सेवा करताना मन लागत नाही खूप इच्छा असूनही सेवा पूर्ण होत नाही…

Astrology

नमस्कार मित्रांनो.

तुमचे स्वागत मित्रांनो सेवा करताना मन लागत नाही. खूप इच्छा असूनही सेवा पूर्ण होत नाही. तेव्हा करावे हे सोपे काम. बऱ्याच वेळेस काय होतं सेवा करत असताना आपले मन लागत नाही. मग तो मंत्रजप असुद्या पारायण असू द्या. किंवा कसली तरी वाचन आपण करत असतो.

त्यामुळे आपले मन लागत नाही. आपल्या इच्छा खूप असतात. की सेवा करील मी हे करीन ते करेल. स्वामींची सेवा करेल. हे वाचेन पारायण करेल. मंत्र जप करेल. पण करतांना किंवा करायला बसल्यावर लगेच कंटाळा येतो.

मनात विचार येतात. आणि मन लागत नाही. मनात एकाग्रता येत नाही. अशा वेळेस काय करावे. असा प्रश्न सगळ्या स्वामी भक्तांना पडत असतो. तर मित्रांनो आजच्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला अधिक सोपे काम सांगणार आहे. ते तुम्ही करू शकतात.

तुमची खूप इच्छा आहे सेवा करण्याची. आणि तुमचेही मन सेवा करताना लागत नाही. तर तुम्ही सुद्धा हे काम करा. तुमची सेवा जर पूर्ण होत नसेल. तर तुम्ही सुद्धा हे काम करा. हे काम केल्याने तुम्हाला दुसरी कोणतीही सेवा करण्याची गरज नाही.

तुम्ही या सेवेपासून किंवा या कामापासून तुमच्या सेवेला सुरुवात करावी. तर मित्रानो जेव्हा आपले मन कोणत्याही सेवेत लागत नाही. मंत्रजप आपण करू शकत नाही. पारायण करू शकत नाही. वाचन करू शकत नाही. त्यावेळेस तुम्ही दिवसातून कोणताही एक वेळ ठरवावा.

सकाळ दुपार संध्याकाळ रात्र ही चालेल. जेवण झाल्यानंतर झोपण्याची वेळ असो तीही वेळ चालेल. तुम्हाला फक्त त्या वेळी स्वामी समर्थां समोर बसायचे आहे. आणि काहीच करायचं नाही. ना मंत्र जप करायचा ना वाचन करायचं. काहीच नाही अगरबत्ती दिवा सुद्धा नाही लावायचा.

तुम्ही फक्त स्वामी समर्थ स्वामीना नमस्कार करा. आणि फक्त बसून राहा. स्वामींकडे बघत दोन-तीन मिनिटं स्वामींकडे पाहून डोळे बंद करा. डोळे बंद झाल्यानंतर तुम्ही स्वामींना आठवा. स्वामी कसे दिसतात स्वामी फोटो मध्ये कसे दिसतात. स्वामी मूर्ती मध्ये कसे दिसतात.

स्वामींना बघण्याचा प्रयत्न करा. बंद डोळ्या आढून स्वामी तुम्हाला दिसतील. संपूर्ण स्वामी तुम्हाला दिसतील. आपल्याला जप वगैरे काहीच करायचं नाही. फक्त सगळ्यात आधी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही बसा. स्वामींना बघा एक दोन मिनिट झाल्यानंतर आपले डोळे हळुवार बंद करा.

मग स्वामींना बघण्याचा प्रयत्न करा. स्वामी कसे दिसतात. त्याने काय होईल तुमचे मन एकाग्र होईल. सेवेमध्ये स्वामिंमध्ये तुमच्या रूदयात स्वामी उतरतील. असं रोज करा. फक्त हेच करा. रोज करा आठ ते पंधरा दिवस करा. आणि हळूहळू तुम्ही जेव्हा डोळे बंद करता.

तेव्हा हळूहळू तुम्ही स्वामींच्या जपाला सुरुवात करा. म्हणजे डोळे बंद केल्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं बोलत रहा. आणि स्वामींना बघण्याचा प्रयत्न सुद्धा करा. तिथून सुरुवात करा मित्रांनो मन एकाग्र होईल. आणि तुमची इच्छा असूनही सेवा होत नसेल तर मग सेवा तुमच्याकडून बरोबर स्वामी सुद्धा करून घेतील.

तर मित्रांनो की माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अशाच प्रकारे अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *