुंभ राशीकडे कुंभ राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा चालू आहे. कारण शनि महाराज कुंभ राशीमध्येच विराजमान आहे. आणि कुंभ राशीची जी साडेती आहे ती संपणारे २३ फेब्रुवारी २०२८ म्हणजेच कुंभ राशीची साडेसाती संपायला अजून थोडा वेळ आहे. पण आता म्हणून कुंभ राशीच्या लोकांनी लगेच चिंताग्रस्त होण्याची गरज नाही कारण याच्या शेवटी आपण उपायांबद्दल चर्चा करणार आहोत. त्यातला कुठलाही एक उपाय जो तुम्हाला जमणार असेल तो तुम्ही करू शकतात. त्यामुळे नक्कीच या साडेसातीमध्ये तुम्हाला देखील आधार होणार आहे. लाभ मिळणार आहे.

आता वळूया मीन राशीकडे मीन राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. आता साडेसातीचा पहिलाच टप्पा सुरू आहे. कारण २९ एप्रिल २०२२ पासूनच मीन राशीची साडेसाती सुरू झाली आहे. त्यामुळे पंचांगानुसार आता मीन राशिची साडेसाती संपणार आहे ७ एप्रिल २०३० ला मीन राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल ७एप्रिल २०३० रोजी तर मंडळी या तीन राशींचे साडेसाती कधी संपणार आहे तुमच्या लक्षात आल.

पण आता साडेसाती चालू तर आहे संपायला तर वेळ आहे. तोपर्यंत उपाय काय करायचे ते जाणून घ्या. ज्योतिष शास्त्रात शनीच्या साडेसातीमुळे मानसिक तणाव होतो रोग भिती आर्थिक समस्या अशा प्रकारचे त्रास होतात असे सांगितले जात. पण आता हे त्रास सगळ्यांनाच होतात का? तर तसं नाही बऱ्याच जणांना तर साडेसाती येऊनही जाते पण त्यांना कळतही नाही. सगळ्यांना त्रास होईल असं नाही.

पण मग त्रास कुणाला होतो आणि कुणाला होत नाही तर ते आपापल्या कर्मा नुसार ठरत. जर तुम्हाला त्रास होतोय असं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही उपाय करा. आणि जर तुम्हाला त्रास होतच नाहीये किंवा तुमची साडेसाती चालू आहे हे तुम्हाला या माहितीतुन कळले तर मात्र तुम्ही काहीही उपाय करायची गरज नाही. पण चांगलं वागा चांगल कर्म मात्र करा. पण ज्यांना खरंच त्रास होतो त्यांनी काही उपाय करायला हवे.

आता त्यातला पहिला उपाय म्हणजे शनीची साडेसाती चालू असेल तर त्या काळामध्ये तुम्ही गरजू व्यक्तींना दानधर्म अवश्य करा. कारण की शनी महाराजांना प्रसन्न करायचं असेल तर गरजवंताची गरज ओळखून त्याला दान करणं हा उत्तम उपाय मानला जातो. मग आता विशेष सण आपल्याकडे असतात आत्ताच गुढीपाडवा झाला किंवा अक्षय तृतीया येईल असे जर विशेष सण असतात त्या सणवारांना तुम्ही आवर्जून दानधर्म गरजू व्यक्तींना करा.

तुमच्या हाताखाली काम करणारे लोकांना करा. किंवा तुम्ही एखाद्या अनाथाश्रमात जाऊन वृद्धाश्रमात जाऊन ही दानधर्म करू शकता. जशी तुमची क्षमता असेल त्याप्रमाणे दानधर्म करणं हा साडेसातीच्या काळामध्ये उत्तम उपाय मानला जातो.

आता दुसरा उपाय शनीची साडेसाती असेल तर भगवान शिव शंकराची पूजा त्यांना जलाभिषेक करणं सुद्धा उत्तम उपाय असतो. मग प्रदोष असेल सोमवार असेल अशा विशेष दिवशी पण तुम्ही पूजा किंवा जलाभिषेक करू शकता. एकंदर भगवान शिवशंकराचा स्तोत्र म्हणू शकता किंवा जप सुद्धा करू शकता. हा देखील साडेसातीवरचा एक उपाय सांगितला जातो.

साडेसातीचा प्रकोप टाळण्यासाठी कर्म गाथा शनि देवांची अतोनात उचित पूजा सुद्धा करायला सांगितली जाते. त्याचबरोबर शनि यंत्राची स्थापना करण्याचा उपाय सुद्धा सांगितला जातो. पण हा उपाय मात्र तुम्ही तज्ञ ज्योतिषांच्या सल्ल्यानेच करा. आता पुढच्या उपायाकडे वळूया ज्याच्यासाठी तुम्हाला तज्ञांचा सल्ला घेण्याची गरज नाही. तो म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर पिंपळाच्या झाडाला रोज पाणी घाला.

पिंपळाच्या झाडांमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो. त्यामुळे पिंपळाच्या झाडाला रोज पाणी घातल्याने किंवा पिंपळाच्या झाडाची सेवा केल्याने सुद्धा शनीदोषापासून मुक्ती मिळते. आता काही स्तोत्र आहेत जी तुम्ही नियमित म्हटली तर तुमच्यावर असणारा साडेसातीचा प्रभाव कमी होऊ शकतो.

ती स्तोत्र म्हणजे हनुमान चालीसा आहे किंवा मारुती स्तोत्र जे मराठीत आहे ते मारुती स्तोत्र सुद्धा तुम्ही रोज म्हणू शकता. तुम्हाला येत असेल तर रोज शनि स्तोत्र म्हणू शकता. अगदी रोज म्हणावं असंही नाही यातलं कोणतंही एक स्तोत्र तुम्हाला येत असेल ते तुमच्या वेळात बसत असेल ते स्तोत्र तुम्ही म्हटलं तरी चालेल. शनीच्या उद्देशाने जप दान पूजा या गोष्टी तर निश्चितच करायला सांगितलेले आहेत. शनि स्तोत्र खास करून जर तुम्ही म्हटलात तर निश्चितच तुम्हाला त्याचा लाभ होईल.

पीडा परिहार्त शनिवारी अभ्यंग स्नान करून मुक्तेश्वर स्तोत्राचा पठण करायला सांगितलं जातो. शनिवारी शनिच दर्शन घेऊन उडीद आणि मीठ शनि देवांना अर्पण करावे. त्याचबरोबर कैलाभिषेक शनि देवांना करावा. काळी फुले वाहिल्याने पिडेचा परिहार होतो निदान शनिवारी संध्याकाळपर्यंत उपवास करावा. त्याचबरोबर नीलमण्याच्या अंगठी धारण करण्यास उपाय सुद्धा सांगितला जातो.

पण पुन्हा मी म्हणेन की अंगठी धारण करायचे असेल तर त्यासाठी तज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा. पण कोणता उपाय तुम्ही सल्ला न घेता करू शकता तो म्हणजे शनि देवांची पूजा करू शकता. पिंपळाच्या झाडाला पाणी घालू शकता या प्रकारच्या उपायांना कुठल्याही तज्ञांचा सल्ला घेण्याची गरज नाही. हे उपाय श्रद्धा भक्तीने केले असता नक्कीच परिणाम दाखवतात.

आणि आता या सगळ्या उपायांपेक्षा प्रभावी उपाय याबद्दल बोलूया. शनि देवांना प्रसन्न करायचे असेल तर तुमच्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींची सेवा करा. तुमच्या घरात आई-वडील असतील आजी आजोबा असतील जे कोणी जेष्ठ आहेत त्यांची सेवा करणं शनि देवांना प्रसन्न करण्यासारखं असत. कारण वृद्ध व्यक्तींचा अपमान वृद्ध व्यक्तींचा केलेला राग राग शनिदेव कधीही खपवून घेत नाहीत.

वृद्ध अपंग असाह्य गरीब या व्यक्तींचा जर तुमच्याकडे अपमान अनादर होत असेल तर शनि देवांचा फटका तुम्हाला पडणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. मग तुम्ही कितीही जप करा कितीही दान करा कितीही पुण्य करा पण तुमच्या वागणुकीतून तुम्ही समाजातल्या या असाह्य व्यक्तींना दुःखवत असाल त्यांच्यावर अन्याय करत असाल तर मात्र तुम्हाला या तुमच्या कर्मापासून सुटका मिळू शकत नाही.

आई-वडिलांची सेवा केली असता मोठ्यात मोठ्या पापांचा नाश होतो. हे त्रिवार सत्य आहे. म्हणूनच तुमची साडेसाती चालू असूद्या किंवा नसूद्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींची सेवा आदर त्यांचा उचित सन्मान हा प्रत्येकाने करावा. हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *