१९ मे शनी जयंतीला दुर्मिळ योग, करा हा ‘महा उपाय’ शनी देव होतील अति प्रसन्न.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

१९ मे २०२३ ला आहे शनी जयंती. याच दिवशी काही खास दुर्मिळ योग सुद्धा जुळून आलेले आहेत म्हणूनच या दिवशी जर काही खास उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनातल्या सगळ्या प्रकारच्या समस्या दूर होतील मग त्या शारीरिक असुद्यात मानसिक असू द्यात मग कोणता आहे तो महा उपाय आणि कोणते दुर्मिळ योग जुळून आलेत चला जाणून घेऊयात.

शनी जयंतीच्या दिवशी शोभन योग तयार होत आहे. या दिवशी शनिदेव स्वतःच्या कुंभ राशीमध्ये विराजमान असल्याने षश्ट योग तयार होत आहे. याशिवाय या दिवशी चंद्र आणि गुरु मेष राशीमध्ये असल्याने गज केसरी योग तयार होत आहे. त्यामुळे शनी जयंतीचा दिवस खूप खास मानला जात आहे. या दिवशी शनि देवांची उपासना केल्याने त्याचे अनेक शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात.

शनी जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून तयार व्हा. त्यानंतर शनि देवांच्या मूर्तीवर तेल फुलांची माळ आणि प्रसाद अर्पण करून शनि देवांच्या चरणी काळे तीळ व काळे उडीद अर्पण करून त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून शनि चालीसाचे पठण करावे. शनी जयंतीला गरजूंना अन्नदान करणे सुद्धा महत्त्वाच मानल जात.

जयंतीच्या दिवशी संध्याकाळी पश्चिम दिशेला एक दिवा लावा आणि एका खास मंत्राचा जप करा तो मंत्र याप्रमाणे (ओम शम अभयसथाय नमः) शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही अजून एका मंत्राचा जप अकरा वेळा करायचा आहे. तो याप्रमाणे
(ओम श् शनेश्वराय नमः) या मंत्राचा जप अकरा वेळा करायला विसरू नका. त्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. आता बघुयात कोणता महा उपाय तुम्हाला शनि जयंतीच्या दिवशी करायचा आहे.

शनी जयंतीला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा एक दिवा नक्की लावा. आणि तिथेच बसून शनि स्तोत्राचे किंवा शनि चालीसाचे पठण करावे. तुमच्या ज्या काही अडचणी असतील ज्या काही समस्या असतील त्या यामुळे दूर होतील. शनीची साडेसाती चालू असेल किंवा शनि अडीच के महादशा वगैरे चालू असेल, तर शनी जयंतीच्या दिवशी काळा चामडाचे जोडे किंवा चप्पल घालून शनी मंदिरात जावे अनवाणी पायाने घरी परतावे.

अस मानल जात की, शनीदोषापासून मुक्ती मिळते. पण हे करताना मागे वळून मात्र पाहू नका. शनी जयंतीच्या दिवशी दानधर्म करायला विसरू नका. कारण शनि महाराज त्या लोकांवर प्रसन्न होतात जे लोक दानधर्म करतात. गरजूंची गरज ओळखून त्यांना अन्नदान किंवा ज्या वस्तूंची त्यांना गरज असेल त्या वस्तूंचे दान करून शनी जयंतीच्या दिवशी त्यांना मदत करा.

त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कितीही पूजा केली पण तुम्ही तुमच्या आई-वडिलांचा अपमान केला तर मात्र शनिदेव कधीही तुमच्यावर प्रसन्न होणार नाही. खर तर शनि देवांना प्रसन्न करण्याचा एक साधा सरळ सोपा मार्ग आहे.

तो म्हणजे मुक्या प्राण्यांची आई वडिलांची वयाने ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्तींची अपंग व्यक्तींची समाजातल्या गरीब दुर्बल व्यक्तींची सेवा करणे त्यांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करणे एवढा जरी केल तरी कुठलाही उपाय करण्याची गरज पडत नाही. शनि देवांची कृपा होतेच होते आणि कुठलेही मोठ्या संकटातून व्यक्ती तारून जाते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *