कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणत्या देवाची पूजा करावी? काय सांगतो ज्योतिष शास्त्र.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये बारा राशींचा उल्लेख करण्यात आलेला आहे पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीच्य जन्मस्थानावरून आणि जन्म वेळेवरून प्रत्येक नक्षत्र राशीच्या एका चिन्हाशी संबंधित आहे आणि प्रत्येक राशीचे चिन्ह काही नक्षत्रांशी संबंधित आहे प्रत्येक राशीशी संबंधित असतात तुमच्या राशीची चिन्ह ही देवता असतात कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणत्या देवतेची पूजा करावी याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत .

१) मेष रास- मंगळ हा मेष राशीचे स्वामी ग्रह आहे मेष राशींच्या व्यक्तीने श्रीराम आणि हनुमान यांची पूजा केली पाहिजे भगवती तारा सरस्वती आणि माता शैलपुत्री या मेष राशींच्या देवी आहेत.

२) वृषभ रास- शुक्र ही वृषभ राशीची देवता आहे आणि या राशींच्या व्यक्तीने श्रीहरी विष्णूंची पूजा केली पाहिजे लक्ष्मी देवी आणि विद्या या वृषभ राशीच्या देवी आहेत

३) मिथुन रास- बुध हा मिथुन राशीचा स्वामी ग्रह आहे गणेश व विष्णू या मुख्य देवता आहेत मिथुन राशींच्या व्यक्तींनी दुर्गा व भुवनेश्वर आणि माता चंद्र घंटा देवीची पूजा केली पाहिजे

४) कर्क रास- चंद्र हा कर्क राशीचा स्वामी ग्रह आहे या राशींच्या व्यक्तींनी शिव आणि विष्णू यांची पूजा करायला हवी माता कमला आणि माता सिद्धी दात्री या देवी आहेत.

५) सिंह रास- सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे तर श्रीहरी विष्णू आणि हनुमान या मुख्य देवता आहेत या राशींच्या व्यक्तींनी माता गायत्री आणि पितांबरी आणि माता काल रात्री यांची पूजा करणे गरजेचे आहे .

६) कन्या राशि- कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध असून मुख्य देवता गणेश आहे या राशींच्या व्यक्तींनी दुर्गा भुवनेश्वर आणि माता चंद्र घंटा या देवीची पूजा केली पाहिजे.

७) तुळ रास- शुक्र हा तूळ राशीचा स्वामी ग्रह आहे या राशींच्या व्यक्तींनी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी आणि सोडशी श्री विद्या याची पूजा केली पाहिजे

८) वृश्चिक रास- मंगळ हा वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह आहे श्रीराम आणि भगवान हनुमान या मुख्य देवता आहेत भगवती तारा आणि माता शैलपुत्री या राशींच्या देवी असून त्यांची पूजा करणे मुख्य आहे.

९) धनु रास- गुरु हा धनु राशीचा स्वामी ग्रह आहे लोकांनी मुख्य देवता श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी कमला आणि माता सिद्धी दात्री यांचे पूजा केली पाहिजे

१०) मकर रास- शनि हा मकर राशीचा स्वामीग्रह असून मुख्य देवता हनुमान आणि शंकर आहेत मकर राशींच्या व्यक्तींनी हनुमान आणि शंकरा बरोबरच माता काली आणि माता सिद्धी दात्री यांची पूजा करायला हवी.

११) कुंभ रास- शनि हा कुंभ राशीचा स्वामीग्रह आहे या राशींच्या व्यक्तींनी हनुमान आणि शंकराची पूजा करायला हवी माता काली आणि माता राशीच्या देवी आहेत

१२) मीन रास- मीन राशीचा स्वामी ग्रह बुध असून यांचे मुख्य देवता श्रीहरी विष्णू आहेत मीन राशींच्या व्यक्तींनी माता लक्ष्मी कमला आणि माता सिद्धी दात्री या देवीचे पूजा केली पाहिजे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *