महिला श्राद्धविधी करू शकतात का? जाणून घ्या यामागील शास्त्रीय कारण.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

एक अगदी साधा प्रश्न महिला श्राद्धविधी करू शकतात का? शास्त्रामध्ये याबाबत काय सांगितल आहे चला जाणून घेऊया. मंडळी देशात महिला आरक्षणाच्या या विधेयकावर राष्ट्रपती द्रोपदी मुरमु यांनी स्वाक्षरी केली असून आता त्याचे कायद्यात रूपांतर होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दुसरीकडे भारतीय परंपरांमध्ये महत्त्वाचा मानला गेलेला पितृ पंधरवडा सुरू आहे.

१४ ऑक्टोंबर रोजी सर्वपित्री अमावस्या असून तोपर्यंत श्राद्धविधीत अर्पण केले जाणार आहेत. कुटुंबात अन्य कुणी नसेल तर महिला किंवा कन्या यांना श्राद्धविधी करण्याचा अधिकार आहे का याबाबत आपल्याकडे काही मान्यता आणि समजूती प्रचलित आहेत. मात्र याबाबत शास्त्र वचन काही हे जाणून घ्यायला हव. आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृतीचा भाग अधिक असल्यामुळे कोणताही कार्य शक्यतो मुलगा नवरा भाऊ यांच्याकडूनच करून घेतल्या जात.

अन्य सर्व क्षेत्रात महिलावर्ग पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना. काही धार्मिक विधी मात्र केवळ घरातील पुरुषच करताना दिसतात. सध्या सुरू असलेल्या पितृपक्षाबाबत बोलायच झाल तर श्रद्धा तर पण विधी करण्याचे अधिकार घरातील मुलींना आहेत की नाहीत याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात.

पुराणातील दाखल्यांचा विचार केल्यास घरातील मुलांप्रमाणेच मुलीही श्राद्धविधी करू शकतात. मुलींनी श्राद्धविधी करू नयेत असा उल्लेख कोणत्याही शास्त्रामध्ये आढळून येत नाही. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की माता सीतेने सुद्धा राजा दशरथाच्या नावाने श्राद्धविधी केले होते. वाल्मिकी रामायणात महिलाश्रद्धा करू शकतात असा उल्लेख आढळतो.

याच प्रमाण म्हणून सीतादेवीने राजा दशरथांच्या नावाने श्राद्धविधी केल्याचा एक प्रसंग सुद्धा येतो. प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीता माता वनवासात असताना पितृपक्षाच्या कालावधीत राजा दशरथाच्या नावाने श्राद्धविधी करण्यासाठी गया धाम इथ गेले होते. गया इथे श्रीरामांनी लक्ष्मण आणि देवी सीता यांच्या उपस्थितीत दशरथ राजाच्या नावाने पिंडदान केल होत.

त्यामुळे त्यांना मुक्ती मिळाली असे सांगितले जातात या कथेमध्ये असा भाग येतो की प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण श्राद्धाच साहित्य आणण्यासाठी नगरात गेले होते. मात्र काही कारणास्तव त्यांना येण्यास उशीर झाला. गोमातेला साक्षी मानून सीताने पिंडदान केल. शांत करण्याच्या ठिकाणी देवी सीता एकटीच होती वेळ निघून जात असल्यामुळे राजा दशकांनी सीता देवीला दर्शन दे श्राद्धविधी करण्याची विनंती केली.

सीता देवीने रेतीचे पिंड केले आणि फाल्गुनदी अक्षय वर्ड एक ब्राह्मण तुळस आणि गोमातेला साक्षी मानून सीता मातेने पिंडदान केले. यानंतर प्रभू श्री राम आणि लक्ष्मण पोहोचल्यानंतर सीता मातेने सगळी हकीकत सांगितली. त्यानंतर श्रीराम लक्ष्मण यांनी दशरथ राजाच्या नावाने पिंडदान केले अशी कथा आढळते आणि खोलात जायच असेल तर गरुड पुराणात होता पितृपक्ष पंधरवड्यातील श्राद्धविधी कोणी करावे याबाबत सविस्तर विवेचन केल्याचा आढळतात.

त्यामध्ये एक श्लोक आहे आणि त्या श्लोकामध्ये सांगितले की कोण कोण श्राद्धविधी करू शकतात. त्या श्लोकाचा अर्थ इथे मी सांगते ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या अनुपस्थितीत सून पत्नी श्राद्धविधी करू शकतात यामध्ये ज्येष्ठ कन्या किंवा एकुलती एक कन्या यांचाही समावेश करण्यात आलाय. महिलांना श्राद्धविधी करण्याचा अधिकार आहे हेच यावरून सिद्ध होत.

पत्नीचे निधन झाले असल्यास किंवा तिच्या अनुपस्थितीत सख्खा भाऊ भाचा नातू नात श्राद्धविधी करू शकतात.
यापैकी कोणीही उपस्थित किंवा उपलब्ध नसल्यास शिष्य मित्र नातेवाईक आप्तेष्ट हे सुद्धा श्राद्धविधी करू शकतात. यापैकी कोणीही उपस्थित नसेल किंवा उपलब्ध नसल्यास कुणाच्या पुरोहितांना त्या कुटुंबातील पूर्वजांच्या नावाने श्राद्धविधी करण्याचा अधिकार प्राप्त आहे अस गरुड पुराणात सांगण्यात आलय.

याचाच दुसरा अर्थ असा होतो की घरातील पुरुष उपस्थित नसतील तर महिला श्राद्धविधी करू शकतात. कारण प्रत्येक कुटुंबाच्या कल्याणासाठी श्राद्धविधी होणे आवश्यक असत. त्यामुळे तो करण्याचा अधिकार महिलांनाही आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *