मकर संक्रात २०२३ वाहन काय? वस्त्र कोणते? कोणत्या दिशेला जाणार ? संपूर्ण माहिती.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मकर संक्रांत २०२३ या संक्रांतीचे वाहन कोणत असेल ही संक्रांत कुठल्या दिशेला जात आहे. या संक्रांतीच फल काय असेल चला सगळ्या सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो रविवारी १५ जानेवारी २०२३ रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे मकर संक्रांत. आणि या मकर संक्रांतीचे वाहन असेल वाघ तसेच उपवाहन असेल घोडा. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून तिच्या हातामध्ये तिने गदा घेतलेली आहे.

केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने ही संक्रांत कुमारिका असून बसलेल्या स्थितीमध्ये आहे. वासा करता जायची फुलं घेतलेली आहेत. पायस भक्षण करत आहे. सर्प जातीची आहे भूषण अर्थ मोती धारण केलेला आहे. वार नाव राक्षसी आणि नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त तीस आहे. ही संक्रांत दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे. आणि ईशान्य दिशेला पाहत आहे.

आता या संक्रांतीचे फल काय आहे ते जाणून घेऊया. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांत जिथून आली आहे तिथल्या जनतेला सुख प्राप्त होईल. आता संक्रांतीच्या पर्व काळामध्ये दान द्याव. मग ते कशाचं द्यावं? नवी भांडी गाईला घास द्यावा अन्नदान करावं तिला पात्र दान करावं गुल, तेल,भूमी, गाय, वस्त्र, घोडा यापैकी जे आपल्याला शक्य असेल त्या गोष्टींचा दान आपण संक्रांतीच्या पर्वकालामध्ये कराव.

जशी आपली परिस्थिती असेल त्याप्रमाणे करावं पण संक्रांतीच्या पर्वकाला मध्ये दान नक्की कराव. संक्रातीमध्ये काही काम वर्ज मानली जातात. अर्थात काही काम करू नये त्यामध्ये दात घासणे दुसऱ्यांना कठोर बोलणं असेल वृक्ष किंवा गवत तोडणे असेल गाई म्हशींची धार काढणं असेल किंवा काम विषयक सेवन करणे ही काम चुकूनही संक्रांतीच्या काळामध्ये करू नयेत.

संक्रांतीच्या दिवशी मग आपलं काय कर्तव्य आहे आपण काय करायला हव. तर तिला मिश्रित उदकाने स्नान करायला हवं अर्थात अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायला हवेत. तिळाचं उठणं अंगाला लावायला हव. तिळाचा होम तिला दर्पण तिला भक्षण तिला दान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो.

१४ जानेवारी २०२३ ला रात्री ०८ वाजून ४४ मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. आणि उदय तिथीनुसार १५ जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाईल. मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दरवर्षी मकर संक्रांति संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात. लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो.

अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. संक्रांतीच्या पुण्यकालामध्ये जमेल तसा दानधर्म करावा. तिळगुळ द्यावेत आणि तिळगुळ घ्यावेत. आणि एकमेकांना तिळगुळ देताना म्हणावं तिळगुळ घ्या गोड बोला संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *