१९ डिसेंबर २०२२ सफला एकादशी या २ गोष्टी करा, प्रत्येक कामात सफलता मिळेल..!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

तुम्ही एकादशीचे व्रत करता का? एकादशीच्या दिवशी उपवास करता का? करत असाल किंवा नसाल. तरीसुद्धा तुम्ही या एकादशीला म्हणजेच १९ डिसेंबर जी एकादशी येते आहे. काय एकादशीला मात्र काही उपाय करा. काय आहे या एकादशी मध्ये विशेष आणि कशा प्रकारचे उपाय करायचे आणि ते उपाय केल्यामुळे काय होणार आहे. अहो तुम्हाला प्रत्येक कामात सफलता मिळणार आहे. मग ते काम कुठल्याही प्रकारचे असो.

सफला एकादशी केल्यामुळे, तुम्हाला नोकरी, व्यवसायामध्ये सफलता मिळते. सफला एकादशी केल्याने प्रत्येक कामात सफलता मिळते म्हणूनच तिला सफला एकादशीचे व्रत असे म्हटले जाते. हे व्रत केल्याने आयुष्य, आरोग्य यांचे रक्षण होते. या व्रतासह मनुष्याला त्याच्या प्रत्येक कामात यशही मिळते. श्रीहरींच्या कृपेने माणसाला भौतिक सुख आणि समृद्धी सुद्धा मिळते.

यावेळी १९ डिसेंबर २०२२ रोजी ही सफला एकादशी आलेली आहे. या दिवशी उपवास केला जाईल. सफला एकादशीला कुठले उपाय करावेत. त्याबद्दल आता जाणून घेऊया. सफला एकादशी का विशेष आहे. हे मी मगाशी थोडसं सांगितले. या एकादशी दिवशी तुम्ही कुठलाही प्रयोग केला तर यशस्वी होतो. या दिवशी व्रत केल्याने धनलाभ होतो.

व्यापारात लाभ होतो. संतती मध्ये अडचणी येत असतील तर त्याही अडचणी दूर होतील. मुलांचे शिक्षण चांगलं होतं. नोकरीत यश मिळते. अशीही आहे सफला एकादशी. सफला एकादशी दिवशी काय करायचे, श्रीहरींची पूजा करावी. एकादशीच्या दिवशी सकाळी संध्याकाळी श्रीहरींची पूजा करावी.

कपाळावर चंदन लावावं, चंदन लावून हरिंची पूजा करावी. श्रीहरींना पंचामृत,फुले, ऋतूनुसार फळ अर्पण करावी. उपवास करावा. या दिवशी उबदार कपडे आणि अन्नदान करणं सुद्धा शुभ मानलं जातं. आता वळूया सफला एकादशीच्या उपायाकडे ते पुढील प्रमाणे आहेत. जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल, किंवा नोकरीमध्ये यश मिळत नसेल, तर हा उपाय तुम्ही सफला एकादशीला नक्की नक्की करा.

तुमच्या उजव्या हातात पाणी आणि पिवळे फुल घ्या. आणि भगवान श्री हरी विष्णूंना तुमच्या कामात यश मिळावं यासाठी प्रार्थना करा. गायीच्या तुपाचा दिवा लावून, नारायण कवच याचा पाठ करा. सफला एकादशीच्या दिवसापासून अखंड दिवस नारायण कवच पठण करावं. नोकरीतील अडचणी संपत्तीतील काही अडचणी असतील, तर तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल. सगळ्या अडचणी दूर होतील.

आता तुम्हाला पैशांच्या संबंधित काही अडचणी आहेत का? मग त्या संदर्भातला सुद्धा एक उपाय आहे. तो सुद्धा तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं सफला एकादशीच्या दिवशी सकाळी पाण्यात लाल फुल टाकून सूर्यदेवाला तेजल अर्पण करायचे आहे. संध्याकाळी पूजा स्थळे तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि तुमचं काम लवकर व्हावं यासाठी प्रार्थना करायचे आहे.

अपत्य प्राप्तीसाठी काय करायचंय, चांदीच्या पात्रात भगवान श्रीहरी विष्णूंना पंचामृत घ्यायचा आहे. आणि ते त्यांना अर्पण करायचे आहे. आणि श्रीहरी विष्णूंना पंचामृत अर्पण करताना, ओम नमो नारायण या मंत्राचा १०८ वेळा जप करायचा आहे. पंचामृत प्रसाद म्हणून घ्या आणि संतती प्राप्तीसाठी प्रार्थना करा.

म्हणजे थोडक्यात काय, तुमची कुठलीही अडचण असेल, समस्या असेल, तर ती सोडवण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या साधना तुम्ही सफला एकादशीच्या दिवशी कराल. तर त्याचा फळ तुम्हाला नक्की मिळेल. आणि तुमची सेवा सफल होईल. तुमची प्रार्थना देवापर्यंत पोहोचेल. आणि परिणामी तुमचे काम सफल होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *