पितृ पंधरवड्यात कावळा शिवण्यामागचे ‘रहस्य’ तुम्हाला माहिती आहे का?

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

अति परिचय अवज्ञा असे संस्कृत वचन आहे त्याचा अर्थ असा की जास्त जवळीक झाली की अपमान होण्याची शक्यता बळावते बिचाऱ्या कावळ्याच्या बाबतीतही असेच घडते रोज अंगणात खिडकीत घराच्या छतावर काव काव करणाऱ्या वामकुक्षी करणाऱ्या गृहिणी हाकलून देतात मात्र पितृपक्षात त्याच कावळ्याची आगतिकपणे वाट पहावी लागते . असे का चला तर मग जाणून घेऊयात पितृपक्षात कावळ्याचे महत्त्व काय आहे ?

साधारण दशक भरापूर्वी कावळ्याची काव काव सुरू झाली. अतिथी येणार असा संकेत मानला जात असेल आता लोक स्वतःच्या घरात पाहुण्यांसारखा राहतात म्हटल्यावर कावळ्याची काव काव कोण मनावर घेणार मात्र ज्ञानेश्वरीत माऊलींनी त्याला केवढ्या आदराने म्हटलं आहे (पैलं तो गे काऊ कोकताहे) म्हणजे कावळ्याची काव काव शकुन आहे. नाहीतर गोष्टीतला कावळा नेहमी बिचारा असतो नाहीतर चिऊताई कडे आसरा मागणारा असल्याचा सांगितले जाते.

पण मस्त विक्री त्यात असे नसून तो कधी घरट बांधायला सुरुवात करतो आणि किती उंचावर घरट बांधतो. यावरून पावसाची वर्दी कधी लागणार हे कळते त्याचा अर्थ कावळा हवामान तज्ञ म्हटला पाहिजे नाही का पण गोष्टीतली चिऊताई भाव खाऊन जाते. आणि तिथेही उपेक्षित राहतो तो कावळा काळ बदलला आहे आपल्या बालपणी एक एक दगड माठात टाकून पाणी पिणारा कावळा आता बऱ्याच पैकी स्मार्ट झालेला आहे.

तो थेट स्ट्रॉ टाकून पाणी पिऊ लागला आहे मात्र स्वभाव तोच भोळा भाबडा अजूनही आपली पिल्ले कोणती आणि कोकिळीची कोणती यात त्याची गल्लत होत असल्याने तो आपल्या आणि कोकिळेच्या पिल्लांचा एकत्र सांभाळ करतो. एका अर्थी फुकटेचे बेबी सीटिंग करतो तरीही कुठेही वाचता करत नाही अशा कावळ्याला बाकीच्यांनी नाकारला पण थेट यमराज यांनी स्वीकारला.

तेही आपलं खाजगी वाहन म्हणून असा काही ठिकाणी उल्लेख आहे कावळ्याचा भाव वधारला त्याची चपळाई सूक्ष्मदृष्टी आणि सावधान पणा हेरून त्याला यमराज यांनी आपल खाजगी वाहन बनवलं म्हणून पितृपक्षात त्याला घरोघरी बोलाव असत. कारण त्याला दिलेले अन्न यमराज आला आणि पर्यायी पितरांना पोहोचते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे हे पंधरा दिवस कावळ्यांसाठी मानाचे असतात.

इतरांच्या वासना आणि नैवेद्य ठेवणार यांचे मन पिंडाभोवती गिरट्या घालत असेल तर कावळा पिंडाला कावळा शिवतही नाही. एवढा तो मानी असतो. तो नैवेद्य जवळ बसेल पण ढुंकूनही पाहणार नाही जेव्हा आपण आपली चूक मान्य करतो. पितरांच्या इच्छा आकांक्षा पूर्तीची हमी देतो तेव्हा कुठे कावळा पिंडाला शिवतो. कावळ्याच्या विष्ठेतून वड पिंपळाची लागवड होते म्हणजे त्याच्याही नकळत तू वृक्षारोपणाची मोहीम राबवत असतो.

त्याला घनदाट झाडीत राहिला आवडते आपल्या निवासाची सोय तो स्वतःच करतो. जेवणाच्या बाबतीतही त्याचे नखरे नसतात मिळेल ते खाऊन तो पोट भरतो म्हणून कायम फिट राहतो कावळा संपूर्ण भारतभर आढळणारा पक्षी आहे. भारताशिवाय तो बांगलादेश नेपाळ पाकिस्तान श्रीलंका म्यानमार देव वगैरे देशांमध्ये सपाट भूप्रदेश ते डोंगराळ भागात सर्वत्र आढळतो. त्यामुळे बाकीचे पक्षी संपावर गेले तरी कावळ्याचे दर्शन रोज घडते.

या सर्व कारणांमुळे हा मोस्ट अवेलेबल पक्षी पितृपक्षांत पितरांच्या नैवेद्याचा मानकरी ठरतो. पितृपंधरा एवढ्यात कावळा शिवण्या मागचे हे रहस्य तुम्हाला माहीत होते का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *