विसर्जनानंतर नारळ, व इतर वस्तूचे काय करावे? तर बघा हे काही करू शकता शास्त्रीय पद्धतीने..

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो…

१० दिवस बाप्पांची सेवा आणि पाहुणचार केल्यानंतर गणपती बाप्पांचा विसर्जन सुद्धा थाटामाटात केले जातात. आपण गणपती बाप्पांचा विसर्जन करताना गणपती बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करतो. मात्र १० दिवस बापान जवळ ठेवलेला सर्व साहित्य बापांना ज्या कपड्यावर बसवल ते कापड नारळ सुपारी कलश दक्षिणा तांदूळ या सर्व वस्तू तशाच राहतात.

या सर्व वस्तूंचे नेमक करायच काय ते कळत नाही आणि हेच आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी बाप्पांसाठी वापरलेल वस्त्र आपण गणपती बाप्पांच्या बसण्यासाठी वापरलेला कापड देवघरात देवांना स्थानापन्न होण्यासाठी वापरू शकता किंवा आपण हे वस्त्र देवपूजेच्या वेळी देवांना पुसण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. याचबरोबर त्याचा उपयोग आपण कलश किंवा देवघरातील अनेक वस्तू असतात त्या पुसण्यासाठी सुद्धा करू शकतो.

याचबरोबर ज्यावेळी आपण गणपती बाप्पांचा विसर्जन करायला पाण्यासाठी नदी किंवा इतर ठिकाणी जातो.त्यावेळी ज्या ठिकाणी आपण बापाचा विसर्जन करतो त्या ठिकाणची थोडीशी माती घरी घेऊन यावी आणि गणपती बाप्पांना ज्या ठिकाणी आपण विराजमान केल होत.त्या ठिकाणी ही माती ठेवून गणपती बाप्पांची आरती करावी.

कारण गणपती बाप्पांच्या मूळ रूपाच जरी आपण विसर्जन केल असल तरी गणपती बाप्पा सूक्ष्म रूपाने तिथेच असतात अस म्हणतात.त्यावेळी जी समय किंवा दिवा सुरू असेल तो तसाच सुरू ठेवावा. त्यातील तेल संपेपर्यंत तो तसाच चालू ठेवावा दुसऱ्या दिवशी ते माती आपण एखाद्या कुंडीमध्ये टाकून त्याला पाणी अर्पण कराव म्हणजे बापांचा वास आपल्या घरात स्थायी स्वरूपात राहील.

त्यानंतर तर आपण जे तांदूळ घेतले होते त्या तांदळाची खीर किंवा इतर गोड पदार्थ करून खावे, कलशाखाली ठेवलेलं धान्य किंवा इतर कार्यासाठी घेतलेलं धान्य आपण आपल्या दररोजच्या धान्यामध्ये परत ठेवून द्यावे. त्यामुळे आपल्या घरातील धान्याला बरकत मिळते. आणि आपल्या घराची भरभराट होते तुम्हाला जर ते तांदूळ किंवा ते धान्य आपल्या घरातील धान्यामध्ये मिसळून टाकायची इच्छा नसेल तर ते पक्षांना खाऊ घालावे.

सर्व सुपार्‍या हळकुंड असतील तर ते आपण आपल्या बागेमध्ये किंवा घराबाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी छोटासा खड्डा करून त्यात ते पुरून द्यावे. म्हणजे त्याची झाडे येतील आणि सुपारीचे झाड सजावटीसाठी खूप सुंदर दिसत असे म्हणतात.याबरोबरच कळशातील दक्षिणा ही घरातील कन्येला दान करावे.

जर आपल्या घरात कन्या नसेल तर इतर बाहेरील करणे ला सुद्धा ती दक्षिणा दिली जाऊ शकते. कलशातील पाणी घराच शिंपडाव घरात बाथरूम आणि टॉयलेट सोडून बाकी सर्व ठिकाणी हे पाणी शिंपडाव आणि राहिलेल पाणी कुंडीत होता व मात्र हे पाणी चुकूनही तुळशीला अर्पण करू नये. इतर कोणत्याही झाडांना कलशातील पाणी अर्पण केल जाऊ शकत.

विसर्जनाच्या दिवशी श्री गणेशाला नवीन नारळ अर्पण करून त्या नारळाचा प्रसाद आपण सर्वांना द्यावा. कलशावरील नारळ आणि गणपतीच्या शेवटच्या पूजेमध्ये पानसुपारी पान मोदक दुर्वा नारळ असे जे काही साहित्य आपण त्यांना अर्पण केले आहेत ते सर्व विसर्जन करून टाकावे.

अनेकदा अनेक लोक बाप्पाच्या कलश वरील ते नारळ फोडून टाकतात आणि त्याचा प्रसाद ग्रहण करतात. मात्र शास्त्रानुसार गणपतीच्या कलशातील नारळ कधीही प्रसाद म्हणून खान अयोग्य मानले गेले. कारण अस म्हणतात की दहा दिवस गणपती पूजेमध्ये ठेवलेला हा नारळ घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो.

अशावेळी ते पाण्यात अर्पण करावे अशा प्रकारे गणपती बाप्पांच्या पूजेत वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तूंचा योग्य पद्धतीने वापर केला जाऊ शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *