फाटलेले कपडे जुने कपडे यांचे काय करावे, जाणून घ्या सविस्तर माहिती येथे.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

आपल्याला नवीन कपडे घेण्याची खूप आवड असते विशेषतः स्त्रियांना कपड्यांची खूप आकर्षण असते. कुठे सेल लागला नवीन एखादा ट्रेंड बाजारात आला तर तो आपल्या कपाटात असायलाच हवा. असे करून आपण नवनवीन कपड्यांची खरेदी करत राहतो आणि कपाटात कपड्यांचा ढीग तयार होतो. इतके कपडे झाल्यावर त्यांचा वापर काही होत नाही नवनवीन फॅशन किंवा आवड म्हणून हे कपडे घातले जातात.

आणि पुन्हा ते तसेच आपल्या कपाटात कोपऱ्यात पडून राहतात असे करून करून कपाट गच्च होते आणि मग जुने कपडे बाहेर काढण्याची वेळ येते मग आपण आपल्याला न आवडणारे व्यवस्थित फिटिंग न बसणारे लहान मोठे होणारे फाटलेले शिलाई निघालेले असे सर्व कपडे बाजूला काढतो मग आपल्यापुढे एक मोठा प्रश्न पडतो की, या कपड्यांचे करायचे काय आजच्या या लेखात आपण हेच जाणून घेणार आहोत की, जुन्या फाटक्या कपड्यांचे काय करावे आपण जुने कपडे कोणाला देऊ शकतो का?

जुने कपडे कोणाला द्यावेत आणि कोणाला देऊ नयेत फाटके कपडे घातल्याने काय होते कोणत्या कपड्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा असते जुने कपडे घराबाहेर काढताना कोणत्या दिवशी बाहेर काढावेत जुन्या झालेल्या अंडरगारमेंट्स चे काय करावे या आणि अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओ जाणून घेणार आहोत तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला

फाटलेले कपडे कधीही घालू नये कधी कधी असे होते की, इतके दिवस कपडे असूनही आपला जीव एखाद्या ड्रेस वरच अडकलेला असतो. तो आपला तो अगदी जुना झाला फाटला तरीही आपल्याला तो टाकून द्यावासा वाटत नाही. मग तो ड्रेस तसाच घातला जातो परंतु फाटलेले कपडे घातल्याने आपल्या आजारांमध्ये वाढ होते. आपल्याला दुःख व त्रासाचा सामना करावा लागतो आणि याचे खूप अनिष्ट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात.

म्हणून कितीही आवडतं ड्रेस असला आणि जर तो फाटला तर तो टाकून द्यावा किंवा शिवून मगच वापरावा काही व्यक्तींचे वरचे कपडे अगदी छान नीट नीटके असतात. परंतु अंडरगारमेंट्स फाटले तरीही ते तसेच वापरले जातात, बनियन ला अनेक ठिकाणी छिद्र पडलेली असतात. अंडरगारमेंट्स ही फाटलेली असतात ते तसेच वापरले जातात.

फाटलेले किंवा शिलाई उसवलेले अंडरगारमेंट्स घातल्याने मानसिक आजार होऊ शकतो. तसेच कपड्याचा संबंध हृदयाशी असल्याने हृदयासंबंधी आजारांचा सामना करावा लागू शकतो. कपडे घातल्याने आपल्या ऊर्जेचा क्षय होतो. तसेच कमरेखालील कपडे फाटलेल्या असतील, तर आपल्याला शनीदोषाचाही सामना करावा लागू शकतो.

म्हणून फाटलेले कपडे कधीही घालू नये, आता आपण जाणून घेऊया जुन्या कपड्यांचे काय करावे ते आपण जे कपडे वापरत नाही परंतु ते व्यवस्थित आहेत फाटलेले नाहीत असे कपडे आपण गरीब गरजू व्यक्तींना देऊ शकता. परंतु आपले जुने कपडे कोणालाही देताना. धुवून व्यवस्थित घडी करून मगच इतरांना द्यावेत. आपण अंगावरून काढलेले कपडे न धुता तसेच कधीही कोणालाही देऊ नयेत.

जुने कपडे केवळ गरजू व्यक्तींना द्यावेत, असे कपडे सन्माननीय व्यक्ती किंवा संपन्न व्यक्ती त्यांच्याकडे आधीपासूनच भरपूर आहे. अशा व्यक्तींना कधीही देऊ नये, ज्यांना खरोखर या कपड्यांची गरज आहे जे गरीब आहेत. आणि या कपड्यांचा वापर करतील त्यांना हे कपडे द्यावे.

जुने कपडे कधीही शुक्रवारी किंवा शनिवारी बाहेर काढावेत, कोणालाही कपडे देताना ते शुक्रवारी किंवा शनिवारी द्यावेत. आपल्या घरातील नकारात्मकता जर नष्ट करायचे असेल तर शनिवारी जुने कपडे घराबाहेर काढणे हे सर्वश्रेष्ठ ठरेल. आपण घरातून जुने कपडे बाहेर काढले तर त्यातून स्वच्छतेसाठी काही नरम सुती कपडे काढून बाजूला ठेवतो. परंतु अशा कपड्यांची गाठोडी करून ठेवू नये.

ते व्यवस्थित घडी करून एखाद्या ठिकाणी मांडून ठेवत. आणि वरचेवर त्या कपड्यांना उन्हात वाळवावे म्हणजे त्या कपड्यांवर नकारात्मक ऊर्जा जमा होणार नाही. कारण आपण तीन महिने ज्यावेळी वस्तूला हात लावत नाही त्या ठिकाणी नकारात्मकता आणि दारिद्र्य निर्माण होते. म्हणून वरचेवर या कपड्यांना उन्हात बाहेर आत करावे तसेच पडू देऊ नयेत त्यामुळे त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

त्याशिवाय जसे हिवाळ्यात वापरणारी कपडे रजाई स्वेटर ब्लॅंकेट गाद्या त्यांनाही थोड्या थोड्या दिवसात उन्हात ठेवत जावावे. म्हणजे हे कपडे खराबही होत नाहीत आणि त्यावर नकारात्मक ऊर्जा ही जमा होत नाही जुने झालेले फाटलेले वापरत नसलेले आतील कपडे हे कधीही कोणालाही देऊ नये.

सर्व कपडे एकत्र करून जाळून टाकावे किंवा कचराकुंडीत टाकावे आपण जेव्हा नवीन कपड्यांची खरेदी करत असतो तेव्हा ते वापरायला काढण्यासाठी शक्यतो सण वार हा शक्यतो शुभ वार बुधवार गुरुवार किंवा शुक्रवारी सुरुवात करावी. हे दिवस नवीन कपडे घालण्यासाठी शुभ दिवस असतात. मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की जुन्या कपड्यांचे काय करावे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *