५० वर्षांनी त्रिग्रही योग या ६ राशींच्या उत्पन्नात वाढ बघा तुमची राशी आहे का यात.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ५० वर्षांनी दुर्मिळ असा त्रिग्रही योग जुळून आलेला आहे. या योगाचा फायदा काही राशींना होणार त्यांचे उत्पन्न वाढणार आहे. त्यांच्यासमोर अनेक नव्या संधी येणार आहेत. त्यांच्या आयुष्यात त्यांना प्रगती बघायला मिळणार आहे. पण कोणत्या आहेत त्या राशी आणि हा त्रिग्रही नक्की आहे. काय मंडळी मीन राशि मध्ये बुध वक्री चलनाने विराजमान झाला आहे.

मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बुद्धाच्या या गोचरामुळे मीन राशि मध्ये त्रिग्रही योग जुळून आला आहे. त्रिग्रही योग म्हणजे काय तर मीन राशिमध्ये बुध आणि सूर्य विराजमान आहेत. बुध आणि सूर्याचा बुद्धादित्य राजयोग तर आहेच पण शुक्र आणि बुधाचे लक्ष्मीनारायण राज योग सुद्धा जुळून आला आहे.

सूर्य बुध आणि शुक्र हे तीन ग्रह एकत्र आल्यामुळे शुक्रादित्य योग जुळून येतोय. त्याबरोबरच ५० वर्षांनी मीन राशि मध्ये असा हा ३ ग्रहांचा एकत्र येणे म्हणजेच त्रिग्रही योग जुळून आला आहे. ज्याचा फायदा सहा राशींना होणार आहे.
त्यापैकी पहिली रास आहे मिथुन रास.

मिथुन रास- मिथुन राशीच्या लोकांना कसा फायदा होणार आहे. तर त्यांना व्यवसाय आणि नोकरीत चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. चांगले दिवस त्यांचे सुरू होऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे. साधारणतः एप्रिल मे मध्ये पगार वाढ प्रमोशण या घटना घडतात. आणि त्यामुळेच मिथुन राशीच्या लोकांना सुद्धा नोकरी करणाऱ्यांना या संधीचा चांगला फायदा मिळू शकतो. पूर्वीपेक्षा आर्थिक दृष्ट्या मजबूत तुम्ही होऊ शकाल. तुमची काम सुद्धा तुम्ही वेळेवर पूर्ण करू शकाल. पुढील रास आहे

सिंह रास- सिंह रास सिंह राशीच्या लोकांची धार्मिक कार्यामध्ये रुची या योगामुळे वाढणार आहे. करिअरमध्ये सुद्धा मोठे यश त्यांना मिळू शकत. हो पण कामानिमित्त प्रवासाचे योग आहे भौतिक सुख सोयी मध्ये वाढ होऊ शकते. तसेच सिंह राशींच्या लोकांचा समाजात मानसन्मान देखील वाढू शकतो.

कन्या रास- अचानक आर्थिक लाभ झाला की माणसाला किती आनंद होतो. असाच योग कन्या राशीसाठी आहे. त्याचबरोबर वैवाहिक जीवनातही आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तुमचे मालमत्तेशी संबंधित जे काही वाद चालू होते त्यातून तुम्हाला थोडासा दिलासा या काळामध्ये मिळू शकतो. फक्त भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. असा सल्ला कन्या राशीच्या लोकांना दिला जातो.

धनु रास- धनु राशीचे जे विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळो शकतील. त्याचबरोबर ज्यांना विवाहाची इच्छा आहे. अर्थात स्थळ बघतायेत. त्यांचा सुद्धा विवाह निश्चित होण्याचा योग आहे. वैवाहिक जीवनाचा आनंद राहणार आहे. म्हणजे ज्यांचे विवाह आधीच झालेले आहेत त्यांच्या जीवनातही आनंद आनंद येईल. घरामध्ये एखादा शुभकार्य ठरू शकत. सगळ्यात महत्त्वाच उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तुमच्यापुढे येऊ शकते. आर्थिक लाभ होऊ शकतो.

कुंभ रास- गेल्या अनेक महिन्यांपासून नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली नोकरी या काळामध्ये मिळू शकते. त्यामुळे नोकरीसाठीचा प्रयत्न तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. प्रभावशाली लोकांचा संवाद वाढेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा सुद्धा मिळू शकतो.

मीन रास- मीन राशीसाठी सुद्धा त्रिग्रहयोग शुभ ठरू शकतो. नोकरीचा अनेक चांगल्या संधी मीन राशीला प्राप्त होऊ शकतात. आर्थिक लाभाच्या संधी सुद्धा मिळतील. अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत वाढेल. त्याचबरोबर समाजात मानसन्मान देखील वाढेल.

तर मंडळी या होत्या त्या सहाराशी ज्यांना या त्रिग्रही योगाचा लाभ मिळेल. हो पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा असे काही खास योग जुळून येतात. तेव्हा तुम्हाला प्रयत्न न करता गोष्टी मिळतील असा त्याचा अर्थ नक्कीच नसतो. प्रयत्न तर तुम्हाला करायचेच आहेत. तुम्ही केलेल्या प्रयत्नांना यश मिळण्याची खात्री हे योग तुम्हाला दाखवत असतात.

त्याचबरोबर एप्रिल महिन्यामध्ये रामनवमी देखील आहे. आणि हनुमान जयंती सुद्धा आहे. तर रामनवमी आणि हनुमान जयंती दिवशीही हे खास काय करू शकता. मग तुमची रास कोणतीही असूद्या तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल.

तुमच्या मनातील शंका आणि आर्थिक प्रश्न मिटतील. साधना उपासनेने आपण ईश्वराची कृपा प्राप्त करू शकतो. आणि त्यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले जातात. जे अशा खास दिवशी केले असता त्याचा परिणाम नक्कीच मिळतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *